Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Share Market मध्ये घबराट! विदेशी गुंतवणूकदारांनी घेतला काढता पाय; मार्चमध्ये आतापर्यंत तब्बल 52704 कोटी रुपये काढले

पश्चिम आशियातील वाढता तणाव, रुपयाचे घसरते मूल्य आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) भारतीय बाजारपेठेवरील विश्वास डगमगला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Mar 15, 2026 | 07:48 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • FPI भारतीय बाजारपेठेवरील विश्वास डगमगला
  • फेब्रुवारीतील तेजीनंतर पुन्हा विक्रीचा सपाटा
  • गुंतवणूकदारांनी पाठ का फिरवली?
FPI withdrawn 52704 crore : भारतीय शेअर बाजारासाठी मार्च २०२६ हा महिना अत्यंत आव्हानात्मक ठरताना दिसत आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव, रुपयाचे घसरते मूल्य आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांचा (FPI) भारतीय बाजारपेठेवरील विश्वास डगमगला आहे. परिणामी, मार्च महिन्याच्या पहिल्या १५ दिवसांतच विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून तब्बल ५२,७०४ कोटी रुपये (सुमारे ५.७३ अब्ज डॉलर) काढून घेतले आहेत.

जागतिक संकटातही भारताच्या जेम्स अँड ज्वेलरी निर्यातीचं स्थैर्य; चांदीच्या निर्यातीत ५१% ची मोठी झेप!

फेब्रुवारीतील तेजीनंतर पुन्हा विक्रीचा सपाटा

विशेष म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय शेअर बाजारात २२,६१५ कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती, जी गेल्या १७ महिन्यांतील सर्वोच्च गुंतवणूक ठरली होती. मात्र, मार्च सुरू होताच चित्र पुन्हा पालटले आहे. याआधी जानेवारीत ३५,९६२ कोटी, डिसेंबरमध्ये २२,६११ कोटी आणि नोव्हेंबरमध्ये ३,७६५ कोटी रुपयांची विक्री विदेशी गुंतवणूकदारांनी केली होती.

गुंतवणूकदारांनी पाठ का फिरवली?

बाजार तज्ज्ञांच्या मते, या मोठ्या विक्रीमागे प्रामुख्याने तीन मोठी कारणे आहेत: भू-राजकीय तणाव: पश्चिम आशियातील (इराण-इस्रायल-अमेरिका) वाढत्या संघर्षामुळे जागतिक बाजारपेठेत भीतीचे वातावरण आहे. ‘एंजल वन’चे तज्ज्ञ वकारजावेद खान यांच्या मते, होर्मुज सामुद्रधुनीतील संघर्षामुळे कच्च्या तेलाचे दर (ब्रेंट क्रूड) प्रति बॅरल १०० डॉलरच्या पार गेले आहेत.
रुपयाची ऐतिहासिक घसरण: डॉलरच्या तुलनेत रुपया सध्या ९२ च्या पातळीवर पोहोचला आहे. रुपया कमकुवत झाल्यामुळे विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारातील गुंतवणुकीवर परतावा मिळवणे कठीण जात आहे.
चीन आणि तैवानची ओढ: ‘जिओजित इन्व्हेस्टमेंट्स’चे मुख्य रणनीतीकार व्ही. के. विजयकुमार यांच्या मते, भारताच्या तुलनेत सध्या दक्षिण कोरिया, तैवान आणि चीनचे बाजार अधिक आकर्षक वाटत आहेत. त्यामुळे गुंतवणूकदार आपला पैसा भारतीय बाजारातून काढून इतर देशांकडे वळवत आहेत.

कॉर्पोरेट कमाईवर परिणामाची भीती

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारतीय कंपन्यांच्या नफ्यावर (Corporate Earnings) परिणाम होण्याची शक्यता आहे. महागाई वाढल्यास देशाच्या विकासदरावरही (GDP Growth) परिणाम होऊ शकतो, या भीतीपोटी विदेशी गुंतवणूकदार सध्या ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत आहेत.

महत्त्वाची सूचना: हा लेख केवळ माहितीसाठी आहे. शेअर बाजारातील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा (Financial Advisor) सल्ला नक्की घ्या.

LPG सिलेंडरचा तुटवडा! केंद्र सरकारकडून ६० लाख कुटुंबांकडे ही ‘मोठी अपील’

Web Title: Fpi withdraws 52704 crore rupee from indian market

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 15, 2026 | 07:48 PM

Topics:  

  • Business News
  • investment
  • Iran Israel Conflict

संबंधित बातम्या

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर
1

Indus Towers चा मोठा सामाजिक उपक्रम! FY26 मध्ये 3.38 कोटी लोकांना फायदा; एकूण लाभार्थ्यांची संख्या 9 कोटींवर

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ
2

Samsung AI : भारतातील घराघरांत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रवेश; गेल्या 3 वर्षांत सॅमसंगच्या एआय उपकरणांच्या विक्रीत 9 पट वाढ

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ
3

Gold Rate Today : सोन्याचे भाव कडाडले! किमती थेट 1.54 लाखांच्या पार; चांदीतही मोठी वाढ

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी
4

‘बिग बुल’ची निवृत्ती … 96 व्या वर्षी Warren Buffett यांचा मोठा निर्णय; 61 वर्षांत Share Market मधून कमावले तब्बल इतके कोटी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.