Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे रहस्य योग्य धोरणं आहेत… लोकसंख्या नाही; ‘या’ अर्थतज्ञाचा दावा

भारत सध्या सर्वाधिक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर येत आहे. मात्र, वाढती लोकसंख्या हे भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे एकमात्र रहस्य नसून, सध्याच्या सरकारकडून राबवली जाणारी योग्य धोरणे ही देखील त्यास कारणीभूत आहेत. त्यामुळे देशाचा आर्थिक विकास वेगाने होत आहे. असा दावा सुप्रसिद्ध अर्थतज्ञ संजीव सन्याल यांनी केला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 26, 2024 | 05:45 PM
भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे रहस्य योग्य धोरणं आहेत... लोकसंख्या नाही; 'या' अर्थतज्ञाचा दावा

भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचे रहस्य योग्य धोरणं आहेत... लोकसंख्या नाही; 'या' अर्थतज्ञाचा दावा

Follow Us
Close
Follow Us:

सध्याच्या घडीला भारत सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था म्हणून समोर आला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या कार्यकाळात देशाला तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मात्र, अशातच आता सुप्रसिद्ध अर्थतज्ञ संजीव सन्याल यांनी भारतीय अर्थव्यवस्थेबाबत मोठे विधान केले आहे. केवळ भारताची लोकसंख्या अधिक असल्यामुळे भारत वेगाने प्रगती करत आहे. हे पुर्णपणे तत्थहीन आहे.

पाचव्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेपर्यंत झेप

याबाबत दाखला देताना त्यांनी म्हटले आहे की, 1960-70 च्या दशकातही भारताची लोकसंख्या खूप जास्त होती. त्यावेळीही देश गरीब होता. मात्र, आता त्यावेळी देशाच्या अर्थव्यवस्थेचा विकास फारसा झालेला नव्हता. असेही त्यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे ९० च्या दशकात देशाच्या अर्थव्यवस्थेचा वेग मोठ्या प्रमाणात वाढला होता.

हेही वाचा – आता कर्ज मिळणे झाले सोपे… यूपीआयनंतर रिझर्व्ह बॅंक कर्जदारांसाठी आणतीये ‘ही’ सुविधा!

त्या काळात देशातील अर्थव्यवस्थेने योग्य धोरणांचा अंगिकार करणे सुरु केले होते. त्यामुळे हा वेग वाढला होता. तर २०१४ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे नेतृत्व स्वीकारल्यानंतर, भारत त्यावेळी १० वी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था होता. मात्र, सध्या देशाने पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्याचा मान पटकावला आहे. असेही त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.

अर्थव्यवस्थेसाठी सरकारची योग्य धोरणे महत्त्वाची

पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचे सदस्य असलेल्या सन्याल यांनी लोकसंख्येच्या आधारावर विकास होत असल्याचा युक्तिवाद फेटाळून लावला आहे. केवळ लोकसंख्या अधिक असून विकास होत नाही. जगात अनेक गरीब देश आहेत. परंतु त्यांची प्रगती होत नाही. देशाच्या विकासासाठी सरकारची योग्य धोरणे ही महत्त्वाची आहेत. केवळ लोकसंख्या अधिक असून, उपयोग नसतो. असेही त्यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटले आहे.

हेही वाचा – सेबी ॲक्शन मोडमध्ये! पेटीएमच्या विजय शेखर शर्मांना पाठवली नोटीस, वाचा… काय आहे संपुर्ण प्रकरण

चीनच्या आर्थिक विकासाबाबत वारंवार चर्चा होते. त्यांची अर्थव्यवस्था आता 19 ट्रिलियन डॉलर्सची आहे. तेही मोठ्या कर्जाच्या उभारणीतून इथपर्यंत पोहोचले आहेत. तर भारताने देखील याच मोठ्या कर्जाच्या उभारणीतूनच गेल्या १० वर्षात 10 व्या क्रमांकावरून 5 व्या क्रमांकावर झेप घेतली आहे. असेही त्यांनी शेवटी नमुद केले आहे.

Web Title: Famous economist sanjeev sanyal claims that the secret of indias economic growth is the right policies not population

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2024 | 05:45 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.