Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक ठेवींबाबत अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले ‘हे’ निर्देश; म्हणाल्या केवळ गरजूंनाच कर्ज…

देशभरातील बँकांनी कोअर बँकिंगवर लक्ष केंद्रित करावे. याशिवाय ग्राहकांनी बँकांमध्ये ठेवी वाढवण्यात यासाठी त्यांना प्रोत्साहित करावे. सध्या देशभरातील बँकांमधील ठेवी कमी होत आहे. त्यामुळे बँकांनी ग्राहकांना याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील बँकांना केले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Aug 10, 2024 | 02:39 PM
बँक ठेवींबाबत अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले 'हे' निर्देश; म्हणाल्या केवळ गरजूंनाच कर्ज...

बँक ठेवींबाबत अर्थमंत्र्यांनी बँकांना दिले 'हे' निर्देश; म्हणाल्या केवळ गरजूंनाच कर्ज...

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील बँकांनी कोअर बँकिंगवर लक्ष केंद्रित करावे. याशिवाय ग्राहकांना बँकांमधील ठेवी वाढवण्यासाठी प्रोत्साहित करावे. ठेवी आणि कर्ज वितरण हे बँकांचे दोन मुख्य आधारस्तंभ आहेत. सध्याच्या घडीला बँकांमधील ठेवी कमी होत आहे. त्यामुळे बँकांनी ग्राहकांना याकडे आकर्षित करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील बँकांना केले आहे. त्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) केंद्रीय संचालक मंडळाच्या ६०९ व्या बैठकीनंतर बोलत होत्या.

केवळ गरजूंनाच कर्ज द्यावे!

याशिवाय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पुढे बोलताना म्हटले आहे की, बँकांनी केवळ देशातील गरजूंनाच कर्ज उपलब्ध करुन द्यावेत. बँकांमध्ये खातेधारकांना ठेवी ठेवाव्यात, यासाठी बँकांनी त्यांच्यासाठी आकर्षक योजना लागू कराव्यात. जेणेकरून बँकांमधील ठेवी वाढतील. यासाठी ठेवीवरील व्याजदर ठरवण्याचे अधिकार बँकांना आहेत. आपल्या पातळीवर बँका ते निश्चित करू शकतात. असेही त्यांनी म्हटले आहे.
(फोटो सौजन्य : एक्स हॅन्डल)

हेही वाचा : …’या’ आहेत देशातील पाच दिग्गज महिला उद्योगपती; कोट्यवधींची आहे संपत्ती!

ठेवी आणि कर्ज वितरणाबाबत चिंता व्यक्त

रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी देखील देशभरातील बँकांमधील एकूण ठेवी आणि त्या तुलनेत असलेले कर्ज वितरण याबाबत चिंता व्यक्त केली आहे. याशिवाय बँक ठेवींवर आकर्षक व्याजदर देऊन, बँकांमधील ठेवी वाढवल्या जाऊ शकतात. असेही त्यांनी म्हटले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (आरबीआय) केंद्रीय संचालक मंडळाच्या या बैठकीला अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी देखील उपस्थित होते.

Union Finance Minister Smt. @nsitharaman addresses the Central Board of Directors of the @RBI with Union Minister of State for Finance Shri @mppchaudhary along with Shri @DasShaktikanta at its customary post-Budget meeting in New Delhi, today. pic.twitter.com/pA7drWyM7w — Ministry of Finance (@FinMinIndia) August 10, 2024

४ नॉमिनीसाठी बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक

केंद्र सरकारने नागरिकांच्या बँक खात्याला एक किंवा जास्तीत जास्त ४ नॉमिनी जोडण्यासाठी बँकिंग कायदा दुरुस्ती विधेयक लोकसभेत मांडले आहे. शेअर बाजारात किरकोळ गुंतवणूकदारांची संख्या वाढली आहे. ज्यामुळे बँकांमधील ठेवींचा आकडा कमी झाला आहे. मात्र, बँकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक योजना राबवणे आवश्यक आहे. सध्याच्या घडीला सरकारी बँकांमध्ये विदेशी गुंतवणूक वाढवण्याबाबत सरकारचा कोणताही विचार नाही. असेही त्यांनी नमूद केले आहे.

Web Title: Finance minister gave instructions to the banks to encourage people for bank deposits

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2024 | 02:37 PM

Topics:  

  • Finance Minister
  • Nirmala Sitaraman

संबंधित बातम्या

Nirmala Sitharaman: आव्हानांच्या तोंडावर विकसित भारताचे लक्ष्य कसे साध्य करणार? निर्मला सीतारमण यांनी सांगितली रणनीती
1

Nirmala Sitharaman: आव्हानांच्या तोंडावर विकसित भारताचे लक्ष्य कसे साध्य करणार? निर्मला सीतारमण यांनी सांगितली रणनीती

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral
2

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral

GST मधून सरकारने 115 लाख कोटी रुपयांची वसुली केली…; रोहित पवारांचा मोठा आरोप
3

GST मधून सरकारने 115 लाख कोटी रुपयांची वसुली केली…; रोहित पवारांचा मोठा आरोप

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज
4

GST Council Meeting: फक्त 12 दिवस बाकी! GST कौन्सिलच्या बैठकीत होणार मोठा निर्णय, दिवाळीला मिळणार ‘असे’ सरप्राइज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.