Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 2 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे देवा… ATM यूजर्सना मोठा झटका! सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट, Charges ही वाढवलेत

Govt Bank ATM Rule Change : ATM वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. एका प्रमुख सरकारी बँकेने महिन्याला मिळणाऱ्या मोफत Free ATM Transactions मर्यादेत कपात केली आहे. याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त व्यवहार केल्यास लागणाऱ्या सेवा शुल्कातही वाढ करण्यात आली आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 02, 2026 | 07:03 PM
(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य - सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ATM यूजर्सना मोठा झटका!
  • सरकारी बँकांनी कमी केली Free Transaction ची लिमिट
  • Charges मध्येही केली वाढ
Govt Bank ATM Rule Change : दर महिन्याच्या पहिल्या तारखेला आर्थिक स्वरुपात बरेच बदल घडतात. सप्टेंबर महिना बरेच बदल घेऊन आला आहे. दुधाच्या दरात वाढ, रिक्षाच्या भाड्यात वाढ झाली असतानाच, व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातही वाढ झाली. अशा परिस्थितीत, सप्टेंबरपासून आणखी एक बदल झाला आहे, जो सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा झटला लावून जाणारा आहे. ( Govt Bank ATM Rule Change ) 

आता AI बुक करणार तुमची तिकीटं आणि भरणार बिलं! UPI पेमेंट्सचे Rules होणार सोपे; जाणून घ्या नवीन फीचर्स

जर तुम्हीही एटीएम वापरत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. एटीएम वापरणाऱ्यांसाठी बँकेने पैसे काढण्यासंबंधीचे नियम कडक केले आहेत. आतापर्यंत व्यवहार हे मोफत स्वरुपाचे होते. कितीही वेळा पैसे काढता येत होते. पण आता या व्यवहारांवर बंधन घालण्यात आली आहेत. मोफत व्यवहारांची संख्या कमी करण्यात आली आहे. जाणून घेऊया कोणत्या बँकेने किती लिमीट सेट केली आहे आणि त्याचा काय परिणाम होईल?

कोणत्या बँकेने बदल केला?

कॅनरा बँकेने १ सप्टेंबर २०२६ पासून, बँकेचे एटीएम किंवा कॅश रिसायकलर्स वापरणाऱ्या बचत खातेधारकांसाठी नियमांमध्ये बदल केले आहेत. बऱ्याच नियमांमध्ये सुधारणा केली आहे. जर तुम्ही नियमित ग्राहक असाल, तर तुम्हाला आता तुमच्या यापुढे एटीएममधून फक्त पाच वेळा मोफत पैसे काढता येतील. पण ज्येष्ठ नागरिकांसाठी यामधून सूट देण्यात आली आहे. त्यांच्यासाठी मोफत व्यवहारांची मर्यादा पूर्वीसारखीच ठेवण्यात आली आहे जी दरमहा आठ इतकी कायम आहे.

मोठ्या व्यवहारांसाठी वेगळं शुल्क

महत्त्वाची गोष्टी म्हणजे एखाद्या ग्राहकाने महिन्यातून पाच वेळा पैसे काढले आणि त्यानंतर सहाव्यांदा एटीएममधून पैसे काढायचे असतील तर त्यांना आता एक्स्टा चार्जेस भरावी लागतील. हे चार्जेस ₹23 रुपये इतके आहेत. त्यामुळे अधिक जीएसटी भरून यापुढे व्यवहार करावा लागेल. पूर्वी हे शुल्क ₹20 अधिक जीएसटी होते. याचा अर्थ बँकेने रोख रक्कम काढण्याच्या शुल्कातही वाढ केली आहे.

अकाऊंट बॅलंस चेक करण्यासाठी

खात्यातील शिल्लक म्हणजे अकाऊंट बॅलंस चेक करण्यासारख्या गैर-आर्थिक व्यवहारांसाठीच्या शुल्कात कोणताही बदल झालेला नाही. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतर, अशा व्यवहारांसाठी ₹5 अधिक जीएसटी शुल्क आकारले जाईल.

किमान शिल्लकेसंबंधीच्या नियमांमध्येही बदल

कॅनरा बँकेने ग्राहकाच्या खात्यात पुरेशी रक्कम नसताना होणाऱ्या व्यवहारांसाठीचे शुल्कही वाढवले ​​आहे. पूर्वी अशा व्यवहारांसाठी ₹17 अधिक जीएसटी शुल्क होते, जे आता वाढवून ₹23 अधिक जीएसटी करण्यात आले आहे. मोफत व्यवहारांची मर्यादा संपल्यानंतरही हे शुल्क लागू होईल.

BGMI प्लेयर बनले गेम निर्माते! ‘World of Wonder’मध्ये महाराष्ट्र ठरले गेमिंगचे महत्त्वाचे केंद्र

Web Title: Govt bank reduces free atm transaction limit and increases charges marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 07:03 PM

Topics:  

  • ATM
  • new rules

संबंधित बातम्या

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल
1

Govt New Sugar Rules : साखरेबाबत केंद्र सरकारचा मोठा निर्णय! भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी उचललं पाऊल

Credit Card : अरे वाह! बँकेत खातं नसलं तरीही मिळणार क्रेडिट कार्ड, कसा अर्ज करावा? नेमके काय आहेत नियम?
2

Credit Card : अरे वाह! बँकेत खातं नसलं तरीही मिळणार क्रेडिट कार्ड, कसा अर्ज करावा? नेमके काय आहेत नियम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.