Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol Diesel Price Hike : सणासुदीत सामान्यांना आणखी एक झटका… पेट्रोल – डिझेल महागलं! ‘या’ कंपन्यांनी वाढवले दर; किती झाली वाढ?

Petrol Diesel Price Hike : महागाईच्या काळात सर्वसामान्यांना एक मोठा झटका बसला आहे. एक प्रमुख खाजगी ऑईल मार्केटिंग कंपनीने पेट्रोल डिझेलच्या दरांत मोठी वाढ केली आहे. याचा थेट परिणाम सामान्यांच्या खिशावर होणार आहे. आता यानंतर सरकारी ऑईल कंपन्यांदेखील दर वाढ करतील का अशी सामान्यांना भिती वाटू लागली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 12, 2026 | 12:28 PM
सणासुदीत सामान्यांना आणखी एक झटका... ( सौजन्य - सोशल मीडिया )

सणासुदीत सामान्यांना आणखी एक झटका... ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • सणासुदीत सामान्यांना आणखी एक झटका…
  • पेट्रोल – डिझेल महागलं!
  • ‘या’ कंपन्यांनी वाढवले दर
Petrol Diesel Price Hike : सणासुदीचा काळ सुरु झाला आहे. हा काळ उत्साहाचा आनंदाचा आणि सोहळ्याचा असतो. पण सध्याच्या परिस्थितीमध्ये या आनंदाला मोठा झटका मिळत असल्याचं दिसून येत आहे. जागतिक स्तरावरील परिस्थिती आणि त्यामुळे महागाईचा वाढता भडका सामान्यांचा आनंद हिरावून घेत आहे. आताही एक तशीच काहीशी बातमी समोर येत आहे. हा फटका इंधनाच्या दरांच्या रुपात तुम्हाला बसणार आहे. जर तुम्ही पेट्रोल – डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर जात असाल तर ही बातमी नक्की वाचा. ( Petrol Diesel Price Hike ) 

Mutual Fund गुंतवणूकदाराच्या मृत्यूनंतर काय? पैशांवर राहणार कोणाचा हक्क? SEBI चे नियम काय सांगतात?

पेट्रोल डिझेलचे दर मागील काही दिवसांपासून स्थिर असले तरीही आता त्याच वाढ झाली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजची खासगी इंधन कंपनी जिओ- बीपीने पेट्रोल – डिझेलच्या दरात वाढ केली आहे. कंपनीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपये तर डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांची वाढ केली आहे. हे नवे दर रविवारी ११ ऑक्टोबर 2026 पासून सकाळी 6 वाजल्यापासून लागू झाले आहेत. या दरवाढीनंतर आता ग्राहकांना जिओ- बीपीच्या पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. यापू्र्वी, खासगी तेलं कंपनी नायरा एनर्जीनेही पेट्रोल- डिझेलच्या दरांत वाढ केली होती. त्यामुळे आता याचा परिणाम इतर पेट्रोल पंपावरही होऊन दर वाढ होणार की काय अशी भिती सामान्यांमध्ये निर्माण झाली आहे.

दरवाढीमुळे किती झाले पेट्रोल- डिझेलचे दर?

मिंटच्या वृत्तानुसार जिओ- बीपीने पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 5 रुपयांची आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांना वाढ केली आहे. रविवारपासून लागू झालेल्या या दरवाढीमुळे, पंजाबमध्ये पेट्रोल अंदाजे 108.54 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 99.19 रुपये प्रति लिटर दराने विकलं जात आहे. त्यामुळे संपूर्ण देशात दरवाढ झाली आहे. हरियाणात जिओ-बीपी पंपावर पेट्रोल अंदाजे 109.80 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 97.75 प्रति लिटर दराने विकले जात आहे. यापूर्वी खासगी तेल कंपनी नायरा एनर्जीनेही पेट्रोलच्या दरात 5 रुपयांनी आणि डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली होती.

पहिल्यांदाच दरवाढ

देशात 2227 पेट्रोल पंप असलेली जिओ बीपी ही कंपनी आहे. ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ब्रिटिश ऊर्जा कंपनी बीपी यांची संयुक्त कंपनी आहे. या कंपनीने यावर्षी पहिल्यांदाच पेट्रोल- डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. पश्चिम आशियातील सुरु असलेला संघर्ष आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीतून होणाऱ्या तेल पुरवठ्यातील होणाऱ्या व्यत्ययांमुळे आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या किमतींवर दबाव निर्माण झाला आहे. याचा परिणाम इंधन विक्रेत्यांच्या नफ्यावर थेट परिणाम करत आहे. त्यामुळे जिओ बीपी आणि इतर खासगी कंपनींना इंधन दरवाढीचा निर्णय घेतला आहे.

सरकारी तेल कंपन्यांच्या दरांत काही बदल?

आतापर्यंत खासगी कंपन्यांनी इंधर दरांत वाढ केली आहे. पण इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) यांसारख्या सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवरील नियमित पेट्रोल आणि डिझेलचे दर जैसे थे राहिले आहेत.त्यामुळे खाजगी आणि सरकारी तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांमधील दरांचा फरक बराच वाढला आहे. त्यामुळे ग्राहकांनी इंधन भरायला जाताना आपल्या जवळच्या पंपावरील नवीन दर नक्की तपासावे.

घर घेणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी! लाखो रुपयांची होणार बचत; ‘या’ 12 सरकारी बँका देताहेत सर्वात स्वस्त Home Loan

Web Title: Fuel price hike jio bp fuel companies increase petrol diesel rates details ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 12:28 PM

Topics:  

  • Petrol diesel price
  • Reliance Jio

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.