
PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड सल्लागार पॉवरअप मनीची मोठी झेप, तब्बल 'इतक्या' दशलक्ष डॉलरची उभारणी
PowerUp Money Mutual Fund: म्युच्युअल फंड (Mutual Fund) सल्लागार वेल्थटेक प्लॅटफॉर्म असलेल्या पॉवरअप मनीने आज घोषणा केली की, त्यांनी पीक XV च्या नेतृत्वाखालील ‘सीरिज ए’ फंडिंगमध्ये 12 दशलक्ष डॉलर्सची उभारणी केली आहे. यामध्ये विद्यमान गुंतवणूकदार ॲक्सेल, ब्लूम व्हेंचर्स आणि के कॅपिटल यांनीही सहभाग घेतला, ज्यांनी त्यांच्या पूर्वीच्या गुंतवणुकीत वाढ केली आहे. या राऊंडमध्ये 8i व्हेंचर्स आणि DevC यांचाही पाठिंबा कायम राहिला, आणि ही घडामोड कंपनीने सीड फंडिंगमध्ये 7.2 दशलक्ष डॉलर्स उभारल्यानंतर अवघ्या सहा महिन्यांनी झाली आहे.
गेल्या दशकात भारतात म्युच्युअल फंडांचा स्वीकार मोठ्या प्रमाणात वाढला आहे, आता जवळपास 60 दशलक्ष गुंतवणूकदार म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि SIP मधील गुंतवणूक विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे. तरीसुद्धा, उच्च-गुणवत्तेच्या, निःपक्षपाती गुंतवणूक सल्ल्याची उपलब्धता त्याच गतीने वाढलेली नाही. अनेक गुंतवणूकदार अजूनही अनौपचारिक सल्ल्यावर किंवा अल्प-मुदतीच्या कामगिरीच्या निर्देशकांवर अवलंबून राहतात, ज्यामुळे अनेकदा दीर्घकाळात अपेक्षित परिणाम मिळत नाहीत.
या निधी उभारणीद्वारे, पॉवरअप मनी आपल्या संशोधन आणि सल्लागार क्षमतांना आणखी मजबूत करण्याचा, पॉवरअप इलाइटचा विस्तार करण्याचा, पॉवरअप इन्फिनिट सुरु करण्याचा आणि आर्थिक साक्षरता व गुंतवणूकदार शिक्षण उपक्रमांमध्ये गुंतवणूक करण्याचा मानस आहे. पुढील तीन वर्षांत, कंपनीने 10 दशलक्ष वापरकर्त्यांना जोडण्याचे ध्येय ठेवले आहे, ज्यामुळे भारतातील किरकोळ संपत्ती व्यवस्थापनाचे भविष्य घडवण्यात तिची भूमिका अधिक दृढ होईल.
हेही वाचा: GDP New Year Update: भारतीय अर्थव्यवस्था होणार ‘रीसेट’? महागाई आणि वाढीचे नव्याने मोजमाप
प्रतीक जिंदाल यांनी 2024 मध्ये स्थापन केलेली पॉवरअप मनी ही कंपनी एक संशोधन-आधारित, शून्य-कमिशन म्युच्युअल फंड सल्लागार प्लॅटफॉर्म तयार करत आहे, जेणेकरून लाखो भारतीयांना पारंपरिक खर्चाच्या तुलनेत खूपच कमी खर्चात उच्च-गुणवत्तेचा, निःपक्षपाती गुंतवणुकीचा सल्ला उपलब्ध होईल. SEBI-नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार (RIA) म्हणून, हे व्यासपीठ सर्व शिफारसी गुंतवणूकदारांच्या दीर्घकालीन संपत्ती निर्मितीच्या ध्येयांशी पूर्णपणे सुसंगत राहतील याची निश्चिती करते.
पॉवरअप मनी ॲप वापरकर्त्यांना त्यांचे म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ विनामूल्य तपासण्याची आणि पोर्टफोलिओचे आरोग्य व कामगिरीचे मूल्यांकन करण्याची सुविधा देते. सुरुवात झाल्याच्या आठ महिन्यांच्या आत, या व्यासपीठावर 5 लाखांहून अधिक वापरकर्ते जोडले गेले आहेत आणि सध्या ते 65,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मालमत्तेचा मागोवा घेत आहे, ज्यावरून या प्लॅटफॉर्मवर वापरकर्त्यांचा फारच उत्साही सहभाग असल्याचे दिसून येते.
