Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

HCAH And QMS Strategic Partnership : भारतातील घरपोच आरोग्यसेवा क्षेत्रातील अग्रगण्य हेल्थ केअर ॲट होम इंडिया HCAH आणि क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस QMS यांनी धोरणात्मक भागीदारीची अधिकृत घोषणा केली आहे. या करारांतर्गत दोन्ही कंपन्यांचे रुग्ण सहाय्य व्यवसाय क्यूएमएसच्या १००% मालकीच्या 'सारथी हेल्थकेअर' उपकंपनीत विलीन केले.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 02, 2026 | 04:30 PM
HCAH अन् QMSचा मोठा निर्णय ( सौजन्य - सोशल मीडिया )

HCAH अन् QMSचा मोठा निर्णय ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • 12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ!
  • भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!
  • HCAH अन् QMSचा मोठा निर्णय
HCAH And QMS Strategic Partnership : घरपोच आरोग्यसेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी हेल्थ केअर ॲट होम इंडिया प्रा. लि. (HCAH) आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मुख्य फलकावर नोंदणीकृत एकात्मिक आरोग्यसेवा क्षेत्रातील कंपनी क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड (QMS) यांनी औषधनिर्मिती कंपन्यांसाठी रुग्ण सहाय्य सेवा अधिक व्यापक करण्याच्या उद्देशाने धोरणात्मक भागीदारीची घोषणा केली आहे. या भागीदारीअंतर्गत दोन्ही कंपन्यांचे रुग्ण सहाय्य सेवा व्यवसाय क्यूएमएसच्या शंभर टक्के मालकीच्या सारथी हेल्थकेअर या उपकंपनीत विलीन करण्यात येणार आहेत. ( HCAH And QMS Strategic Partnership )

DA Hike : अरे वाह… DA मध्ये थेट 5% वाढ! म्हणजे आता पगार वाढणार; सणासुदीच्या काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट

 २ हजारांपेक्षा अधिक आरोग्यसेवा

या एकत्रित व्यासपीठाच्या माध्यमातून १६० हून अधिक रुग्ण सहाय्य कार्यक्रमांद्वारे १२ लाखांहून अधिक रुग्णांना सेवा देण्यात येणार आहे. तसेच ३५ हून अधिक शहरांमध्ये २ हजारांपेक्षा अधिक आरोग्यसेवा व्यावसायिकांचे जाळे कार्यरत राहणार आहे. रुग्णांची तपासणी, नोंदणी, उपचाराची सुरुवात, उपचारातील सातत्य, रुग्णांना आर्थिक व वैद्यकीय सहाय्य तसेच रोग व्यवस्थापन अशा विविध स्तरांवर या सेवांचा विस्तार करण्यात येणार आहे.

भारतातील सर्वात मोठे रुग्ण सहाय्य सेवा

या विलीनीकरणामुळे भारतातील सर्वात मोठे रुग्ण सहाय्य सेवा व्यासपीठ उभारण्याचे उद्दिष्ट आहे. देशातील प्रमुख भारतीय तसेच बहुराष्ट्रीय औषधनिर्मिती कंपन्यांना या व्यासपीठाच्या माध्यमातून सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या भागीदारीमुळे विद्यमान ग्राहक, सेवा कार्यक्रम आणि कर्मचारी यांचे सातत्य कायम ठेवत अधिक व्यापक सेवा व्यवस्था उभारण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.

संपर्काच्या क्षेत्रातील दोन पूरक सेवा व्यवस्था

क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडचे संस्थापक, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक महेश माखिजा म्हणाले, “या भागीदारीमुळे रुग्ण सहाय्य आणि रुग्णांशी सातत्यपूर्ण संपर्काच्या क्षेत्रातील दोन पूरक सेवा व्यवस्था एकत्र येत आहेत. या क्षमतांचा एकत्रित वापर करून औषधनिर्मिती कंपन्यांना अधिक व्यापक सेवा आणि मोठ्या प्रमाणावर पोहोच उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. उपचाराच्या संपूर्ण प्रक्रियेत अधिकाधिक रुग्णांना आवश्यक सहाय्य मिळावे, यासाठीही या भागीदारीचा उपयोग होईल. यामुळे क्यूएमएसच्या भागधारकांसाठी मूल्यनिर्मितीलाही चालना मिळेल.”

