Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज ‘या’ 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी

Share Market Update: भारतीय शेअर बाजार आज सपाट ते किंचित सकारात्मक सुरुवात करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत बाजारातील तज्ज्ञांनी आजच्या ट्रेडिंगसाठी काही निवडक शेअर्सवर लक्ष ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 30, 2026 | 08:18 AM
Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज 'या' 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी

Share Market Today: सपाट पातळीवर होणार शेअर बाजाराची सुरुवात! आज 'या' 7 स्टॉक्समध्ये मिळू शकते कमाईची संधी

Follow Us
Follow Us:
  • गिफ्ट निफ्टीमुळे आज बाजाराची सुरुवात सकारात्मक होण्याची शक्यता आहे.
  • आजच्या ट्रेडिंगसाठी तज्ज्ञांनी अनेक निवडक शेअर्स खरेदीसाठी सुचवले आहेत.
  • एचडीएफसी बँक, येस बँक, जेएसडब्ल्यू एनर्जी, भारत फोर्ज आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांसारख्या शेअर्सवर गुंतवणूकदारांचे लक्ष राहू शकते.
India Share Market Update:  जागतिक बाजारातील तेजीनंतर, भारतीय शेअर बाजाराचे प्रमुख निर्देशांक, सेन्सेक्स आणि निफ्टी ५०, ३० जून रोजी मंगळवारी सपाट पातळीवर उघडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गिफ्ट निफ्टीमधील ट्रेंड्स देखील भारतीय बेंचमार्क निर्देशांकासाठी किंचित सकारात्मक सुरुवातीचे संकेत देत आहेत. गिफ्ट निफ्टी, निफ्टी फ्युचर्सच्या मागील क्लोजपेक्षा जवळपास २१ पॉइंट्सच्या प्रीमियमवर, सुमारे २३,९९४ च्या पातळीवर व्यवहार करत होता.

Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीच्या दरातील चढऊतार सुरुच! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील किंमती

सोमवारी भारतीय शेअर बाजार घसरणीसह बंद झाला, आणि बेंचमार्क निफ्टी ५० २४,००० च्या पातळीखाली घसरला. सेन्सेक्स ३७२.१० अंकांनी, म्हणजेच ०.४८ टक्क्यांनी घसरून ७६,७२८.३७ वर बंद झाला, तर निफ्टी ५० १०९.७५ अंकांनी, म्हणजेच ०.४६ टक्क्यांनी घसरून २३,९४६.२५ वर स्थिरावला. सोमवारी बँक निफ्टी निर्देशांक ४४९.७० अंकांनी, म्हणजेच ०.७७ टक्क्यांनी घसरून ५७,७२७.३५ वर बंद झाला.

चॉईस ब्रोकिंगचे कार्यकारी संचालक सुमीत बागडिया यांनी आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना खरेदी करण्यासाठी पाच शेअर्सची शिफारस केली आहे. ज्यामध्ये इंडिया ग्लायकॉल्स, भारत फोर्ज, चेन्नई पेट्रोलियम कॉर्पोरेशन, गॅब्रिएल इंडिया आणि एआयए इंजिनिअरिंग यांचा समावेश आहे. प्रभुदास लिलाधरच्या तांत्रिक संशोधन विभागाच्या उपाध्यक्ष वैशाली पारेख यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार आज भारतीय शेअर बाजारातील गुंतवणूकदार एमसीएक्स, आयईएक्स आणि जेएसडब्ल्यू एनर्जी हे शेअर्स खरेदी करण्याचा विचार करू शकतात.

भारतीय शेअर बाजारात व्यवहार करणारे गुंतवणूकदार आज एचडीएफसी बँक, बजाज ऑटो, येस बँक, विधी, एसआयएस, स्टर्लिंग आणि विल्सन रिन्यूएबल एनर्जी, एसजेव्हीएन, अफकॉन्स इन्फ्रास्ट्रक्चर, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन या शेअर्सवर लक्ष केंद्रीत करू शकतात.

BPCL Mega Deal: बीपीसीएलचा मोठा निर्णय; रस्ते बांधणीच्या आधुनिक डांबर निर्मितीसाठी शेल आणि टिकी टारसह भागीदारी

चॉईस ब्रोकिंगचे सुमीत बागडिया, आनंद राठी येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे आणि प्रभुदास लिलाधर येथील टेक्निकल रिसर्चचे वरिष्ठ व्यवस्थापक शिजू कुथुपालक्कल यांनी इंट्राडे ट्रेडिंगवेळी आज गुंतवणूकदारांना खरेदी आणि विक्री करण्यासाठी सात स्टॉक्सची शिफारस केली आहे. तज्ज्ञांनी निवडलेल्या या शेअर्समध्ये बँक ऑफ महाराष्ट्र, साई लाईफ सायन्सेस लि., निप्पॉन लाईफ इंडिया असेट मॅनेजमेंट लि., एचडीएफसी लाईफ इन्शुरन्स कंपनी लि., एल अँड टी फायनान्स लि., जेएसडब्ल्यू एनर्जी लि. आणि लॉयड्स इंजिनिअरिंग वर्क्स लि यांचा समावेश आहे.

(टीपः वरील लेखातील माहिती वैयक्तिक विश्लेषक आणि तज्ज्ञांच्या आधारे देण्यात आली आहे. Navarashtra.com कोणताही दावा करत नाही. आम्ही गुंतवणूकदारांना गुंतवणूकीबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी प्रमाणित तज्ञांकडून शेअर्सबाबत विचारणा करण्याचा सल्ला देतो.)

Web Title: Experts recommend these top stocks to watch on june 30 for investors of indian share market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 08:18 AM

Topics:  

  • share market
  • Share Market Today
  • Share Market Update

संबंधित बातम्या

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?
1

Insurance Market Crash : 24 तासांत 31400 कोटी स्वाहा! 18 वर्षांपासून प्रभाव असणाऱ्या कंपनीला मोठा झटका; नेमकं काय घडलं?

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट
2

Stock Market Crash: गुंतवणूकदारांना मोठा झटका! 12 फायनान्शियल कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये ₹1.12 लाख कोटींची घट

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO
3

Sachin Tendulkar company IPO: क्रिकेटच्या मैदानानंतर आता शेअर बाजारात चर्चा! सचिन तेंडुलकरच्या कंपनीचा 3,000 कोटी IPO

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit
4

IPO Listingलाच मोठा धक्का! बाजारात एन्ट्री करताच शेअरला Lower Circuit

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.