Godrej Enterprises Group ने १६ नवीन पेटंट्स मिळवले, विकासाला मिळणार चालना (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
Godrej Enterprises Group Marathi News: गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुपला इंडियन पेटंट ऑफिसने आर्थिक वर्ष २५ मध्ये १६ नवीन पेटंट्स मंजूर केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या मंजूर पेटंटची एकूण संख्या १२२ झाली आहे. यामधून कंपनी व्यावहारिक व समस्या निवारण करण्याच्या सोल्यूशन्सच्या माध्यमातून वास्तविक विश्वातील आव्हानांना तोंड देण्यासाठी उपयोजित संशोधन आणि डिझाइन-नेतृत्वित इनोव्हेशनमध्ये सतत गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते.
नवीन मंजूर करण्यात आलेल्या पेटंटमध्ये होम अप्लायन्सेस, हरित बांधकाम साहित्य, स्मार्ट सुरक्षा सोल्यूशन्स आणि शाश्वत इंजीनिअरिंग सिस्टम्समध्ये तंत्रज्ञानातील प्रगतीची विस्तृत श्रेणी समाविष्ट आहे. हे कार्यक्षमता, सुरक्षितता आणि पर्यावरणीय शाश्वततेला प्राधान्य देणाऱ्या वापरकर्ता-केंद्रित डिझाइन तयार करण्याच्या गोदरेजच्या तत्वज्ञानाशी सुसंगत आहेत. कंपनीने ५२ अतिरिक्त पेटंटसाठी अर्ज केला आहे, ज्यामधून कंपनीची प्रबळ इंट्राप्रीन्युअरल संस्कृती दिसून येते.
या टप्प्याबाबत मत व्यक्त करत गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वर्मा म्हणाले, “गोदरेज एंटरप्राइजेज ग्रुपमध्ये इनोव्हेशन वेगळी ओळख निर्माण करण्यापेक्षा अधिक आहे. हे महत्त्वपूर्ण समस्यांचे निराकरण करत गतीशील, अत्यंत स्पर्धात्मक विश्वामध्ये समर्पक आहे. प्रत्येक पेटंटमधून आमचा असिम उत्साह, तसेच आमच्या टीमची सर्जनशीलता, कौशल्य आणि वैज्ञानिक क्षमता दिसून येते. टीममधील बहुतांश कर्मचारी तरूण इंजीनिअर्स व डिझाइनर्स आहेत, जे भावी उज्ज्वल भारताला आकार देण्यासाठी अथक मेहनत घेत आहेत.
इलेक्ट्रोकेमिकल सिस्टम्स ते सर्वोत्तम कूकिंग तंत्रज्ञानांपर्यंत हे नाविन्यपूर्ण सोल्यूशन्स भारतातील आजच्या आधुनिक ग्राहकांच्या गरजांशी संबंधित असण्यासोबत प्रत्येक पद्धतीमध्ये भविष्य-अग्रणी आहेत. आम्ही ग्राहकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणण्याप्रती कटिबद्ध आहोत, ज्यासाठी आम्ही विकसित भारतच्या सहयोगात्मक दृष्टिकोनाप्रती योगदान देण्यासाठी आमच्या धोरणाचा भाग म्हणून डिझाइन, विकास व इंजीनिअरिंगमध्ये योग्य पद्धतीने गुंतवणूक करत आहोत.”
मंजूर करण्यात आलेल्या पेटंट्समध्ये पोर्टफोलिओमधील उल्लेखनीय भर म्हणजे भारतातील पहिले लीक-प्रूफ स्प्लिट एअर कंडिशनर, जे अप्लायन्सेस व्यवसायाने विकसित केले आहे. हे पेटंटेड तंत्रज्ञान स्प्लिट एसींमधील पाणी गळतीच्या समस्येचे निराकरण करते, जी वापरकर्त्यांसाठी प्रमुख मेन्टेनन्स समस्या आहे. हे इनोव्हेशन विश्वसनीयता व कार्यक्षमता वाढवते, तसेच संसाधन वापराला ऑप्टिमाइज करत पर्यावरणीय परिणाम देखील कमी करते.
गोदरेजचे आरअँडडी धोरण प्रबळ उद्योग-शैक्षणिक सहयोग आणि खुल्या इनोव्हेशन प्लॅटफॉर्म्समध्ये सामावलेले आहे, जे प्रयोग आणि ब्रेकथ्रू डिझाइनच्या वातावरणाला चालना देते. या सहयोगांनी कंपनीला सतत तंत्रज्ञानाच्या मर्यादांना दूर करत राहण्यास, तसेच स्वदेशी टॅलेंटला निपुण करण्यास सक्षम केले आहे.
डिपार्टमेंट फॉर प्रमोशन ऑफ इंडस्ट्री अँड इंटर्नल ट्रेड (डीपीआयआयटी)च्या मते, भारत आपल्या इनोव्हेशन लँडस्केपला प्रबळ करत आहे, जेथे वार्षिक मंजूर झालेल्या पेटंट्समध्ये २२५ टक्के वाढ झाली आहे आणि पेटंट चाचणी वेळेमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
गोदरेजचा डिझाइन-नेतृत्वित, सर्वसमावेशक व शाश्वत विकासावरील फोकस भारतातील बौद्धिक मालमत्ता इकोसिस्टमला चालना देण्याप्रती त्यांच्या कटिबद्धतेमधून दिसून येतो, ज्यामध्ये अलिकडील वर्षांमध्ये मोठी गती दिसण्यात आली आहे, तसेच इन-हाऊस क्षमतांच्या विकासाला देखील पाठिंबा देत आहे. घरे, शहरे व उद्योगांमधील बदलत्या गरजांनुसार सहजसाध्य व समर्पक इनोव्हेशन्स निर्माण करण्यावरील फोकस कायम आहे.