Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

थॅलेसेमिया निर्मूलनासाठी फोर्टिस हेल्‍थकेअरचा पुढाकार; ‘रेड रन’च्या नेतृत्वात जॅकी श्रॉफ यांनी केले “मिशन २०३५” लाँच

मिशन २०३५ ला बॉलिवुड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे पाठबळ आहे, जे थॅलेसेमियाबाबत जागरूकतेसाठी ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सामील झाले. त्‍यांची उपस्थिती व पाठिंब्‍याने या महत्त्वपूर्ण आरोग्‍यसेवा चळवळीला गती दिली, जेथे थॅलेसेमिया

  • By हर्षदा डोंगरे
Updated On: May 08, 2025 | 05:50 PM
थॅलेसेमिया निर्मूलनासाठी फोर्टिस हेल्‍थकेअरचा पुढाकार; 'रेड रन'च्या नेतृत्वात जॅकी श्रॉफ यांनी केले "मिशन २०३५" लाँच (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

थॅलेसेमिया निर्मूलनासाठी फोर्टिस हेल्‍थकेअरचा पुढाकार; 'रेड रन'च्या नेतृत्वात जॅकी श्रॉफ यांनी केले "मिशन २०३५" लाँच (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Close
Follow Us:

२०३५ पर्यंत भारताला थॅलेसेमियामुक्त करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या मिशन २०३५ या शक्तिशाली चळवळीला आज बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी पाठिंबा दर्शवत फोर्टिस हेल्थकेअरशी हातमिळवणी केली. ‘रेड रन टू एंड थॅलेसेमिया’ मध्ये भाग घेण्यासाठी गुरुग्राम येथील फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये २००० हून अधिक लोक जमले होते. या टाळता येण्याजोग्या पण जीवन बदलणाऱ्या रक्त विकाराबद्दल जागरूकता पसरवण्यासाठी सहभागींनी ५ किलोमीटर धाव घेतली. या चळवळीचा चेहरा बनलेले जॅकी श्रॉफ यांनी या कार्यक्रमात उत्साह भरला. 

मिशन २०३५ ला बॉलिवुड अभिनेता जॅकी श्रॉफ यांचे पाठबळ आहे, जे थॅलेसेमियाबाबत जागरूकतेसाठी ब्रँड अॅम्‍बेसेडर म्‍हणून सामील झाले. त्‍यांची उपस्थिती व पाठिंब्‍याने या महत्त्वपूर्ण आरोग्‍यसेवा चळवळीला गती दिली, जेथे थॅलेसेमियाचे समूळ उच्चाटन करण्‍यासाठी वैद्यकीय व्‍यावसायिक, धोरणकर्ते, एनजीओ, रूग्‍ण सल्‍लगार समूह आणि अधिकाधिक समुदाय एकत्र आले.

भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानी शेअर बाजारात मोठी घसरण, गुंतवणूकदारांमध्ये धास्ती

थॅलेसेमिया प्रतिबंध होणारी अनुवांशिक ब्‍लड डिसऑर्डर आहे, तरीदेखील भारतात दरवर्षी या आजारासह १०,००० ते १५,००० मुले जन्‍माला येतात. मिशन २०३५ चा जनजागृती वाढवत, लवकर तपासणी व अनुवांशित समुपदेशनाला चालना देत, उपचार उपलब्‍धता वाढवत आणि नवीन केसेसना प्रतिबंध करण्‍यासाठी धोरणांमध्‍ये सुधारणा करण्‍याला समर्थन देत या वास्‍तविकतेला बदलण्‍याचा मनसुबा आहे.

मिशन २०३५ ला पाठिंबा देत श्री. जॅकी श्रॉफ म्‍हणाले, ”थॅलेसेमियाचे निर्मूलन फक्‍त वैद्यकीय ध्‍येय नाही तर नैतिक अनिवार्यता आहे. थॅलेसेमिया आजार मूक संकट आहे, ज्‍याचा विशेषत: वंचित प्रदेशांमधील अनेक कुटुंबांवर परिणाम होत आहे. लवकर तपासणी आणि जागरूकता यामुळे अनेक मुलांना आयुष्‍यभराचा त्रास दूर करता येऊ शकतो. मी मिशन २०३५ उपक्रमामधील फोर्टिस हेल्‍थकेअरला संपूर्ण पाठिंबा देतो, ज्‍यामुळे भावी पिढ्यांसाठी आरोग्‍यदायी भविष्‍य घडवण्‍यास मदत होईल. सहयोगाने आपण दूरपर्यंत संदेश पोहोचवला पाहिजे, कारण जागरूकतेसह प्रतिबंधाची सुरूवात होते.”

