Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Personal Loan Trends India: ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!

भारतातील 'स्मार्ट अर्नर्स' आता आपली दीर्घकालीन गुंतवणूक न मोडता वैयक्तिक कर्ज (Personal Loans) घेण्याला पसंती देत आहेत. यामागील महत्त्वाची कारणे आणि बदलत्या आर्थिक मानसिकतेचा आढावा.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Feb 05, 2026 | 04:56 PM
'स्मार्ट अर्नर्स' गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? (Photo Credit- X)

'स्मार्ट अर्नर्स' गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत? (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • ‘स्मार्ट अर्नर्स’ गरज नसतानाही कर्ज का घेत आहेत?
  • गुंतवणुकीला धक्का न लावता स्वप्नपूर्तीचा नवा फंडा!
Individual Loans for Lifestyle News: कर्ज केवळ आपत्कालीन परिस्थितीत काढायचे या विचारात मोठा बदल होत आहे; उपभोक्ते मालमत्ता, शिक्षण, प्रवास, आरोग्याची काळजी यांपासून अगदी जीवनशैलीविषयक गरजांपर्यंत विविध कारणांसाठी व्यक्तीगत कर्जे घेत आहेत. व्यक्तीगत कर्जे (पर्सनल लोन्स) घ्यायची ती केवळ ‘आणीबाणीच्या परिस्थिती’त ही धारणा भारतात हळूहळू बदलत चालली आहे. स्थिर नोकऱ्या आणि व्यवस्थित पगार असलेल्या उपभोक्तावर्गामध्ये हे स्थित्यंतर विशेषत्वाने दिसत आहे. अनेक वर्षांपासून आर्थिक शिस्त पाळत आलेल्या, दीर्घकालीन बचत उभी करत असलेल्या आणि सातत्याने गुंतवणूक करत असलेल्या वर्गामध्ये हा बदल दिसून आला आहे.

विशेषत: कोविड साथीनंतर त्यांची गुंतवणूक करण्याच्या क्षमतेवर परिणाम झाला नसला तरी ‘पैसा गुंतवण्याची’ व्याख्या मात्र खरोखर बदलली आहे. आर्थिक भवितव्यासाठी योग्य ती काळजी घेतली जात असली तरी आरोग्य, मन आणि शरीर यांच्यासाठी आवश्यक गुंतवणूकीकडे नकळतच दुर्लक्ष झाल्याचे अनेकांच्या लक्षात आले. त्यानंतरच्या काळात हे आकलन अधिक पक्के होत गेले आहे, कारण कामाच्या दृष्टीने अत्यंत व्यग्र आयुष्य आणि वेगवान दिनक्रम यांमध्‍ये स्वास्थ्य जपणे, स्वत:ची काळजी घेणे किंवा आयुष्याचा दर्जा सुधारणे यांसारख्या गोष्टींकडे लोक आता स्वत:चे लाड पुरवणे म्हणून बघत नाहीत तर आवश्यक बाबी म्हणून बघू लागले आहेत.

परिणामी आजचे कर्जदार अधिक स्पष्टतेने आणि हेतूपूर्वक खर्च करू लागले आहेत. स्वास्थ्य, शिक्षण, अर्थपूर्ण अनुभव, घराची आरामदायकता आणि व्यक्तिगत इच्छाआकांक्षा या दीर्घकाळ दुर्लक्षित राहिलेल्या उद्दिष्टांना त्यांच्याकडून आता प्राधान्य दिले जाऊ लागले आहे. मात्र कष्टाने उभ्या केलेल्या गुंतवणूका या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी वापरण्याची त्यांची इच्छा नाही. ते हप्ते भरण्यास सक्षम आहेत आणि त्यांचे एसआयपी, दीर्घकालीन पोर्टफोलिओ व निवृत्तीनंतरच्या काळासाठी केलेल्या तरतूदींना धक्का न लावता त्यांना अन्य उद्दिष्टांसाठी खर्च करायचा आहे.

Jio BlackRock Partnership: भारताच्या म्युच्युअल फंड क्षेत्रात खळबळ! अंबानी–फिंक यांच्या भागीदारीला सेबीची मान्यता 

या परिस्थितीत व्यक्तीगत कर्ज हा व्यवहार्य पर्याय ठरतो. हप्त्याचा (ईएमआय) आकडा माहीत असेल तर तो वजा करून दैनंदिन खर्चांचे नियोजन करता येते आणि दीर्घकालीन गुंतवणूकींना हात न लावता त्या सुरू ठेवता येतात. थोडक्यात, ‘स्वप्नपूर्ती’साठी कर्ज काढण्याबाबतची पारंपरिक कल्पना आता नव्याने केली जाऊ लागली आहे: आज कर्ज काढणाऱ्या अनेकांनी आधीच गुंतवणूका केलेल्या असतात- आपला संपदासंचयाचा प्रवास न थांबवता उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सहजपणे व्यक्तीगत कर्जाचा पर्याय निवडतात.