पॉवरअप मनीची प्रमुख सेवा, पॉवरअप इलाइट, वार्षिक 999 रुपयांच्या शुल्कात थेट ॲपद्वारे वैयक्तिकृत म्युच्युअल फंडचा सल्ला देते. गुंतवणूक करण्याची मनापासून इच्छा असलेल्यांसाठी डिझाइन केलेली ही सबस्स्क्रिप्शन सेवा फंडची निवड, पोर्टफोलिओ रिवीव, रिबॅलन्सींग, मालमत्ता वाटप आणि संस्थात्मक-दर्जाच्या संशोधनावर आधा रित संपूर्ण पोर्टफोलिओ मार्गदर्शन यांचा समावेश करते. सुरुवात झाल्यापासून, पॉवरअप एलिटने 25,000 हून अधिक सशुल्क सदस्य जोडले आहेत आणि भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या सबस्क्रिप्शन-आधारित म्युच्युअल फंड सल्ला सेवांपैकी एक म्हणून उदयास आली आहे.
हेही वाचा: Gold-Silver Rate: सोने-चांदी नव्या उच्चांकावर, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा
पॉवरअप मनीचे अध्यक्ष आणि CEO प्रतीक जिंदाल म्हणाले, “उच्च-गुणवत्तेचा, निःपक्षपाती म्युच्युअल फंड सल्ला हा विशेषाधिकार असता कामा नये,” ते पुढे म्हणाले, “अधिक भारतीय म्युच्युअल फंडमध्ये सहभागी होत असताना, गुंतवणूकदारांना शिस्तबद्ध, दीर्घकालीन निर्णय घेण्यास मदत करणाऱ्या विश्वसनीय, संशोधनावर आधारित सल्ल्याच्या उपलब्धतेमध्ये खरी उणीव आहे. या निधी उभारणीमुळे आम्हाला आमच्या सल्ला आणि संशोधन क्षमता मजबूत करण्यास, ‘पॉवरअप इलाइट’चा विस्तार करण्यास आणि ‘पॉवरअप इन्फिनिट’ सुरू करण्यास मदत होईल, कारण आम्ही भारताचे सर्वात विश्वासार्ह, शून्य-कमिशन म्युच्युअल फंड सल्लागार प्लॅटफॉर्म तयार करण्याच्या दिशेने काम करत आहोत आणि लाखो गुंतवणूकदारांना स्पष्टता व आत्मविश्वासाने गुंतवणूक करण्यास मदत करत आहोत.”
पीक XV चे प्रमुख नवेंदू शर्मा म्हणाले की, “भारताला लोकसंख्येच्या मोठ्या प्रमाणावर आर्थिक सल्ला देण्यासाठी तंत्रज्ञान-आधारित व्यासपीठाची गरज आहे. म्युच्युअल फंड हे सर्वसामान्य आणि श्रीमंत भारतीयांसाठी आर्थिक मालमत्तेमध्ये गुंतवणूक करण्याचे एक नैसर्गिक माध्यम आहे. पॉवरअपकडे म्युच्युअल फंड सल्लागार सेवा मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्यासाठी एक हुशार पण सोपा दृष्टिकोन आहे. ही टीम त्यांची म्युच्युअल फंड उत्पादनांची श्रेणी अधिक विकसित करेल आणि कालांतराने या प्रदेशासाठी एक प्रमुख संपत्ती आणि मालमत्ता व्यवस्थापन व्यासपीठ तयार करेल, हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”
ॲक्सेलचे भागीदार प्रयंक स्वरूप म्हणाले की, “पॉवरअप मनीने एलिटसोबत मिळून जे काही तयार केले आहे, ते विशेषतः प्रभावी आहे. त्यांनी उच्च-गुणवत्तेच्या म्युच्युअल फंड सल्लागार सेवेचे यशस्वीपणे उत्पादन-रूपांतर केले आहे—त्याला मोठ्या प्रमाणावर सुलभ बनवले आहे, त्याच वेळी उच्च स्तराचे पर्सनलायजेशन आणि गुणवत्ता टिकवून ठेवली आहे. संपत्ती व्यवस्थापनामध्ये हा समतोल साधणे अत्यंत कठीण असते.”
ही कंपनी ‘पॉवरअप इन्फिनिट’ नावाचे एक पूर्णपणे व्यवस्थापित गुंतवणूक सल्लागार उत्पादन सुरू करण्याच्या तयारीत आहे, जे पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे समर्पित 1:1 सल्ला, ध्येय नियोजन आणि पर्सनलाइज्ड गुंतवणूक धोरण उपलब्ध करून देते. ‘पॉवरअप इलाइट’ आणि ‘पॉवरअप इन्फिनिट’ मिळून एक सर्वसमावेशक सल्लागार प्रणाली तयार करतील, ज्यामध्ये ॲप-आधारित वैयक्तिक मार्गदर्शनापासून ते तज्ञ सल्लागारांच्या नेतृत्वाखालील पूर्णपणे व्यवस्थापित संपत्ती व्यवस्थापन उपायांपर्यंतच्या सेवांचा समावेश असेल.