Gold-Silver Rate: सोने-चांदी नव्या उच्चांकावर, अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा
Gold-Silver Rate: डॉलर कमकुवत झाल्यामुळे आणि अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपात होण्याची अपेक्षा असल्याने सोमवारी वायदा व्यवहारात सोने आणि चांदीच्या किमती सर्वकालीन उच्वांकावर पोहोचल्या, मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर फेब्रुवारी २०२६ च्या कराराची किंमत १.६२८ रुपये किंवा १.२१ टक्क्यांनी वाढून १.३५.८२४ रुपये प्रति १० ग्रॅम झाली. गेल्या आठवड्यात सोन्याच्या किमती ५७४ रुपये किंवा ०.४३ टक्क्यांनी वाढल्या होत्या. एमसीएक्सवर चांदीच्या वायदा किंवा सराफा व्यवहारातही मोठी वाढ झाली. मार्च २०२६ च्या करारात ६,१४४ रुपये किंवा २.९५ टक्क्यांनी वाढ होऊन तो २,१४.५८३ रुपये प्रति किलोग्रॅमचा सर्वकालीन उच्चांक गाठला.
हेही वाचा: 8th Pay Commission: १ जानेवारी २०२६ पासून पगारवाढ शक्य? लाखो सरकारी कर्मचाऱ्यांची उत्सुकता शिगेला
गेल्या आठवड्यात तो १५,५८८ रुपये किंवा ८.०८ टक्क्यांनी वाढला होता. सोने आणि चांदीच्या किमतींनी आठवड्याची सुरुवात देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नवीन उच्चांक गाठून केली, असे मेहता इक्विटीज लिमिटेडचे कमोडिटीजचे उपाध्यक्ष राहुल कलंत्री म्हणाले. सहा जागतिक चलनांच्या तुलनेत डॉलरच्या ताकदीचे मोजमाप करणारा डॉलर निर्देशांक ९८.६० वर स्थिर राहिला, ज्यामुळे बुलियन किमतींना आणखी आधार मिळाला, जागतिक स्तरावर, फेब्रुवारी डिलिव्हरीसाठी कॉमिक्स सोन्याचा वायदा ४२ डॉलर किंवा ०.९६ टक्क्यांनी वाढून ४,४२९.३ डॉलर प्रति औंस या विक्रमी उच्चांकावर पोहोचला.
मार्च २०२६ डिलिव्हरीसाठी कॉमेक्स चांदीचा वायदा २.०४ डॉलर किंवा ३.०२ टक्क्यांनी वाढून परदेशी व्यापारात ६९.५२ डॉलर प्रति औंस या सर्वकालीन उच्यांकावर पोहोचला. गेल्या आठवड्यात, तो ५.४८ डॉलर किंवा ८८४ टक्क्यांनी वाढला होता. सध्या भारतीय सराफा बाजारात सोने-चांदीच्या दरांची चढ-उतार सुरू आहे. मुंबईत २३ डिसेंबर २०२५ रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम १५०० रुपयांनी महागले आहे. ज्यामुळे २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम १.३८ लाख रुपयांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली. चांदी प्रति किलो २.१५ लाख रुपयांवर पोहोचली असून कालच्या तुलनेत चांदीच्या भावात अंदाजे ५ हजारांनी वाढ झाली आहे.व्यापार आणि ग्राहक या वाढीमुळे चिंतेत आहे.