अधिक व्यवहार्य कर्जदार मानसिकता या नवीन प्रवाहाचा गाभा आहे. तात्पुरत्या गरजा पूर्ण करण्यासाठी दीर्घकालीन गुंतवणुकांमधून पैसे काढण्याकडे बहुतेकांचा कल नसतो, कारण त्यामुळे संपदासंचयात खंड पडतो, भविष्यकाळातील लाभ कमी होऊ शकतात आणि काही वेळा तर भांडवलावरील नफ्यावर (कॅपिटल-गेन) कर वगैरे भरावा लागू शकतो. त्याऐवजी निश्चित हप्ता वजा करून अत्यावश्यक गरजा भागवण्याइतपत पैसा हातात राहतो आणि एसआयपी, इक्विटीतील गुंतवणूक आणि निवृत्तीनंतरच्या तरतूदी यांना धक्का लागत नाही.

सर्व शहरांमध्ये वास्तव आयुष्यातील गरजांकडे लक्ष देण्याची मानसिकता दिसून येत आहे- काही जण स्वास्थ्यावर लक्ष केंद्रित करतात, तर काही आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यांना महत्त्व देतात. दीर्घकाळापासूनच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मालमत्ता उभी करण्याचे प्रमाणही वाढत आहे. उपभोक्ते व्यक्तीगत कर्जाचा वापर त्या वेळी आवश्यक असलेल्या गोष्टी पार पाडून आयुष्यात पुढे जाण्यासाठी करत आहेत आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजनात काहीच बदल न करता हे शक्य होत आहे.

उपभोक्ते व्यक्तीगत कर्जांचा वापर आज कशासाठी करत आहेत?

कर्ज घेण्याच्या नमुन्यांमधून नियोजित वापराचे विस्तृत प्रकार दिसून येतात. ते पुढीलप्रमाणे:

ग्राहकांमध्ये विस्तृत ‘जीवनविषयक गुंतवणुकीं’साठी व्यक्तीगत कर्जांचा वापर करण्याचे प्रचलन वाढत आहे, यात आकांक्षा आणि स्वास्थ्य यांचा मेळ साधलेला दिसतो: केवळ प्रेक्षणीय स्थळांचे दर्शन घेण्याच्या पलीकडील उपक्रमाभिमुख अनुभवाधारित प्रवासासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; निसर्गाचे सान्निध्य, शांतता, ध्यानधारणा व डिजिटल साधनांपासून दूर राहणे अशा पद्धतीने विकसित केलेल्या ‘वेलनेस रिट्रीट्स’चा अनुभव घेण्यासाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहेत; त्वचेवरील उपचार, केसाचे प्रत्यारोपण व निवडक सौंदर्योपचार प्रक्रिया यांसारख्या आत्मविश्वास वाढवणाऱ्या पण अनेक वर्षांपासून पुढे ढकलल्या जाणाऱ्या स्वत:ची काळजी घेण्याच्या पद्धतींसाठी व्यक्तीगत कर्जे घेतली जात आहे. याशिवाय शिक्षण व कौशल्यविकास तसेच घराचे आरामदायीत्व वाढवणे, घरातील दुरुस्त्या यांवर हेतूपूर्वक केल्या जाणाऱ्या खर्चात स्पष्ट वाढ दिसून येत आहे. ज्यात वेळ अत्यंत महत्त्वाची असते अशा आयुष्यांतील महत्त्वाच्या क्षणांवर, मग ते लग्नसोहळे असोत, कौटुंबिक सोहळे असोत किंवा महत्त्वाचे उत्सव असोत, खर्च करण्यासाठी व्यक्तीगत कर्ज काढण्याचे प्रमाण वाढले आहे.

व्यक्तीगत कर्जांचा उपयोग व्यवहार्य, दैनंदिन आर्थिक नियोजनासाठीही केला जात आहे. अनेक ग्राहक या कर्जांचा वापर सर्व देय रकमा एका ठिकाणी आणण्यासाठीही (डेट कन्सॉलिडेशन) करत आहेत, त्यामुळे सर्व निश्चित खर्च एका हप्त्यामध्ये सामावले जातात, आर्थिक बाबींवर आपले नियंत्रण वाढते आणि मन:शांतीही मिळते. काही जण व्यक्तीगत कर्जाचा वापर वाहनाशी निगडित पैशाची तफावत भरून काढण्यासाठी तसेच पुढे न ढकलता येणाऱ्या अत्यावश्यक सुधारणांसाठी करतात. आपली पत रूपरेखा (क्रेडिट प्रोफाइल) सुधारण्याही जाणूनबुजून व्यक्तीगत कर्ज काढणाऱ्यांच्या संख्येतही वाढ होत आहे. व्यक्तीगत कर्जे घेऊन ती शिस्तबद्ध, वक्तशीर हप्त्यांद्वारे फेडल्यास कर्जदाराची क्रेडिट प्रोफाइल चांगली होते, भक्कम होते. क्रेडिट प्रोफाइल निकोप असेल भविष्यकाळातील कर्ज मिळवण्याची पात्रता वाढते तसेच भविष्यकाळात कर्जदाराला अनुकूल अटींवर कर्ज घेता येते.

