Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 22 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Table Tennis Championship : 14 वर्षीय विवान दवेची दुहेरी सुवर्णभरारी; अंडर-१७, अंडर-१९ गटांत विजेतेपद

Table Tennis Championship : 14 वर्षीय विवान दवेने गुजरात राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत अंडर-17 आणि अंडर-19 या दोन्ही गटांत सुवर्णपदके जिंकली. आता त्याचे लक्ष चेन्नईतील डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर स्पर्धेवर आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Oct 22, 2026 | 02:26 PM
Table Tennis Championship : 14 वर्षीय विवान दवेची दुहेरी सुवर्णभरारी; अंडर-१७, अंडर-१९ गटांत विजेतेपद

Table Tennis Championship : 14 वर्षीय विवान दवेची दुहेरी सुवर्णभरारी; अंडर-१७, अंडर-१९ गटांत विजेतेपद

Follow Us
Follow Us:
  • वैयक्तिक व सांघित गटात जेतेपद
  • ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न
  • चेन्नईतील डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर स्पर्धा खेळणार
 

अवघ्या 14 वर्षांच्या विवान दवेने गुजरात राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत (Table Tennis Championship) दुहेरी सुवर्णपदक पटकावत आपली चमक दाखवली. गांधीाधाम येथे 16 ते 20 ऑक्टोबरदरम्यान झालेल्या या स्पर्धेत विवानने 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील अशा दोन्ही गटांत सुवर्णपदक जिंकले. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या आणि अनुभवी प्रतिस्पर्ध्यांना नमवत त्याने ही उल्लेखनीय कामगिरी केली.

विवान दवे हा अदाणी स्पोर्ट्सलाइनच्या ‘गर्व है’ या क्रीडा उपक्रमाशी संबंधित खेळाडू आहे. यापूर्वी तो 15 वर्षांखालील गटात भारतात दुसऱ्या क्रमांकावर होता. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधील सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर तो आपला खेळ अधिक उंचावत आहे.

यंदाच्या वर्षाच्या सुरुवातीला कानपूर येथे झालेल्या यूटीटी राष्ट्रीय क्रमवारी टेबल टेनिस स्पर्धेत विवानने 17 वर्षांखालील गटात सुवर्णपदक पटकावले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उलानबटार येथे झालेल्या डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर स्पर्धेत त्याने 15 वर्षांखालील गटात रौप्यपदक, तर ताश्कंद येथील स्पर्धेत याच गटात कांस्यपदक जिंकले होते.

वैयक्तिक व सांघित गटात जेतेपद

2025 मध्ये झालेल्या 87 व्या यूटीटी आंतरराज्य सब-ज्युनिअर आणि कॅडेट राष्ट्रीय टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धेतही विवानने दुहेरी सुवर्णपदकाची कामगिरी केली होती. त्या वेळी त्याने 15 वर्षांखालील वैयक्तिक आणि सांघिक गटांत विजेतेपद मिळवले होते.

विवानने वयाच्या पाचव्या वर्षी टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. भविष्यात ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करून देशासाठी सुवर्णपदक जिंकण्याचे त्याचे स्वप्न आहे. अदाणी स्पोर्ट्सलाइनच्या ‘गर्व है’ उपक्रमांतर्गत त्याला टेबल टेनिसचे साहित्य, क्रीडा उपकरणे आणि स्पर्धांसाठी प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या मदतीमुळे त्याला सराव आणि कामगिरीवर लक्ष केंद्रित करता येते. विवान 1 ऑगस्ट 2026 पासून या उपक्रमाशी जोडला गेला आहे.

Asian Para Games: उत्तर प्रदेशच्या लेकीचा जपानमध्ये डंका! स्वाती चौधरीने जिंकले ‘Silver’; योगींकडून कौतुकाचा वर्षाव

ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचे स्वप्न

आपल्या यशाबद्दल विवान म्हणाला, राज्यस्तरीय स्पर्धेत 17 वर्षांखालील आणि 19 वर्षांखालील या दोन्ही गटांत सुवर्णपदक जिंकणे हा माझ्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. मी माझ्यापेक्षा मोठ्या आणि अधिक अनुभवी खेळाडूंविरुद्ध खेळत होतो. त्यामुळे प्रत्येक सामना माझ्यासाठी कसोटी ठरला आणि त्यातून मला खूप काही शिकायला मिळाले.

तो पुढे म्हणाला, मी पाचव्या वर्षी टेबल टेनिस खेळण्यास सुरुवात केली. ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी खेळणे आणि देशासाठी सुवर्णपदक जिंकणे हे माझे नेहमीच स्वप्न राहिले आहे. अदाणी स्पोर्ट्सलाइनने मला किट, उपकरणे आणि प्रवासासाठी मदत केली. त्यामुळे मला सराव आणि कामगिरीवर पूर्ण लक्ष केंद्रित करता येते.

विवान आता 23 ते 26 ऑक्टोबरदरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर स्पर्धेत सहभागी होणार आहे. त्यानंतर वर्षअखेरीस पंजाबमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय क्रमवारी टेबल टेनिस स्पर्धेवर त्याचे लक्ष असेल.

Cricket News: ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये खळबळ! ‘या’ स्टार गोलंदाजावर कारवाई; दोन सामन्यांची घातली बंदी

💡

Frequently Asked Questions

  • Que: विवान दवेने गुजरात राज्य टेबल टेनिस स्पर्धेत कोणती कामगिरी केली?

    Ans: विवानने १७ वर्षांखालील आणि १९ वर्षांखालील या दोन्ही गटांत सुवर्णपदके जिंकली.

  • Que: गुजरात राज्य टेबल टेनिस अजिंक्यपद स्पर्धा २०२६ कुठे झाली?

    Ans: ही स्पर्धा १६ ते २० ऑक्टोबरदरम्यान गुजरातमधील गांधीधाम येथे झाली.

  • Que: विवान दवेची पुढील स्पर्धा कोणती आहे?

    Ans: विवान २३ ते २६ ऑक्टोबरदरम्यान चेन्नई येथे होणाऱ्या डब्ल्यूटीटी यूथ कंटेंडर स्पर्धेत सहभागी होणार आहे.

Web Title: Vivan dave double gold gujarat state table tennis championship 2026 rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 22, 2026 | 02:26 PM

Topics:  

  • Adani Group
  • Gujrat
  • Table Tennis

संबंधित बातम्या

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!
1

Asian Para Games 2026: टेबल टेनिसमध्ये भारताच्या नावे तब्बल 5 पदकं, सहाना-प्राची आणि भाविनाने रचला इतिहास!

Gujarat Crime : रिफायनरी मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या; 1.53 कोटींच्या सोने-चांदीच्या लुटीप्रकरणी 10 जणांना अटक
2

Gujarat Crime : रिफायनरी मॅनेजरची गोळ्या झाडून हत्या; 1.53 कोटींच्या सोने-चांदीच्या लुटीप्रकरणी 10 जणांना अटक

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…
3

Table Tennis: टेनिस कोर्टवर युवा खेळाडूंचा जलवा! मुलींच्या गटात इशिता पाटीलने थेट…

Table Tennis: २२ कंपन्या, १०९ खेळाडू अन् टेबल टेनिसचा महासंग्राम! पुण्यात औद्योगिक क्रीडा स्पर्धा संपन्न
4

Table Tennis: २२ कंपन्या, १०९ खेळाडू अन् टेबल टेनिसचा महासंग्राम! पुण्यात औद्योगिक क्रीडा स्पर्धा संपन्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.