लवकरच खुला होणार 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना गुंतवणूकीची मोठी संधी!
शेअर बाजारामध्ये आयपीओ आल्यानंतर त्यात गुंतवणूकीसाठी गुंतवणूकदार उत्सुक असतातच मात्र दोन दिवसापूर्वी आलेल्या आयपीओला गुंतवणूकदारांनी कमालीचा प्रतिसाद दिला आहे. नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी असलेल्या मनबा फायनांन्स लिमिटेड (Manba Finance Limited) कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद लाभला आहे. लोकांनी या आयपीओमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गुतंविले आहेत. 151 कोटी रुपयांचा हा इश्यू 224 वेळा सबस्क्राईब झाला असून या IPO मध्ये लोकांनी तब्बल 24,000 कोटी रुपये लावले आहेत. या आयपीओमध्ये उच्च नेट वर्थ गुंतवणूकदारांनी तर सर्वाधिक रक्कम मध्ये गुंतवली आहे. त्यांच्यासाठी राखीव असलेला भाग हा 512 वेळा भरला आहे. तसेच संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला भाग हा 149 वेळा भरला गेला आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला भाग 144 वेळा सबस्क्राईब झाला आहे. काल दि. बुधावारी 25 सप्टेंबर 2024 रोजी बंद झालेल्या IPO ची किंमत ही 114 ते 120 प्रति शेअर होती. कंपनीचे सोमवार 30 सप्टेंबर रोजी बीएसई आणि एनएसईवर स्टॉक सूचीबध्द होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
कोरोनानंतर भारताच्या शेअर बाजारात आणि विशेषत: आयपीओमध्ये लोकांची गुतंवणूक वाढली. जर आपण 2021 पासूनचे आयपीओ ट्रेंड पाहिले तर असे दिसून येते की मोठ्या प्रमाणात कंपन्यांनी बाजारात आयपीओ आणले आणि त्याला लहान ते संस्थात्मक गुंतवणूकदारांनी जबरदस्त प्रतिसाद दिला. इंडस्ट्री डेटानुसार 2023 मध्ये 61 मुख्य बोर्ड आयपीओतून कंपन्यांनी तब्बल 73,100 कोटी रुपये उभारले तर यावर्षी 2024 मध्ये 84,900 कोटी रुपये उभारले आहेत. लोकांकडून मिळणार प्रतिसाद इतर कंपन्यांसाठी प्रोत्साहनपर ठरत आहे. लोक एसएमई सेंगमेंटमध्येही गुंतवणूक करत आहेत. अलिकडे फक्त दोन शो रुम आणि केवळ आठ कर्मचारी असलेल्या टू व्हीलर डीलरशीपच्या 12 कोटीच्या एसएमई आयपीओसाठी 4800 कोटी किमतीच्या बोली लागल्या
मनाबा फायनान्सचा कंपनीचा आयपीओ सोमवार 23 सप्टेंबरला उघडला गेला आणि बुधवार 25 सप्टेंबरला बंद झाला. कंपनीचे शेअर्स हे 30 सप्टेंबर रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) वर सूचीबद्ध केले जातील. मनबा फायनान्सच्या 150.84 कोटी रुपयांच्या IPO ला ग्रे मार्केटमध्येही प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आज मानबा फायनान्स IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 50 टक्के प्रीमियमवर ट्रेडिंग करत आहेत.
मनाबा फायनान्स विषयी
मानबा फायनान्स लिमिटेड कंपनी सन 1998 मध्ये स्थापन झालेली NBFC ( Non banking Financial Corporation) कंपनी आहे. ही कंपनी दुचाकी, तीन चाकी, इलेक्ट्रिक टू व्हीलर, इलेक्ट्रिक थ्री व्हीलर, सेंकड हॅंड कार , छोटे व्यवसाय तसेच वैयक्तिक यासाठी कर्जपुरवठा करते. मागील आर्थिक वर्षात मनाबा फायनान्स लिमिटेडच्या महसूलात तब्बल 44 टक्के वाढ झाली आहे.