मुंबई : गोफ्युएलने (Go Fuel) आता आपले कार्य मुंबईत (Mumbai) सुरु केले आहे, या अंतर्गत आता मुंबईकरांना डिझेल (Diesel) त्यांच्या दारात उपलब्ध होणारआहे. गोफ्युएल या स्टार्टअप (Startup) उपक्रमा अंतर्गत फ्युएल आंथ्रप्रेनियर कडून आता मुंबईतील ग्राहकांना हायस्पीड डिझेल (एचएसडी) हे आता दारात उपलब्ध करुन दिले जाणार आहे.
शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कंपनी कडून गोफ्युएल ॲपची (Go Fuel App) आणि त्यांच्या मुंबईतील कार्याची सुरुवात ही त्यांच्या फ्रॅन्चाईजी पार्टनर (Franchise partner) असलेल्या रावत एनर्जीज (Rawat Energies) च्या माध्यमातून करण्यात आली.
प्रसिध्द दक्षिण भारतीय अभिनेता आणि गजनी फेम सुप्रसिध्द प्रदीप रावत यांच्या हस्ते हे उद्घाटन करण्यात आले (It was inaugurated by renowned South Indian actor and Ghajini fame Pradeep Rawat), यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये सीएच श्रीनिवास, सीजीएम रिटेल वेस्ट झोन एचपीसीएल, पावस- रिजनल मॅनेजर वेस्ट झोन, एचपीसीएल तसेच गोफ्युएल चे संस्थापक आणि सीईओ विनोदराज यांच्यासह गोफ्युएल चे सहसंस्थापक आदित्य मीसाला इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
गोफ्युएलचे संस्थापक आणि सीईओ विनोदराज (Vinodraj, Founder and CEO of Go Fuel) यांनी त्यांच्या टीमच्या यशस्वीतेत मोठे योगदान देऊन ग्राहकांचा तसेच ऑईल मार्केटिंग कंपन्यांचा विश्वास जिंकलाआहे, याच बरोबर त्यांनी गो झॅपची सुरूवात केली असून यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगची गरजही पूर्ण होणार आहे. मोबिलिटी आणि वाहतूक क्षेत्रात अनेक संधी असून गो फ्युएल ने आता डिझेल डिलिव्हरी बरोबरच लवकरच योग्य प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही पदार्पण करण्याची योजना आखली आहे.
गेल्या महिन्यातील स्विगी आणि बिग बास्केट कडून मिळालेल्या प्रतिसादानंतर आंम्हाला आशा आहे की १० हजार इलेक्ट्रिक बाईक्स ना गो फ्युएल चार्जिंग/स्वॅपिंग पध्दतींचा उपयोग होईल व त्यामुळे लोक यशस्वीपणे आयसीई कडून इलेक्ट्रिक वाहनांकडे आपली पावले वळवतील. आम्ही आमचे अस्तित्व हे इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रातही वाढवले असून आमचा सब ब्रॅन्ड गो झॅप च्या माध्यमातून आम्ही मोबाईल आणि स्टेशनरी इलेक्ट्रिक चार्जिंग (एसी आणि डीसी), बॅटरी स्वॅपिंग, सोलर पॅनल्स आणि ईव्ही २ व्हीलर सबस्क्रीप्शन च्या मदतीने लोकांच्या नैसर्गिक उर्जेच्या गरजा पूर्ण करण्यावर जोर दिला आहे.
आम्ही अनेक आंतरराष्ट्रीय ओईएम बरोबर सहकार्य करुन संपूर्ण युरोपातील महत्त्वपूर्ण ठिकाणी १५ हजारांहून अधिक चार्जिंग स्टेशन्स सुरू केली असून भारतातही महत्त्वपूर्ण ऑईल मार्केटिंग कंपन्यांसह संपूर्ण भारतात इलेक्ट्रिफिकेशन पार्टनर बनलो आहोत.यामुळे देशभरांत ईव्हीसाठी रिटेल आऊटलेट्स सुरू करणे शक्य होणार आहे.
२ आणि ३ चाकी वाहनांसाठी नाविन्यपूर्ण अशा स्वॅप ऑन द गो उपाय सुरू करण्यात येत आहेत. गोझॅप मध्ये सुध्दा सबस्क्रीप्शन वर आधारीत ईव्ही २ आणि ३ चाकी वाहनांसाठी डिलिव्हरी सेवा सुरू आहे. आम्ही नुकतेच बिग बास्केट आणि स्विगी बरोबर सहकार्य करार केला असून त्यानुसार चेन्नई मध्ये प्रायोगिक तत्वावर सबस्क्रीप्शनवर आधारीत ईव्ही दुचाकी ना पुरवठा केला. मिळालेल्या प्रतिसादानंतर चालकांना कमी खर्चासह सोपी डिलिव्हरी करणे शक्य झाले. या सगळ्या सोपेपणा मुळे गोफ्युएल सुपर ॲपच्या माध्यमाचा उपयोग केवळ एका बटणावरुन करु लागले आहेत.” ते पुढे म्हणाले.
