Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता; त्याआधी ‘हे’ कराच!

देशभरातील शेतकऱ्यांना सध्या पीएस किसान योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरता आहे. हा हप्ता लवकरच अर्थात ऑक्टोबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो. असे सांगितले जात आहे. त्यामुळे आता देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. यापुर्वी 18 जून 2024 रोजी देशभरातील शेतकऱ्यांना 17 वा हप्त्यापोटी 21,000 कोटींहून अधिक रक्कम जारी करण्यात आली होती.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 06, 2024 | 09:24 PM
‘या’ दिवशी शेतकऱ्यांना मिळणार पीएम किसान योजनेचा 18 वा हप्ता; त्याआधी ‘हे’ कराच!
Follow Us
Close
Follow Us:

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 18 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हा हप्ता ऑक्टोबर 2024 मध्ये जारी केला जाऊ शकतो. यापूर्वी जून 2024 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 वा हप्ता जारी केला होता. पंतप्रधान मोदी यांनी 18 जून 2024 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील 9.26 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना 17 वा हप्ता म्हणून 21,000 कोटींहून अधिक रक्कम जारी केली होती. तर यापुर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये 16 वा हप्ता शेतकऱ्यांना देण्यात आला होता.

योजनेचे फायदे

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपये, म्हणजे वार्षिक 6,000 रुपये आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम एप्रिल-जुलै, ऑगस्ट-नोव्हेंबर आणि डिसेंबर-मार्च अशा तीन हप्त्यांमध्ये दिली जाते. हा निधी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात वर्ग केला जातो. ही योजना 2019 च्या अंतरिम अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केली होती. ही आता जगातील सर्वात मोठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर योजना बनली आहे.

ई-केवायसी आवश्यक

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. योजनेच्या अधिकृत वेबसाइटनुसार, पीएम किसानमध्ये नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. ओटीपी आधारित ई-केवायसी पीएम किसान पोर्टलवर उपलब्ध आहे. किंवा मग बायोमेट्रिक ई-केवायसीसाठी जवळच्या सीएससी केंद्रांशी संपर्क साधला जाऊ शकतो.

हे देखील वाचा – ज्या कॉलेजने प्रवेश नाकारला, त्याच कॉलेजने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलावले; वाचा… गौतम अदानी यांच्या शालेय जीवनातील रंजक किस्सा

लाभार्थ्यांना अशी तपासता येईल स्थिती
– pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
– Know Your Status वर क्लिक करा.
– तुमचा नोंदणी क्रमांक, कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि Get Data पर्याय निवडा.
– तुमची स्थिती दिसेल

लाभार्थी यादीतील नाव तपासा
– पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या www.pmkisan.gov.in.
– Beneficiary list वर क्लिक करा.
-राज्य, जिल्हा, उपजिल्हा, ब्लॉक आणि गाव निवडा.
– Get report वर क्लिक करा.
– त्यानंतर लाभार्थी यादी दिसेल.
– अधिक माहितीसाठी हेल्पलाइन क्रमांक 155261 आणि 011-24300606 वर संपर्क साधा.

पीएम किसान योजनेसाठी अर्ज कसा करावा
– pmkisan.gov.in वर जा.
– New Farmer Registration’ वर क्लिक करा आणि आधार क्रमांक टाका.

Web Title: Farmers will get 18th installment of pm kisan yojana on this day do this before that

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 06, 2024 | 09:24 PM

Topics:  

  • Agriculture News
  • PM Kisan Scheme
  • PM Kisan Yojana

संबंधित बातम्या

PM Kisan Yojana: १० कोटी शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी २००० रुपये, फक्त ‘ही’ प्रक्रिया पूर्ण कराच!
1

PM Kisan Yojana: १० कोटी शेतकऱ्यांना मिळणार प्रत्येकी २००० रुपये, फक्त ‘ही’ प्रक्रिया पूर्ण कराच!

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा २१ वा हप्ता लवकरच, कधी मिळू शकतात पैसे?
2

शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! PM किसानचा २१ वा हप्ता लवकरच, कधी मिळू शकतात पैसे?

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक
3

Nanded News : हदगावमध्ये शेतकरी एकवटले! पीक नुकसानीच्या पंचनाम्यावरून तहसील कार्यालयावर धडक

PM-Kisan Yojana: ‘हे’ शेतकरी पीएम-किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यापासून राहणार वंचित, यादीत तुमचं तर नाव नाही?
4

PM-Kisan Yojana: ‘हे’ शेतकरी पीएम-किसान योजनेच्या २१ व्या हप्त्यापासून राहणार वंचित, यादीत तुमचं तर नाव नाही?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.