Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलर!

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार, फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावण्यात त्यांना यश मिळवले आहे. त्यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जेफ बेझोस यांना मागे टाकून, त्यांनी हे स्थान मिळवले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 04, 2024 | 05:18 PM
फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलर!

फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग बनले जगातील दुसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती; एकूण संपत्ती 206.2 अब्ज डॉलर!

Follow Us
Close
Follow Us:

फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत यावर्षी प्रचंड वाढ झाली आहे. अलीकडेच त्यांनी प्रथमच 200 अब्ज डॉलर्स संपत्तीचा पल्ला गाठला आहे. आता त्यांनी आणखी एक विक्रम रचला असून, जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या श्रीमंत व्यक्तीचा किताब पटकावण्यात त्यांना यश मिळाले आहे. त्यांची एकूण संपत्ती २०६.२ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. जेफ बेझोस यांना मागे टाकून, त्यांनी हे स्थान मिळवले आहे. आता केवळ टेस्लाचे मालक एलॉन मस्क हे त्यांच्या पुढे आहेत.

हे देखील वाचा – देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी माहिती, म्हणाल्या…

यावर्षी मार्क झुकेरबर्ग यांच्या संपत्तीत ७८ अब्ज डॉलरची वाढ

ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सच्या ताज्या अहवालानुसार, एलॉन मस्क यांची एकूण संपत्ती सध्या 256 अब्ज डॉलर इतकी आहे. मार्क झुकेरबर्ग 206 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानावर आणि ॲमेझॉनचे माजी सीईओ जेफ बेझोस 205 अब्ज डॉलर्ससह तिसऱ्या स्थानावर आहेत. आता मार्क झुकरबर्ग आणि एलॉन मस्क यांच्यात केवळ ५० अब्ज डॉलर्सचे अंतर उरले आहे. मेटा सीईओ मार्क झुकेरबर्गसाठी 2024 हे वर्ष खूप चांगले आहे. त्यांच्या संपत्तीत आतापर्यंत ७८ अब्ज डॉलरची वाढ झाली आहे. याशिवाय तो श्रीमंतांच्या यादीत 4 स्थानांनी वर पोहोचला आहे.
(फोटो सौजन्य – सोशल मीडीया)

हे देखील वाचा – एआयएक्स कनेक्ट-एअर इंडिया एक्सप्रेसच्या विलीनीकरणास मंजुरी, टाटा समूहाचे साम्राज्य विस्तारणार!

मेटा प्लॅटफॉर्मच्या स्टॉकमध्ये 70 टक्क्यांनी वाढ

मेटा प्लॅटफॉर्म्समध्ये मार्क झुकरबर्ग यांची सुमारे 13 टक्के भागीदारी आहे. फेसबुक, व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामसारखे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म मेटा प्लॅटफॉर्म अंतर्गत येतात. यावर्षी त्यांनी जगातील 500 श्रीमंत लोकांमध्ये सर्वाधिक पैसे कमावले आहेत. विशेष म्हणजे मेटा प्लॅटफॉर्मचे शेअर्स यावर्षी जवळपास 70 टक्क्यांनी वाढले आहेत. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) मध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे कंपनीचा शेअर चांगली कामगिरी करत आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये झालेल्या या प्रचंड वाढीमुळे, मार्क झुकेरबर्गच्या संपत्तीतही झपाट्याने वाढ झाली आहे.

Web Title: Facebook ceo mark zuckerberg becomes worlds second richest person total wealth 206 2 billion dollars

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2024 | 05:18 PM

Topics:  

  • Mark Zuckerberg

संबंधित बातम्या

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ
1

अब्जाधीशाचा महाल, पत्नीचा पुतळा आणि शांततेचा भंग! मार्क झुकरबर्गच्या ‘गोल्डन कॅसल’मुळे पालो अल्टोमध्ये खळबळ

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?
2

Andrew Tulloch: Mark Zuckerberg नी ऑफर केलेली 1.5 अब्ज डॉलर्सची नोकरी नाकारली, सुरु केली स्वत:ची कंपनी! कोण आहे अँड्रयू टुलक?

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही
3

Mark Zuckerberg की Jeff Bezos, कोण सर्वात जास्त श्रीमंत? कोणाची कमाई आहे सर्वाधिक? जाणून घ्या सर्वकाही

Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या
4

Elon Musk कि Mark Zuckerberg? कोणता टेक दिग्गज कमावतो सर्वाधिक पैसे? तंत्रज्ञान क्षेत्रात कोणाचा दबदबा? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.