Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol-Diesel Tax Cut : पेट्रोल – डिझेलवर सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ टॅक्समध्ये करणार कपात, किमतींवर परिणाम होणार?

Petrol-Diesel Tax Cut : केंद्र सरकारने इंधन निर्यातीवरील 'विंडफॉल टॅक्स' मध्ये कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील कर कमी केल्यामुळे तेल कंपन्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 17, 2026 | 11:30 AM
पेट्रोल - डिझेलवर सरकारचा मोठा निर्णय! ( सौजन्य - सोशल मीडिया )

पेट्रोल - डिझेलवर सरकारचा मोठा निर्णय! ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • पेट्रोल – डिझेलवर सरकारचा मोठा निर्णय!
  • ‘या’ टॅक्समध्ये करणार कपात
  • किमतींवर परिणाम होणार?
Petrol-Diesel Tax Cut : सध्या महागाईचा भडका उडाला असताना केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलबाबत एक मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्स कमी केला आहे. यामुळे नेमका काय परिणाम होणार आहे. याचा सर्वसामान्यांना काय फायदा होणार? सविस्तर जाणून घेऊयात. ( Petrol-Diesel Tax Cut ) 

Stock Market मध्ये भीतीचं वातावरण! China च्या एन्ट्रीने उडाली खळबळ… आता काय होणार?

अर्थ मंत्रालयाच्या नवीन निर्णयानुसार, पेट्रोल निर्यातीवरील कर प्रति लिटर ₹१.५० वरून ₹०.५० पर्यंत कमी करण्यात आला आहे. याचा अर्थ, पेट्रोल निर्यातीवरील शुल्क प्रति लिटर ₹१ ने कमी झाले आहे.त्याचप्रमाणे, डिझेल निर्यातीवरील एकूण शुल्क ₹25 प्रति लिटरवरून ₹20 प्रति लिटरपर्यंत कमी करण्यात आले आहे. याचा अर्थ डिझेलवरील निर्यात कर ₹5 प्रति लिटरने कमी झाला आहे. डिझेल निर्यातीवरील ₹25 प्रति लिटरच्या एकूण करात ₹24 विशेष अतिरिक्त उत्पादन शुल्क SAED आणि ₹1 रस्ते व पायाभूत सुविधा उपकर RIC यांचा समावेश होता. RIC आता पूर्णपणे रद्द करण्यात आला आहे. तथापि, देशांतर्गत वापरासाठी आकारण्यात येणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलवरील सध्याच्या उत्पादन शुल्क दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

ATF निर्यातीबाबतही निर्णय घेतला जाईल

याव्यतिरिक्त, एव्हिएशन टर्बाइन फ्युएल ATF च्या निर्यातीवर प्रति लिटर १५ रुपयांचा windfall tax आकारला जाईल. सरकार दर १५ दिवसांनी या कराचा आढावा घेते. सरकारने २७ मार्च २०२६ पासून पेट्रोलियम उत्पादनांच्या निर्यातीवर हे अतिरिक्त शुल्क लागू केले आहे. पश्चिम आशियातील सध्याच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात पेट्रोलियम उत्पादनांची पुरेशी उपलब्धता सुनिश्चित करणे आणि निर्यात कमी करणे हा यामागील उद्देश होता.

ग्राहकांवर काय परिणाम होणार?

या निर्णयाचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही. याचा परिणाम पेट्रोल, डिझेल किंवा एटीएफ निर्यात करणाऱ्या कंपन्यांच्या खर्चावर होईल.

विंडफॉल टॅक्सचा नेमका अर्थ काय?

विंडफॉल टॅक्स हा सरकारद्वारे तेल कंपन्यांवर लादलेला एक अतिरिक्त कर आहे. जर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक वाढ झाली आणि त्यामुळे तेल कंपन्यांना लक्षणीय नफा झाला, तर सरकार या अतिरिक्त नफ्याच्या काही भागावर कर लावू शकते. यालाच विंडफॉल टॅक्स म्हणतात.

ITC कडून Cigarette च्या दरात पुन्हा वाढ; Gold Flake आणि Classic चे भाव वाढले; आता किती रुपये मोजावे लागणार?

Web Title: Govt cuts windfall tax export duty on petrol diesel atf marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • FATF

संबंधित बातम्या

Crude Oil Export Tax : पेट्रोलवरील निर्यात शुल्क हटलं, पण डिझेल-ATF महागले! केंद्राच्या निर्णयाचा सामान्यांवर काय होणार परिणाम?
1

Crude Oil Export Tax : पेट्रोलवरील निर्यात शुल्क हटलं, पण डिझेल-ATF महागले! केंद्राच्या निर्णयाचा सामान्यांवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.