महत्त्वाचे निर्णय लांबणीवर टाकल्यास त्याची काय किंमत मोजावी लागू शकते हेही कर्जदारांना पुरते लक्षात आले आहे. मग तो निर्णय दैनंदिन राहणीमानाचा दर्जा सुधारणारी घरातील दुरुस्तीची कामे करण्याचा असो किंवा अत्यंत तणावाच्या दिनक्रमात स्वत:ची काळजी घेण्याचा असो. अनेकांच्या मते व्यक्तीगत कर्ज घेणे म्हणजे आजच्या गरजांचा व उद्याच्या उद्दिष्टांचा तोल जबाबदारीने सांभाळणे होय.

आत्मविश्वास वाढण्यामागील कारणे

व्यक्तीगत कर्ज समजून घेण्यासाठी व नियोजनासाठी अधिक सोपे असते:
• कर्जाच्या अटी व शुल्के अधिक स्पष्ट व पारदर्शक असतात.
• वितरण अधिक वेगाने होते, हे कर्ज उपलब्ध होण्यासाठी अधिक सोपे असते.
• हप्त्यांची रचना सुलभ असल्याने त्यानुसार आर्थिक नियोजन करणे सोपे जाते.
• डिजिटल प्रवासामुळे ग्राहकांना स्वत:च्या सोयीने प्रक्रिया पूर्ण करण्याची मुभा मिळते.

“आम्हाला आत्मविश्वासपूर्ण स्थित्यंतर दिसत आहे: उत्तम उत्पन्न आणि शिस्तबद्ध गुंतवणूक सवयी असलेले ग्राहक स्वास्थ्य, आयुष्यातील अनुभव व दीर्घकाळापासून पूर्ण न झालेल्या आकांक्षा आदी अर्थपूर्ण उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी दीर्घकालीन गुंतवणूक न मोडता, व्यक्तीगत कर्जाचा उपयोग करत आहेत. कोविड साथीनंतर अनेक जण स्वत:ची काळजी घेणे व दीर्घकाळ बाळगलेली स्वप्ने पूर्ण करणे या गोष्टींना प्राधान्य देऊ लागले आहेत, या गोष्टींकडे आता चैन म्हणून बघितले जात नाही. अशा ग्राहकांसाठी कोटक पर्सनल लोन्स हा सहज पर्याय ठरत आहे. शिस्तीने उभ्या केलेल्या दीर्घकालीन गुंतवणूका थांबवणे किंवा मोडणे टाळण्यासाठी ते कर्ज काढत आहेत. व्यक्तीगत कर्जामुळे त्यांना वर्तमानकाळ भरभरून जगण्यात आणि त्याच वेळी भविष्यकाळातील नियोजन सुरक्षित राखण्यात मदत होत आहे,” असे कोटक महिंद्रा बँकेच्या पर्सनल लोन्स विभागाचे व्यवसाय प्रमुख अमित पाठक म्हणाले.

UPI Now Pay Later: NPCI चा नवा धमाका! आता आधी पेमेंट, नंतर परतफेड करा; UPI मध्ये ‘ही’ सुविधा सुरू 

Web Title: Changing trends of personal loans in india financial planning marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 05, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Business News
  • Investments
  • Loan

संबंधित बातम्या

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही
1

Bank Strike: बँकेच्या संपाची बोंबाबोंब! कोणत्या दिवशी राहणार बंद, UPI-ATM वर परिणाम होणार की नाही

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह
2

Milk Price Hike: सामन्यांनी जगायचं कसं? 10 रुपये वाढ करण्याची मागणी, ‘या’ राज्यात युनियनचा आग्रह

PF Withdrawal: PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये ‘या’ 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या
3

PF Withdrawal: PF काढण्यापूर्वी EPFO मध्ये ‘या’ 6 गोष्टी तपासा; छोटी चूकही अडकवू शकते तुमचे पैसे, कसं ते जाणून घ्या

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची  वाढ
4

GenZचा Homebuyingकडे कल! भारतात तरुण वयातच घर घेण्याचा ट्रेंड, कर्जदारांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.