देशाच्या दरडोई उत्पन्नाबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची मोठी माहिती, म्हणाल्या...
स्वातंत्र्यानंतर भारताला दरडोई उत्पन्न 2730 डॉलर गाठण्यासाठी 75 वर्षे लागली. मात्र, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (आयएमएफ) म्हणण्यानुसार, पुढील ५ वर्षांत दरडोई उत्पन्नात 2000 डॉलरची वाढ होईल. येत्या काही दशकांत भारतीयांच्या जीवनशैलीत मोठा बदल होणार आहे. जो भारतीयांच्या जीवनाची नव्याने व्याख्या करेल. देशात असमानता होऊन हा बदल घडवून आणता येईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. त्या तिसऱ्या ‘कौटिल्य आर्थिक संमेलना’ला संबोधित करताना बोलत होत्या.
दरडोई उत्पन्नात 5 वर्षांत 2000 डॉलरने वाढ होणार
गेल्या काही दशकात आर्थिक आघाडीवर देशाची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. तर मागील 5 वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील 10 व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घेतली आहे. ही बाब उच्च विकास दर आणि कमी असलेली महागाई यामुळे शक्य झाले आहे. दरम्यान, भारताला दरडोई उत्पन्न 2730 डॉलर गाठण्यासाठी 75 वर्षे लागली आहेत. मात्र, पुढील 5 वर्षांत त्यात आणखी 2000 डॉलरने वाढ होऊ शकते. असेही अर्थमंत्री सीतारामन म्हणाल्या आहे.
हे देखील वाचा – राज्यातील शेतकऱ्यांना पीक विम्याचे 1927 कोटी रुपये लवकरच मिळणार – धनंजय मुंडे
अशांत परिस्थितीतही सकारात्मक बाब
सध्याच्या घडीला जगभरात देशा-देशांमध्ये विभागणी आणि संघर्ष होत आहे. जो जागतिक शांततेसाठी मोठा धोका आहे. असे असतानाही भारताच्या 140 कोटी लोकसंख्येमुळे दरडोई उत्पन्नात वाढ होण्यास मदत होत आहे. जगाची लोकसंख्या येत्या काही वर्षांत दुप्पट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सकारात्मक बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
भारतासमोर अनेक आव्हाने
2000 च्या दशकात जागतिक व्यापार आणि गुंतवणुकीचे वातावरण अनुकूल असल्यामुळे चीनसारखी उदयोन्मुख बाजारपेठ सहजतेने वाढली. मात्र, भारतासाठी हे मोठे आव्हान असले तरी ते एक संधीही घेऊन येते. कारण, सध्याची जागतिक परिस्थिती पूर्वीसारखी नाही, तरीही पुढील दशकात भारताचा वेगाने विकास होण्याची आशा आहे, असेही त्यांनी म्हटले आहे.
मागणीत असेल तेजी
सध्याच्या घडीला 43 टक्के भारतीय 24 वर्षांपेक्षा कमी वयाचे आहेत. त्यांना त्यांच्या उपभोगाच्या पद्धतींबाबत जाणून घेण्यास वेळ जाणार आहे. त्यामुळे येत्या दशकात देशभरातील मागणी मोठ्या प्रमाणात वाढ होईल. असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या आहेत.