Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बांधकाम व्यवसायाला “अच्छे दिन”, सळईचे दर नरमले; घर बांधायचंय… मग आत्ताच ठेवा मागवून!

बांधकाम व्यवसायाला 'अच्छे दिन' आले आहे. बिल्डिंग मटेरियल अर्थात सळईच्या दरात प्रति टनामागे तब्बल ५ ते ६ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आता बांधकाम खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. राजधानी दिल्ली ते मुंबई आणि देशातील सर्वच भागांमध्ये सळईचे हे दर कमी झाले आहेत. परिणामी, आता बांधकाम करण्याच्या विचारात असलेल्या सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Jul 31, 2024 | 06:19 PM
बांधकाम व्यवसायाला "अच्छे दिन", सळईचे दर नरमले; घर बांधायचंय... मग आत्ताच ठेवा मागवून!

बांधकाम व्यवसायाला "अच्छे दिन", सळईचे दर नरमले; घर बांधायचंय... मग आत्ताच ठेवा मागवून!

Follow Us
Follow Us:

बांधकाम क्षेत्रासाठी आनंदाची बातमी आहे. कोणतेही बांधकाम असो… आलिशान घर, इमारत किंवा बंगला यांच्या बांधकामामध्ये सळई हा खूप महत्वाचा भाग असतो. तुम्ही देखील आता आपले स्वप्नातील आलिशान घर बांधण्याचा विचार करत असाल, तर तुमच्यासाठी दिलासा देणारी बातमी आहे. बिल्डिंग मटेरियल अर्थात सळईच्या दरात प्रति टनामागे तब्बल ५ ते ६ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. त्यामुळे आता बिल्डिंग आणि घर बांधणीसाठी सळई खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बांधकाम खर्च करण्याची ही तुमच्यासाठी मोठी संधी असणार आहे.

का झालीये सळईच्या दरात घसरण?

सध्याच्या घडीला पावसाळ्याचे दिवस सुरु आहेत. ज्यामुळे बांधकाम व्यवसायाला सध्या काहीसा ब्रेक लागला आहे. मात्र, आता आगामी काळात तुम्ही एखादे मोठे बांधकाम करण्याचा विचार करत असाल, तर आत्ताच सळई खरेदी करून ठेवणे तुमच्यासाठी योग्य असणार आहे. आत्ताच सळई मागवून ठेवल्यास, तुमचा घर बांधकामावरील खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. दिल्लीपासून मुंबईपर्यंत देशभरातील सर्वच भागांमध्ये सळईचे दर सध्या मोठ्या प्रमाणात घसरले आहेत.

हेही वाचा : 20 हजार नोकऱ्या, 20,000 कोटींची गुंतवणूक; ‘या’ जिल्ह्यात उभारला जाणार टोयोटाचा प्लांट!

देशातील प्रमुख शहरातील सळईचे दर (प्रति टनांमध्ये) – विना जीएसटी

दोन महिन्यापूर्वी           सध्याचे दर
मुंबई                  53,200 रुपये/टन        45,400 रुपये/टन
जालना              52,200 रुपये/टन         45,500 रुपये/टन
दिल्ली                         –                         42,500 रुपये प्रति टन
चेन्नई                 52,500 रुपये/टन          47,500 रुपये/टन
हैद्राबाद                        –                         43,000 रुपये प्रति टन
जयपुर                          –                          44,600 रुपये प्रति टन
कोलकाता                    –                          42,000 रुपये प्रति टन

हेही वाचा : जीएसटीच्या मुद्द्यावरून नितीन गडकरींचे अर्थमंत्र्यांना पत्र; …म्हणाले ‘हे’ करावेच लागेल!

कुठे पाहाल तुमच्या शहरातील सळईचे दर?

तुम्हाला एखादे बांधकाम करायचे आहे. त्यासाठी तुमचा सळई खरेदी करण्याचा विचार असेल तर तुम्ही आपल्या शहरातील सळईचे भाव एका क्लिकवर पाहू शकतात. तुम्ही आपल्या शहरातील सळईचे दर Ironmart (ayronmart.com) या संकेतस्थळाला भेट देऊन तपासू शकतात. या संकेतस्थळावर दाखवण्यात आलेले सळईचे दर हे प्रति टनासाठी असून, त्यामध्ये १८ टक्के जीएसटीचा समावेश नाहीये. तो सळई खरेदी केल्यानंतर अतिरिक्त लागू असणार आहे.

Web Title: Good news for real estate rod price goes down

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2024 | 06:19 PM

Topics:  

  • real estate

संबंधित बातम्या

Mumbai Housing Redevelopment : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण? पुढील 15-20 वर्षांत 30 लाख नव्या घरांची निर्मिती
1

Mumbai Housing Redevelopment : मुंबईत घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण? पुढील 15-20 वर्षांत 30 लाख नव्या घरांची निर्मिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.