Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 11 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Control Rice Prices : वाढत्या महागाईला लागणार लगाम! तांदळाचे भाव उतरणार; सरकार खुल्या बाजारात 50 लाख टन तांदूळ विकणार

Control Rice Prices : देशांतर्गत बाजारात तांदळाच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने खुल्या बाजारात ५ मिलियन टन तांदूळ विकण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. सरकारच्या या पावलामुळे बाजारात तांदळाचा पुरवठा वाढून सर्वसामान्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 11, 2026 | 07:17 AM
सरकार खुल्या बाजारात 50 लाख टन तांदूळ विकणार ( सौजन्य - सोशल मीडिया )

सरकार खुल्या बाजारात 50 लाख टन तांदूळ विकणार ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • वाढत्या महागाईला लागणार लगाम!
  • तांदळाचे भाव उतरणा
  • सरकार खुल्या बाजारात 50 लाख टन तांदूळ विकणार
Control Rice Prices : देशात महागाई सातत्याने वाढत आहे, विशेषतः रोजच्या जीवनातल्या अन्नपदार्थांच्या किमती तर सतत वाढत आहेत. अलीकडेच साखरेच्या वाढत्या किमतींमुळे जनता त्रस्त झाली होती. त्यात आता तांदळाने नंबर लावला आहे. आता तांदळाच्या किमतीही वाढत आहेत. या जीवनावश्यक गोष्टींच्या किंमती कंट्रोलमध्ये आणणं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी केंद्र सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. या संदर्भात, सरकारने खुल्या बाजारात तांदूळ विकण्याचे आपले लक्ष्य दुप्पट करण्याचा एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नेमका काय परिणाम होणार? सरकारचं नेमकं काय प्रयोजन आहे? ( Control Rice Prices ) 

UPI Payment Charges Update : दिवाळीनंतर UPI युजर्सना मोठा धक्का? 2000 रुपयांपेक्षा जास्तच्या पेमेंटवर लागणार चार्ज?

सरकार २०२६-२७ या आर्थिक वर्षात ५० लाख टन तांदूळ विकणार आहे. यापूर्वी हे लक्ष्य २५ लाख टन होते. बाजारात तांदळाची उपलब्धता वाढवणे आणि सर्वसामान्य लोकांना वाढत्या किमतींपासून दिलासा देणे, हा सरकारचा उद्देश आहे.

केंद्र सरकारची योजना

केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, खुल्या बाजारातील तांदूळ विक्री योजनेअंतर्गत ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत २५ लाख टन तांदूळ विकला गेला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत केवळ ११ लाख टन तांदूळ विकला गेला होता. सरकार आता आर्थिक वर्षाच्या उर्वरित पाच महिन्यांत अतिरिक्त २५ लाख टन तांदूळ विकण्याची तयारी करत आहे. या योजनेला खुल्या बाजारातील विक्री योजना म्हणजेच OMSS असं म्हणतात. या योजनेअंतर्गत, पुरवठा वाढवण्यासाठी आणि किमती कमी करण्यासाठी सरकार आपल्या गोदामांमध्ये साठवलेले धान्य खुल्या बाजारात विकते.

किमतींमध्ये किती बदल झाला?

सरकारी आकडेवारीनुसार, ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान अनेक राज्यांमध्ये तांदळाच्या किरकोळ किमती वाढल्या आहेत. त्या खालीलप्रमाणे आहेत:

राज्य ९ ऑगस्ट रोजीची किंमत  ९ नोव्हेंबर रोजीची किंमत
दिल्ली रु. ४५ प्रति किलो रु. ४५ प्रति किलो
महाराष्ट्र रु. ५० प्रति किलो  रु. ५३ प्रति किलो
तामिळनाडू रु. ५९ प्रति किलो  रु. ६९ प्रति किलो
पश्चिम बंगाल रु. ४३ प्रति किलो रु. ५२ रुपये प्रति किलो

या आकडेवारीवरून असे दिसून येते की काही राज्यांमध्ये तांदळाच्या दरात मोठी वाढ झाली आहे. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये, विशेषतः या प्रदेशात, दरात लक्षणीय वाढ झाली आहे.