फोर्टिस हेल्‍थकेअरचे व्‍यवस्‍थापकीय संचालक व मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ. आशुतोष रघुवंशी म्‍हणाले, ”मिशन २०३५ प्रतिबंधात्‍मक आरोग्‍यसेवा आणि थॅलेसेमिया-मुक्‍त भारताप्रती आमची कटिबद्धता आहे. थॅलेसेमिया आजीवन संकट आहे, ज्‍याचा मुलांसोबत संपूर्ण कुटुंबावर शारीरिकदृष्‍ट्या, भावनिकदृष्‍ट्या आणि आर्थिकदृष्‍ट्या परिणाम होतो. तरीदेखील हा वेळेवर तपासणी आणि अनुवांशिक समुपदेशानासह पूर्णपणे प्रतिबंध होणारा आजार आहे. गर्भधारणेदरम्‍यान एक योग्‍य निर्णय आजीवन त्रासाला दूर करू शकतो.

आमचा उपक्रम भारतातील कोणतेही मूल थॅलेसेमियासह जन्‍माला येणार नाही याची खात्री घेण्‍याच्‍या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल आहे. सहयोगात्‍मक प्रयत्‍न, जागरूकता आणि धोरण पाठिंब्‍यासह आपण या दृष्टिकोनाला प्रत्‍यक्षात आणू शकतो. फोर्टिसमध्‍ये आमचा विश्‍वास आहे की, आरोग्‍यसेवा प्रतिबंधासह केअरबाबत आहे. आज लाँच करण्‍यात आलेल्‍या मिशन २०३५ सह आम्‍ही आरोग्‍यसेवा, धोरणकर्ते आणि समुदाय यांच्‍या संघटित प्रयत्‍नांची सुरूवात करत आहोत. सहयोगाने, आपण आरोग्‍यदायी, प्रबळ भारत घडवू शकतो.”

फोर्टिस हेल्‍थकेअर बहुआयामी दृष्टिकोनाच्‍या माध्‍यमातून थॅलेसेमियाविरोधातील लढ्यामध्‍ये अग्रस्‍थानी आहे, ज्‍यामध्‍ये वैद्यकीय सर्वोत्तमता, जनजागृती आणि समुदाय आऊटरिचचा समावेश आहे. स्‍वत:ची प्रगत डायग्‍नोस्टिक शाखा अॅग्‍लीअस डायग्‍नोस्टिक्‍स आणि विशेषीकृत हेमॅटोलॉजी विभागांचे पाठबळ असलेली फोर्टिस हेल्‍थकेअर तपासणी, अनुवांशिक समुपदेशन, बोन मॅरो प्रत्‍यारोपण आणि उदयोन्‍मुख जीन थेरपीजची उपलब्‍धता देते.

शालेय व कॉलेज प्रोग्राम्‍स, एनजीओसोबत सहयोग आणि सरकारी संस्‍थांसोबतच्‍या भागीदारीच्‍या माध्‍यमातून फोर्टिस प्रतिबंधात्‍मक केअरमध्‍ये अग्रस्‍थानी आहे. मिशन २०३५ सह फोर्टिस थॅलेसेमियावर उपचार करण्‍याप्रती, तसेच आजाराबाबत संपूर्ण माहिती देण्‍यासाठी काम करण्‍याप्रती, प्रतिबंध, लवकर हस्‍तक्षेप आणि योग्‍य निर्णय घेण्‍यामध्‍ये खोलवर सामावलेली आरोग्‍यसेवा इकोसिस्‍टम घडवण्‍याप्रती कटिबद्धता अधिक दृढ करत आहे. भारतातील थॅलेसेमियाचे निर्मूलन करण्‍यासाठी फोर्टिसचा दृष्टिकोन बहुआयामी असेल, जेथे जागरूकता, लवकर तपासणी आणि उपचाराच्या माध्‍यमातून प्रतिबंधावर लक्ष केंद्रित करण्‍यात येईल.

Share Market Closing Bell: भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद

Web Title: Fortis healthcares initiative to eradicate thalassemia jackie shroff launches mission 2035 under the leadership of red run

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 05:50 PM

Topics:  

  • Business News

संबंधित बातम्या

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा
1

आता सरकार परत करणार तुमचे ‘पैसे’, बँकेत रू. 1.84 लाख कोटींची ‘Unclaimed’ रक्कम! अर्थमंत्री सीतारमण यांचा खुलासा

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र
2

Jeevan Praman Patra: पेन्शनर्सना आता बँकेत जायची गरज नाही, घरीच मिळणार जीवन प्रमाणपत्र

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या
3

7th Pay Commission : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ‘या’ भत्त्याचे नियम बदलले, कोणाला फायदा होणार फायदा? जाणून घ्या

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?
4

Success Story: ना अंबानी ना अदानी…; एकेकाळी 5000 पगार, आता 3820 कोटीचा IPO, कोण आहे ही व्यक्ती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.