Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gold ETF ने गुंतवणूकदारांना आणले सोन्याचे दिवस! आता पडत्या किमतीत प्रॉफिट बुक करावा की गुंतवणूक करतच राहावी?

सध्या सोनं उच्चांकी पातळीवरून पुन्हा एकदा घसरत चालले आहे. अशातच ज्यांच्याकडे गोल्ड ईटीएफ आहे त्यांनी प्रॉफिट बुक करावा की गुंतवणूक चालू ठेवावी? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

  • By मयुर नवले
Updated On: Oct 26, 2025 | 06:29 PM
फोटो सौजन्य: iStock

फोटो सौजन्य: iStock

Follow Us
Close
Follow Us:

पूर्वीपासूनच सोन्यात केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीकडे एक सुरक्षित आणि कमी जोखीम असणारी गुंतवणूक म्हणून पहिले जाते. त्यात आता गुंतवणूकर फिजिकल गोल्डपेक्षा डिजिटल गोल्डमध्ये मोठया प्रमाणात गुंतवणूक करत आहे.

मागील काही दिवसांपासून सोन्याने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. खासकरून ज्यांनी काही वर्षांपूर्वी Gold ETF मध्ये गुंतवणूक केली, त्यांना तर धमाकेदार रिटर्न्स मिळाले आहेत.

मागील तीन महिन्यांत, गोल्ड ईटीएफने सरासरी 23 टक्क्यांचा परतावा दिला आहे. यापैकी, UTI Gold ETF ने सर्वाधिक 27.19 टक्क्यांचा परतावा दिला, तर LIC MF Gold ETF ने 23.40 टक्क्यांचा, Kotak Gold ETF ने 22.96 टक्क्यांचा आणि Nippon India ETF Gold BeES ने 22.94 टक्क्यांचा परतावा दिला. सर्वात कमी परतावा टाटा गोल्ड ईटीएफकडून आला, जो अंदाजे 22.25 टक्क्यांचा होता.

AI च्या जगात अंबानींची मोठी एन्ट्री! रिलायन्सने META सोबत मिळवला हात, ८५५ कोटींची नवी कंपनी स्थापन!

एप्रिलपासून सुरू झालेल्या रॅलीचं कारण काय होतं?

कोटक म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सतीश डोंडापाटी यांच्या मते, एप्रिल 2025 पासून सुरू झालेली ही रॅली अनेक कारणांमुळे मजबूत राहिली. यामध्ये अमेरिकन फेडरल रिझर्व्हकडून संभाव्य व्याजदर कपातीची अपेक्षा, जिओपॉलिटिक्स तणावात वाढ, सेंट्रल बँकांची सातत्याने होत असलेली खरेदी, आणि सुरक्षित गुंतवणुकीची वाढती मागणी या कारणांचा समावेश आहे.

अलीकडे आलेल्या $250–$300 च्या उछालामागे अमेरिकन सरकारच्या शटडाउनशी संबंधित चिंता प्रमुख कारण ठरल्या. मात्र, गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुक केल्यानंतर आणि अमेरिकन बॉण्ड यिल्ड्स तसेच डॉलर मजबूत झाल्यानं सोन्याच्या किमतींमध्ये किंचित घसरण झाली.

अलीकडील घसरण

गेल्या दोन आठवड्यांत Gold ETF ची गती मंदावली आहे. सरासरी फक्त 0.70% इतकाच परतावा मिळाला आहे. UTI Gold ETF ने सर्वाधिक 4.26% नफा दिला, तर Aditya Birla Sun Life Gold ETF ने केवळ 0.12% परतावा दिला.

मात्र गेल्या आठवड्यात परिस्थिती अधिक कमजोर झाली असून, सरासरी Gold ETF मध्ये 6.11% इतकी घसरण दिसली आहे. Tata Gold ETF मध्ये सर्वाधिक 6.81% घट झाली, तर UTI Gold ETF ने सर्वात कमी 2.64% नुकसान दाखवले आहे.

Todays Gold-Silver Price: सोन्याच्या किंमती पुन्हा वाढल्या, चांदीचे दर घसरले! एका क्लिकवर जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव

पण आता, ही तेजी मंदावताना दिसते. गेल्या काही आठवड्यांत गोल्ड ईटीएफमध्ये तीव्र चढ-उतार दिसून आले आहेत. तज्ञांचा असा विश्वास आहे की नफा बुकिंगमुळे गुंतवणूकदारांनी काही सुधारणा केल्या आहेत, ज्यामुळे किंमतींमध्ये घट झाली आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?

कोटक म्युच्युअल फंडचे फंड मॅनेजर सतीश डोंडापाटी यांचा सल्ला आहे की, सध्या गुंतवणूकदारांनी एकरकमी (lump-sum) गुंतवणुकीपासून दूर राहावं. त्याऐवजी SIP (Systematic Investment Plan)** किंवा STP (Systematic Transfer Plan)च्या माध्यमातून हळूहळू गुंतवणूक करावी. असे केल्यास किंमतींतील चढउतारांचा परिणाम कमी होईल आणि सरासरी खर्चावर अधिक चांगला परतावा मिळण्याचीशक्यता वाढेल.

Web Title: Gold etf gave bumper returns to investors should you book profit or continue investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 26, 2025 | 06:29 PM

Topics:  

  • Business
  • Gold
  • Investments

संबंधित बातम्या

FPI Stocks News: परदेशी गुंतवणूकदारांची माघार! दोन आठवड्यांत १८ हजार कोटींची विक्री..; भारतीय बाजारांवर वाढला दबाव 
1

FPI Stocks News: परदेशी गुंतवणूकदारांची माघार! दोन आठवड्यांत १८ हजार कोटींची विक्री..; भारतीय बाजारांवर वाढला दबाव 

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 
2

हीच काय ती खरी श्रीमंती! भावाने सोन्याच्या सिंहासनावर खाऊ घातलं लग्नाचं जेवण, पाहून वाटेल जणू चित्रपटाचाच सीन… Video Viral 

फक्त 7 हजार रुपयांच्या SIP वर 1.30 कोटींचा पोर्टफोलिओ कसा करता येईल? समजून घ्या ‘हा’ सोपा हिशोब
3

फक्त 7 हजार रुपयांच्या SIP वर 1.30 कोटींचा पोर्टफोलिओ कसा करता येईल? समजून घ्या ‘हा’ सोपा हिशोब

Monthly Investment Plan: बँक एफडीपेक्षा जास्त व्याज? पोस्ट ऑफिस ‘ही’ योजना ठरतेय सर्वोत्तम पर्याय
4

Monthly Investment Plan: बँक एफडीपेक्षा जास्त व्याज? पोस्ट ऑफिस ‘ही’ योजना ठरतेय सर्वोत्तम पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.