
Sukanya Samriddhi Yojana : मुलींचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी केंद्र सरकारची नवी योजना! 21 वर्षानंतर मिळणार इतकी रक्कम?
Sukanya Samriddhi Yojana: मुलीचं शिक्षण, त्यांचे करिअर आणि नंतर लग्न यासाठी आर्थिक नियोजन करण्यासाठी आई आणि वडिलांना आधार मिळावा आणि मुलींचे भविष्य सुरक्षित व्हावे यासाठी केंद्र सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरू केली. या योजनेत चांगले रिटर्न नाही तर सवलत देखील मिळते. 2 हजारांची गुंतवणूक तुम्हाला भविष्यात किती परतावा देते जाणून घेऊया या बातमीत..
सुकन्या समृद्धी योजनेत किती व्याज मिळतो?
सरकारच्या या योजनेत 10 वर्षांपेक्षा लहान असणाऱ्या मुलींसाठी खाते उघडले जाते. वार्षिक रक्कम अगदीच 250 रुपयांपासून 1.5 लाख रुपयांपर्यंत आहे. 15 वर्षांपर्यंत ही गुंतवणूक करण्यात येते, परंतु हे खाते 21 वर्षांपर्यंत सुरू राहते. म्हणजेच 6 वर्षाच्या अखेरीस गुंतवणूकदरांनी गुंतवणूक नसेल केली तरी व्याज मिळत जातो. ही योजना करसवलत आणि टॅक्स फ्री असल्याने आकर्षक आणि सोईस्कर आहे.
हेही वाचा: Income Tax Return: तुमचा आयटीआर परतावा अद्याप आला नाही का? नसेल आला तर जाणून घ्या प्रक्रिया
या योजनेसाठी केंद्र सरकार वार्षिक 8.2 % व्याजदर देते. दर तिमाहीत केंद्र सरकार व्याज खात्यात जमा करते. गुंतवणुकीवर देखील कर सवलत देते. सुकन्या समृद्धी योजनेत एखाद्या पालकाने दर महा 2 हजार रुपये मुलीच्या नावाने जमा केले तर याची वार्षिक गुंतवणूक 24 हजार होईल आणि यात 15 वर्षाच्या बचतीची भर पडून 3.6 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. ज्याचा फायदा भविष्यात त्या मुलीला होईल. 8.2 टक्के व्याजदराने 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तब्बल 9 लाख 60 हजार ते अगदी 10 लाखांपर्यंत रक्कम जमा होईल.
16 ते 21 या वर्षात सुकन्या समृद्धी योजनेत 6 वर्ष गुंतवणूक करावी लागत नाही. अगदी पहिल्यांदा जमा केलेल्या रकमेवर व्याज रक्कम मिळत जाते. म्हणजेच या काळात 3.6 लाखांच्या गुंतवणुकीवर तिप्पट रक्कम खात्यात जमा होते.
सुकन्या समृद्धी योजनेत जशी रक्कम वाढत जाईल तशी व्याजदर रक्कम वाढत जाईल. ज्याचा मुलीला भविष्यात त्याचा फायदा होईल. अगदी शिक्षण असू की लग्न.. म्हणजेच सुरक्षित गुंतवणूक योग्यवेळी कामाला येईल. मग पालक त्यांच्या सोईनुसार यात गुंतवणूक करू शकतात. फक्त याचा फायदा हा रकमेवर अवलंबून असेल. याचा अजून एक फायदा असा आहे की, सुकन्या समृद्धी योजनेसाठी खातं उघडल्यानंतर 21 वर्षांनंतर त्याची पूर्ण रक्कम मिळते. मात्र, जर शिक्षणासाठी गरज पडल्यावर 18 वर्षानंतर तुम्ही त्याची 50% रक्कम शिक्षणासाठी वापरू शकतो. सरकारी गॅरंटी असलेली सुकन्या समृद्धी योजना असून यामध्ये कोणतीही जोखीम नाही. सुरक्षित आणि विश्वासार्हत योजना आहे.