Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गौतम अदानी चीनमध्ये आपली पाळे-मुळे पसरवणार; स्थापन केली नवीन कंपनी!

गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहही चीनमध्ये पोहोचला आहे. या शेजारील देशात आपला व्यवसाय वाढवण्यासाठी अदानी समूहाने तेथे उपकंपनीची नोंदणी केली आहे. यामुळे आता अदानी समूह चीनमध्येही आपली मुळे पसरवणार आहे. हे काम अदानी एंटरप्रायझेसची उपकंपनी अदानी ग्लोबल पीटीई, सिंगापूर मार्फत करण्यात आले आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Sep 08, 2024 | 08:19 PM
दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गौतम अदानींची छप्परफाड कमाई; तासाला कमावले इतके हजार कोटी!

दिवाळी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये गौतम अदानींची छप्परफाड कमाई; तासाला कमावले इतके हजार कोटी!

Follow Us
Close
Follow Us:

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये व्यवसाय करणाऱ्या दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी आता ‘ड्रॅगन’ किल्ल्यामध्ये पाय रोवले आहेत. अदानी यांनी चीनमधील शांघाय शहरात आपली कंपनी सुरू केली आहे. चीनमध्ये कंपनी सुरू करणे, ही अदानी समूहासाठी एक धोरणात्मक वाटचाल आहे. याचा फायदा अदानी ग्रुपच्या इतर कंपन्यांना होणार आहे. ही कंपनी चीनमध्ये अदानी समूहासाठी नवीन बाजारपेठ उघडण्यास मदत करणार आहे.

काय आहे कंपनीचे नाव?

अदानी ग्रुपने सप्लाय चेन सॉल्यूशन आणि प्रोजेक्ट मॅनेजमेंटसाठी चीनमध्ये एक कंपनी स्थापन केली आहे. अदानी एंटरप्रायझेसने सांगितले आहे की, त्यांच्या सिंगापूरस्थित उपकंपनीने 2 सप्टेंबर 2024 रोजी चीनमधील शांघाय येथे अदानी एनर्जी रिसोर्सेस (शांघाय) कंपनी या नावाने एका कंपनीची स्थापना केली आहे.

हे देखील वाचा – पर्सनल लोन घेताना काय काळजी घ्यावी, कर्जदारांना या गोष्टी माहिती असायलाच हव्या…

अदानी एनर्जी रिसोर्सेस ही कंपनी खाणकाम, रस्ता, विमानतळ, डेटा सेंटर आणि वॉटर इन्फ्रा व्यवसायात गुंतलेली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अदानी एनर्जी रिसोर्सेस (शांघाय) कंपनी (AERCL)ची स्थापना आणि नोंदणी पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना कंपनी कायद्यानुसार 2 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली आहे. कंपनीने अद्याप त्यांचे व्यावसायिक कामकाज सुरू केलेले नाही.

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स

दरम्यान, शुक्रवारी (ता.6) अदानी एंटरप्रायझेसच्या शेअर्समध्ये 1.25 टक्क्यांची घसरण दिसून आली. कंपनीचा शेअर 38 रुपयांच्या घसरणीसह 2976.85 रुपयांवर बंद झाला. 3 जून रोजी कंपनीने 3,743 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला होता. शुक्रवारी कंपनीच्या मार्केट कॅपला 18,692.79 कोटी रुपयांचे नुकसान झाले. यामुळे कंपनीचे मूल्यांकन 3,39,361.23 कोटी रुपयांवर आले आहे.

हे देखील वाचा – जगातील सर्वात महागडे बेट, ज्या ठिकाणी एक दिवस थांबायचे भाडे आहे तब्बल 84 लाख रुपये!

नैरोबी विमानतळासाठी उपकंपनी

अलीकडेच अदानी एंटरप्रायझेसने केनियामध्ये उपकंपनी एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर पीएलसीची नोंदणी केली होती. भारतातील 7 विमानतळांचे व्यवस्थापन करणारी कंपनी आता परदेशातही आपला ठसा वाढवत आहे. या क्षेत्रात गुंतवणूक मिळवण्यासाठी, ग्लोबल एअरपोर्ट्स ऑपरेटर एलएलसी नावाची कंपनी नुकतीच अबू धाबीमध्ये स्थापन करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, अदानी समूहाने नैरोबी येथील जोमो केन्याटा आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुंतवणुकीसाठी केनिया सरकारला प्रस्ताव सादर केला होता. देशाबाहेरील अदानी समूहाचे हे पहिले विमानतळ होऊ शकते.

Web Title: Gautam adani owned adani group enters into china and registered subsidiary for project management services

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2024 | 08:19 PM

Topics:  

  • Adani Group
  • Gautam Adani

संबंधित बातम्या

अदानी ग्रीन एनर्जीचे २२०० मेगावॅटचे वीज प्रकल्प रद्द! कंपनीला मोठ नुकसान, जाणून घ्या
1

अदानी ग्रीन एनर्जीचे २२०० मेगावॅटचे वीज प्रकल्प रद्द! कंपनीला मोठ नुकसान, जाणून घ्या

Rahul Gandhi News: ओडिसाचे सरकार अदानी  चालवत आहेत:  राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल
2

Rahul Gandhi News: ओडिसाचे सरकार अदानी चालवत आहेत: राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल

गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, अदानी एंटरप्रायझेस एनसीडीद्वारे उभारणार १,००० कोटी; जाणून घ्या
3

गुंतवणूकदारांसाठी महत्वाची अपडेट, अदानी एंटरप्रायझेस एनसीडीद्वारे उभारणार १,००० कोटी; जाणून घ्या

ना TATA ना Infosys, बिझनेस ब्रँडमध्ये वेगाने वाढतोय Adani Group; एक वर्षात 80% ने वाढली व्हॅल्यू
4

ना TATA ना Infosys, बिझनेस ब्रँडमध्ये वेगाने वाढतोय Adani Group; एक वर्षात 80% ने वाढली व्हॅल्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.