रुग्णांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि मार्गदर्शन आवश्यक

एचसीएएचचे संचालक आणि डाबर इंडिया लिमिटेडचे संचालक आदित्य बर्मन म्हणाले, “विशेषतः दीर्घकालीन आजारांच्या उपचारांमध्ये केवळ उपचार सुरू करणे पुरेसे नसून त्यानंतरही रुग्णांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि मार्गदर्शन आवश्यक असते. एचसीएएच आणि क्यूएमएसच्या क्षमतांचे एकत्रीकरण झाल्यामुळे रुग्ण तसेच औषधनिर्मिती क्षेत्रातील भागीदारांना उपचाराच्या संपूर्ण कालावधीत सहाय्य देण्यासाठी व्यापक पोहोच, तंत्रज्ञान आणि प्रभावी अंमलबजावणीची क्षमता उपलब्ध होईल.”

रुग्णाची ओळख पटविण्यापासून ते उपचारातील सातत्य

या भागीदारीमुळे आरोग्य व जनजागृती शिबिरे, विविध आजारांची तपासणी, रुग्ण नोंदणी, रोग व्यवस्थापन, उपचाराची सुरुवात, उपचारातील सातत्य, रुग्ण सहाय्य आणि रुग्णांशी सातत्यपूर्ण संपर्क या क्षेत्रांतील अनुभव आणि क्षमता एकत्र येणार आहेत. त्यामुळे रुग्णाची ओळख पटविण्यापासून ते उपचारातील सातत्य राखण्यापर्यंतच्या संपूर्ण प्रवासात औषधनिर्मिती कंपन्यांना अधिक व्यापक सहाय्य उपलब्ध करून देता येणार आहे.

बाजारपेठ सुमारे ७० अब्ज अमेरिकी डॉलर

जागतिक रुग्ण सहाय्य सेवा क्षेत्राची बाजारपेठ सुमारे ७० अब्ज अमेरिकी डॉलर इतकी असल्याचा अंदाज आहे. भारतातील या क्षेत्राची बाजारपेठ दरवर्षी १५ ते २० टक्के दराने वाढत असून, २०३० पर्यंत ती सुमारे १ अब्ज अमेरिकी डॉलर पर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे. औषधनिर्मिती क्षेत्रातील जाहिरात व प्रचारावरील वाढते नियमन, या क्षेत्रातील वाढते औपचारिकीकरण, दीर्घकालीन आजारांचे वाढते प्रमाण, डिजिटल तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि रुग्णांच्या उपचार प्रक्रियेवर सातत्याने लक्ष ठेवण्यावर वाढता भर यामुळे या क्षेत्राच्या वाढीला चालना मिळत आहे.

सेवांच्या क्षेत्रात कार्यरत

क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेडविषयी: क्यूएमएस मेडिकल अलाइड सर्व्हिसेस लिमिटेड ही आरोग्यसेवा उत्पादने आणि सेवांच्या क्षेत्रात कार्यरत असलेली एकात्मिक आरोग्यसेवा कंपनी आहे. रुग्णांशी संपर्क व संवाद, रुग्ण सेवा कार्यक्रम, रोग व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा उपक्रम, रुग्ण तपासणी व वैद्यकीय शिबिरे, आरोग्यसेवा मनुष्यबळ तसेच वैद्यकीय आणि निदानविषयक सेवा अशा विविध क्षेत्रांत कंपनी कार्यरत आहे.

मोठ्या प्रमाणावर सेवा देण्याची क्षमता

एकात्मिक आरोग्यसेवा पद्धतीच्या माध्यमातून क्यूएमएस औषधनिर्मिती कंपन्या, आरोग्यसेवा पुरवठादार आणि रुग्णांना सेवा देते. रुग्णांना आवश्यक उपचार मिळवून देणे, उपचारातील सातत्य राखणे आणि आरोग्यविषयक परिणाम अधिक प्रभावी करण्यावर कंपनीचा भर आहे. आरोग्यसेवा क्षेत्रातील तज्ज्ञता, डिजिटल तंत्रज्ञान आणि मोठ्या प्रमाणावर सेवा देण्याची क्षमता यांच्या आधारे क्यूएमएस आरोग्यसेवा क्षेत्रातील आपली भूमिका अधिक मजबूत करत आहे.

Navi Mumbai विमानतळावरून प्रवाशांना मोठा फटका! IndiGo ने उड्डाणांच्या फेऱ्यांमध्ये केली कपात, पण नेमकं कारण काय?

Web Title: Hcah and qms partner to build indias largest patient support platform ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 04:30 PM

Topics:  

  • Business News
  • health

संबंधित बातम्या

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
1

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
2

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं
3

Forbesच्या श्रीमंतांच्या यादीत मोठा उलटफेर! गौतम अदानी पुन्हा नंबर 1, अंबानींचं स्थान घसरलं

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा
4

लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी छप्परफाड कमाई! ‘या’ कंपनीच्या IPOने दिला ६३% परतावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.