
Todays Gold-Silver Price: सोनं-चांदीचे भाव आभाळाला! सर्वसामान्यांचे डोळेच फिरले, जाणून घ्या आजचा दर
Todays Gold-Silver Price: गेल्या काही दिवसांमध्ये सोने आणि चांदीचे दर गगनाला भिडले आहेत. ज्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांचे डोळे फिरले आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्न आणि येणाऱ्या सणांसाठी सोन्याचे किंवा चांदीचे दागिने खरेदी करायला जाण्यासाठी तुमच्या शहरातील दर जाणून घ्यायचे असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी..
अलीकडच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांची सोन्या आणि चांदीच्या दरांनी धाकधूक वाढवली असून देशांतर्गत सराफा बाजारात चांगलीच खळबळ उडाली आहे. कारण, सोने आणि चांदीचे दागिने खरेदी करण्याच्या विचाराच्या देखील पलीकडे गेले आहेत. कारण, सर्वसामान्यांना आताच्या दर परवडण्यापलीकडे गेले आहेत.
हेही वाचा: Rupee Economic Policy: रुपया घसरतोय… पण घाबरू नका! तज्ज्ञांचा मोठा खुलासा
अमेरिकेच्या डॉलरमध्ये झालेल्या किंचित वाढ आणि नफावसुली झाल्यामुळे गुरुवारी 18 डिसेंबरला देशांतर्गत सराफ बाजारात सोने आणि चांदीचे दर घसरल्याचे दिसले. भारतीय सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति 10 ग्रॅम 263 रुपयांनी कमी झाले असून 1,34,631 रुपये आहे. आहे, तर चांदीचे भाव 1187 रु. रुपयांनी स्वस्त होऊन 1,06,251 रुपये किलोवर घसरले. आदल्या दिवशी मात्र 17 डिसेंबरला सलग पाचव्या दिवशी सोन्याचे भाव वाढतच राहिले.
चांदीच्या किंमतीनी देखील पुन्हा एकदा विक्रमी उच्चांक गाठून चांदीचे दर 4.2% वाढून प्रति किलो 2,06,111 रुपयांवर उसळली आहे, ज्यामुळे वर्षाच्या सुरुवातीपासून चांदीचे भाव 135 टक्क्यांनीवाढले, जे सोन्याच्या जवळपास दुप्पट आहे. सप्टेंबरपासून या आकडेवारीमुळे सतत तीन वेळा व्याजदर कपात करण्यात आली. आणि नंतर अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने पुन्हा व्याजदराची कपात करणार असल्याची शक्यता वाढवली.
हेही वाचा: Indusind Bank पुन्हा अडचणीत, केंद्र सरकारने SFIO ला चौकशीचे आदेश दिले, काय आहे प्रकरण?
जगातील वाढत्या भू-राजकीय तणावामुळे देखील सतत सोन्या-चांदीची मागणी वाढ होत आहे. आणि असे असताना व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवेश करणाऱ्या व बाहेर पडणाऱ्या सर्व मंजूर तेल टँकरना त्वरित नाकाबंदी करण्याचे आदेश दिल्याने वाढत्या लष्करी हालचालींमुळे व्हेनेझुएला राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्यावरील दबाव वाढल्याचे दिसून येत आहे.
आर्थिक राजधानी मुंबईतील सोन्याचा दर
कमजोर अमेरिकन अर्थव्यवस्था आणि वाढत्या भू-राजकीय तणावामुळे सोने-चांदी सारख्या मौल्यवान धातूंची मागणी वाढत आहे. ज्यामुळे सुरक्षित गुंतवणुकीची देखील मागणी वाढत आहे. भारताच्या देशांतर्गत मुंबईच्या सराफा बाजार 24 कॅरेट सोनं 10 ग्रॅम 1,34,520 रुपये आहे, तर, 22 कॅरेट सोने 1,23,310 रुपये आहे. 18 कॅरेट प्रती 10 ग्रॅम 1,00,890 रुपयांवर पोहोचले आहे.