या वेळी बोलतांना आदित्य मीसाला यांनी सांगितले “ आमच्या नाविन्यपूर्ण, तंत्रज्ञानावर आधारीत उपायांमुळे आणि अथक प्रयत्नांमुळे गोफ्युएलला आता सर्व तीनही ओएमसीज (ऑईल मार्केटिंग कंपनीज) – आयओसीएल, बीपीसीएल आणि एचपीसीएल कडून पुरवठा करण्याचा परवाना प्राप्त झाला आहे, परिणामी आम्ही देशातील पहिली बिगरसरकारी अशी तेल वितरण करणारी कंपनी ठरलो आहोत. आमच्या कडे आमचे स्वत:चे असे मोबाईल ॲप आहे (ॲन्ड्रॉईड आणि आयओएस) आणि तंत्रज्ञानाचे उपाय असल्यामुळे तेलाची वाहतूक आणि पुरवठा करण्यासाठी योग्य पध्दती उपलब्ध आहेत. उदाहरणार्थ आयओटी कनेक्टिव्हिटी सह गो लॉक मेकॅनिझम असल्याने ओटीपीवर आधारीत पुरवठा होऊन ग्राहकांच्या ऑर्डरची पुर्तता केली जाते, यामुळे कोणतेही नुकसान किंवा भेसळ होत नाही. अतिशय गडद रंगात रंगवलेल्या आमच्या छोट्या ट्रक मध्ये आयओटी वर आधारीत ब्राऊझर्स असल्यामुळे ते कुठे रहात नाहीत आणि रस्त्यावरही ताजेपणा दिसून येतो, परिणामी या गोष्टी पुरवठाशृंखलेतील अनोखे रंग दाखवतात.”
ते पुढे म्हणाले २०२२ च्या चौथ्या तिमाहीत (ऑक्टोबर-डिसेंबर) गोफ्युएल कडून त्यांचे कार्य आणि ब्राऊझर्स हे बंगळूरु, विजयवाडा आणि सालेम मध्ये सुरू करण्यात येणार आहेत. आमच्या विभागवार वाढीच्या योजने अंतर्गत पुढील १८ महिन्यांच्या कालावधीत आम्ही हे नेटवर्क संपूर्ण देशभरात नेणार आहोत. २०२४ पर्यंत आम्ही १००० डिझेल डिलिव्हरी वाहने संपूर्ण भारतात सुरु करणार आहोत. चेन्नई मध्ये आमचा पायलट ब्राऊझर फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरू करण्यात आला होता आणि त्यानंतर जुळे शहर हैद्राबाद आणि सिकंदराबाद येथे सुरू करण्यात आले, त्यामुळे सुरु केल्यापासून केवळ १८ महिन्यांच्या आमच्याया प्रवासात ५० हून अधिक ग्राहक तसेच सर्वाधिक ३० कोटी रुपयांचा व्यवसाय आम्ही करु शकलो. व्यावसायिक ग्राहक, मोठ्या अपार्टमेंट्सची कॉम्प्लेक्सेस, हॉस्पिटल्स, मॉल्स, बँका आणि वेअरहाऊसेस यांच्या कडून मोठी मागणी असते. आम्ही अगदी छोट्या ऑर्डर्स या आयओटी वर आधारीत स्मार्ट जेरी कॅन्स (२० लीटर्स) च्या माध्यमातून करतो आणि यामध्ये ओटीपीवर आधारीत व बायोमेट्रिक लॉक्स ने युक्त असल्यामुळे गळती होणे किंवा भेसळ होत नाही.
मध्यम कालावधीतील आमचे लक्ष्य पाहता, देशातील ग्रामीण भागात अधिक सक्षम सेवा देण्यासाठी आणि भारतातील दुर्गम भागात पोहोचण्यासाठी वाहनांमध्ये वाढ करण्याचे लक्ष्य समोर ठेवले आहे. कारण या भागातून कृषी, उर्जा निर्माण करणे आणि वाहतूकीसाठी मोठी मागणी असते. ही संधी आंम्हाला भारत सरकारने दिली असून यामुळे आता आम्ही आमचे नेटवर्क अधिक सखोल करु शकू. आंम्हाला आशा आहे की आमच्या या नेटवर्क मुळे केवळ डिझेलचीच मागणी नव्हे तर पेट्रोलची मागणीही पूर्ण होऊ शकेल, यामध्ये ट्रक्स आणि प्रवासी वाहनांचाही समावेश आहे. आमच्या या उपक्रमामुळे लोकांचा वेळ, श्रम आणि नक्कीच पैसेही वाचतील कारण यातून पुरवठा पध्दतीत यामुळे खूप मोठे बदल घडले आहेत.
अधिक माहितीसाठी संपर्क – + ९१ ९९३०९८५१६६/+९१ ९५४२९७६५६७.