Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lilavati Hospital चा मोठा उपक्रम! श्रवणदोष असलेल्या मुलांसाठी ‘ऑडिटरी व्हर्बल थेरपी’ क्लिनिक सुरू

Lilavati Hospital Launch AVT Clinic : मुंबईतील लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांसाठी समर्पित 'ऑडिटरी व्हर्बल थेरपी' क्लिनिक लाँच केले आहे. कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया झालेल्या मुलांना केवळ आवाज ऐकणेच नाही, तर स्पष्ट बोलणे, शिकणे आणि दैनंदिन जीवनात सहज संवाद साधणे शक्य होणार.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 05, 2026 | 05:49 PM
श्रवणदोषग्रस्त मुलांच्या पुनर्वसनासाठी लीलावती हॉस्पिटलचे महत्त्वपूर्ण पाऊल ( सौजन्य - सोशल मीडिया )

श्रवणदोषग्रस्त मुलांच्या पुनर्वसनासाठी लीलावती हॉस्पिटलचे महत्त्वपूर्ण पाऊल ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • ऐकणे आणि बोलणे आता होणार सोपे!
  • श्रवणदोषग्रस्त मुलांच्या पुनर्वसनासाठी लीलावती हॉस्पिटलचे महत्त्वपूर्ण पाऊल
  • पाहा काय आहे AVT क्लिनिक
Lilavati Hospital Launch AVT Clinic : ऐकण्याची क्षमता कमी असलेल्या मुलांसाठी सर्वसमावेशक पुनर्वसनाची महत्त्वपूर्ण गरज जाणून घेत लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरने समर्पित ऑडिटरी व्हर्बल थेरपी (एव्हीटी) क्लिनिक लाँच केले आहे. या क्लिनिकमध्ये श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांना, विशेषतः ज्यांनी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया केली आहे, त्यांना विशेष थेरपी आणि कुटुंब-केंद्रित सहाय्य दिले जाईल. कॉक्लियर इम्प्लांट हे एक इलेक्ट्रॉनिक श्रवण उपकरण आहे, जे श्रवणशक्ती कमी असलेल्या मुलांना आवाज ऐकण्याची क्षमता देते. या क्लिनिकचा उद्देश मुलांना ऐकणे, बोलणे, संवाद साधणे आणि दैनंदिन जीवन व शिक्षणात समाविष्ट होण्यास मदत करणे आहे. ( Lilavati Hospital Launch AVT Clinic ) 

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

इंटरनॅशनल जर्नल ऑफ प्रिव्हेंटिव्ह मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दर १००० नवजात बालकांमध्ये सुमारे ५-६ मुलांना श्रवणशक्ती कमी असते. अशा मुलांचे श्रवणशक्ती कमी असण्याचे निदान बहुतेक वेळा महत्त्वाच्या विकासात्मक टप्प्यानंतरच होते. यामधून निदर्शनास येते की, लवकर निदान आणि वेळेवर योग्य उपचार आवश्यक आहेत. अशा मुलांमध्ये भाषा आणि बोलण्याची क्षमता उत्तम प्रकारे विकसित होण्यासाठी पुनर्वसन अत्यंत महत्त्वाचे आहे.

मुलांना आवाज ऐकण्यास मदत

कॉक्लियर इम्प्लांट्स मुलांना आवाज ऐकण्यास मदत करतात, पण तेवढ्यानेच प्रभावी संवाद साधता येत नाही. एव्हीटी मुलांना ऐकलेले आवाज वापरून भाषण आणि भाषा कौशल्य विकसित करण्यास मदत करते, ज्यामुळे त्यांना संवाद साधणे, शिकणे आणि इतरांशी सहजपणे संवाद साधणे सोपे होते. नियमित थेरपी सत्रांद्वारे मुलांना दैनंदिन संभाषण आणि शैक्षणिक उपक्रमांमध्ये सहभागी होण्यास सक्षम केले जाते.

मुलाच्या श्रवण प्रवासातील पहिले पाऊल

या लाँचबाबत मत व्यक्त करत लीलावती हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, मुंबईचे पर्मनंट ट्रस्टी फॉर लाइफ श्री. राजीव के. मेहता म्हणाले, “कॉक्लियर इम्प्लांटेशन हे मुलाच्या श्रवण प्रवासातील पहिले पाऊल आहे. आमच्या एव्हीटी क्लिनिकद्वारे आम्ही सुनिश्चित करू इच्छितो की, मुलांना केवळ आवाज ऐकण्याची क्षमता मिळणार नाही, तर शाळा आणि दैनंदिन जीवनात पूर्णपणे सहभागी होण्यासाठी आवश्यक बोलण्याची कौशल्ये आणि आत्मविश्वास देखील विकसित होईल. या उपक्रमामधून गरजू तसेच वंचित घटकांतील मुलांसह सर्व बालकांसाठी दर्जेदार श्रवण पुनर्वसन सहज उपलब्ध करून देण्याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

लाँच करण्यात आलेले एव्हीटी क्लिनिक हॉस्पिटलच्या समाजसेवेप्रती कटिबद्धतेला अधिक दृढ करते आणि मुलांना स्वतंत्र व सुकर जीवन जगण्यासाठी सहाय्य करते.

Share Market Crash : भारतीय शेअर बाजार पुन्हा कोसळला! HDFC Bank चा शेअर धडाम; Nifty 22400 च्या खाली

Web Title: Lilavati hospital launches auditory verbal therapy clinic for children ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2026 | 05:49 PM

Topics:  

  • Business News
  • lilavati hospital

संबंधित बातम्या

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा
1

Fintech Industry : केवळ कर्ज देणे पुरेसे नाही, जबाबदार सवयी महत्त्वाच्या! फिनटेक क्षेत्राच्या भविष्याबाबत तज्ज्ञांचा मोठा दावा

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’!  HCAH अन् QMS चा मोठा निर्णय
2

12 लाखांहून अधिक रुग्णांना मिळणार लाभ! भारतातील सर्वात मोठे ‘पेशंट सपोर्ट प्लॅटफॉर्म’! HCAH अन् QMS चा मोठा निर्णय

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री
3

Lilavati Hospital Robotic O-Arm: लीलावती हॉस्पिटलमध्ये स्पाईन सर्जरीचा नवा अध्याय! AI-सक्षम रोबोटिक O-Arm तंत्रज्ञानाची एन्ट्री

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू
4

Mirae Asset Life Cycle Fund 2056: मिरे अॅसेटचा नवा फंड आला, 2056 पर्यंत पैसे गुंतवा, फक्त ‘इतक्या’ रुपयात SIP सुरू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.