
November महिन्यात GST कलेक्शन तब्बल १.७० लाख कोटी! फेस्टिव्ह सीझन आणि GST स्लॅब बदलांचा परिणाम
GST Collection November 2025: नोव्हेंबर २०२५ मध्ये जीएसटी कलेक्शन १.७० लाख कोटी रुपये झाला असून गेल्या वर्षी नोव्हेंबर २०२४ मध्ये हे कलेक्शन १.६९ लाख कोटी रुपये होते. गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपेक्षा हे ०.७ टक्के जास्त आहे. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी कपातीचा परिणाम देशभरात जाणवला. १ डिसेंबर रोजी जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलन किंचित वाढून १,७०,२७६ कोटी रुपये झाले.
गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरपेक्षा हे ०.७ टक्के जास्त आहे. तथापि, ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन १,९५,९३६ कोटी रुपये होते. नोव्हेंबर २०२४ मध्ये, हे संकलन १,६९,०१६ कोटी रुपये होते. नोव्हेंबरमध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा कर (सीजीएसटी) चे उत्पन्न ३४,८४३ कोटी रुपये होते, राज्य वस्तू आणि सेवा कर (एसजीएसटी) चे उत्पन्न ४२,५२२ कोटी रुपये होते आणि एकात्मिक वस्तू आणि सेवा कर (आयजीएसटी) चे उत्पन्न ९२,९१० कोटी रुपये होते.
हेही वाचा : Income Tax Notices: आयटीआरमध्ये छोटी चूक? लगेच येईल नोटीस! परंतु, यामध्ये ही ‘किती’ प्रकारच्या असतात नोटिस?
या दरम्यान, नोव्हेंबरमध्ये सेस महसूल ४,००६ कोटी रुपये होता. एक वर्षापूर्वी, नोव्हेंबर २०२४ मध्ये तो १२,९५० कोटी रुपये होता. नोव्हेंबरमध्ये सरकारने १८,१९६ कोटींचा जीएसटी परतावा जारी केला. गेल्या वर्षी याच कालावधीत जारी केलेल्या १८,९५४ कोटी परताव्यांच्या तुलनेत हे ४% कमी आहे. नोव्हेंबरमध्ये परताव्यांनंतर निव्वळ जीएसटी संकलन १,५२,०७९ कोटी रुपये झाले, जे गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये १,५०,०६२ कोटी रुपये होते. सप्टेंबरमध्ये लागू केलेल्या जीएसटी सुधारणा केल्याने फायदा झाला. सप्टेंबरमध्ये लागू केलेल्या जीएसटी सुधारणांचाही संकलनावर परिणाम झाला आहे.
हेही वाचा : PAN-Aadhaar Update: PAN-Aadhaar लिंकची शेवटची संधी! उशीर झाला तर आर्थिक व्यवहार होतील ठप्प
२२ सप्टेंबरपासून आणि सणासुदीच्या हंगामाच्या अखेरीस सरकारने जीएसटी सुधारणा लागू केल्यामुळे महिन्याच्या आधारित जीएसटी संकलनात घट झाल्याचे मानले जाते. सामान्यतः, उत्सवी विक्री नसल्यामुळे दिवाळीनंतरच्या महिन्यांत जीएसटी संकलनात घट झाले. सप्टेंबरमध्ये, सरकारने स्लॅबची संख्या ५%, १२%, १८% आणि २८% कमी करून दोन ५% आणि १८% केली. लक्झरी वस्तूंवरही ४०% कर लावण्यात आला आहे. याचा परिणाम खरेदी-विक्रीवर झाला.