तांदळाच्या किमती का वाढतेय?

यावर्षी अपुऱ्या आणि अनियमित पावसामुळे तांदळाच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. उद्योग अधिकाऱ्यांच्या मते, दक्षिण भारतातील पाच राज्यांमध्ये तांदळाचे उत्पादन अंदाजे ३० टक्क्यांनी घटू शकते. या राज्यांमध्ये कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळ यांचा समावेश आहे. दरम्यान, देशभरातील तांदळाचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत अंदाजे १०% कमी आहे. पोन्नी आणि सोना मसुरी यांसारख्या तांदळाच्या काही जातींचा पुरवठा मोठ्या प्रमाणात कमी होत आहे.

सरकारी गोदामांमध्ये साठवलेला तांदूळ

सरकारकडे तांदळाचा पुरेसा साठा आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे. त्यामुळे ही परिस्थिती हाताळण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं पाठबळ आहे. १ ऑक्टोबर २०२६ पर्यंत, केंद्रीय साठ्यात अंदाजे ३८ दशलक्ष टन तांदूळ होता. सरकारसाठी किमान साठ्याचे मानक १०.२५ दशलक्ष टन आहे. याचा अर्थ सरकारकडे किमान गरजेपेक्षा अंदाजे २.८ पट जास्त तांदूळ आहे. या साठ्याचा वापर करून सरकार बाजारात तांदळाचा पुरवठा वाढवू शकते आणि किमती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू शकते.

Farmers New Demand : कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार 2 लाखांचे बक्षीस? शेतकऱ्यांची राज्य सरकारकडे नवीन मागणी; काय आहेत मागण्या?

💡

Frequently Asked Questions

  • Que: केंद्र सरकार खुल्या बाजारात किती तांदूळ विकणार आहे?

    Ans: केंद्र सरकार खुल्या बाजार विक्री योजनेअंतर्गत तब्बल ५ मिलियन टन तांदूळ विकणार आहे.

  • Que: निर्णयाचा तांदळाच्या दरावर काय परिणाम होईल?

    Ans: बाजारात मोठ्या प्रमाणावर तांदूळ उपलब्ध झाल्यामुळे तुटवडा दूर होईल आणि वाढत्या तांदळाच्या किमती स्थिर होण्यास तसेच काही प्रमाणात घसरण्यास मदत होईल.

  • Que: सरकार ही तांदूळ विक्री कोणाला आणि कशी करणार आहे?

    Ans: सरकार भारतीय खाद्य महामंडळाच्या माध्यमातून ई-लिलावाद्वारे व्यापारी, मिलर्स आणि मोठ्या खरेदीदारांना हा तांदूळ उपलब्ध करून देणार आहे, जेणेकरून किरकोळ बाजारात योग्य दरात तांदूळ उपलब्ध होईल.

Web Title: Government to sell 5 million tonnes rice open market price control marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 11, 2026 | 07:17 AM

Topics:  

  • central goverment

संबंधित बातम्या

BSF Medical Wing Recruitment 2026: सीमा सुरक्षा बलात सब इन्स्पेक्टर पदावर बंपर भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया
1

BSF Medical Wing Recruitment 2026: सीमा सुरक्षा बलात सब इन्स्पेक्टर पदावर बंपर भरती; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

Agniveer Service Extension: अग्निवीरांसाठी खुशखबर! सैन्यातील सेवा काळ ४ वरून ६ वर्षे वाढवणार?
2

Agniveer Service Extension: अग्निवीरांसाठी खुशखबर! सैन्यातील सेवा काळ ४ वरून ६ वर्षे वाढवणार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.