Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

GST Rate : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! सिगारेट, तंबाखू, शीतपेये महागणार; GST मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव

GST Hike : सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. देशभरात काही उत्पादनांवरील जीएसटी वाढला जाऊ शकतो. यामध्ये सिगारेट, तंबाखूपासून शीतपेये यासारख्या गोष्टी महागण्याची शक्यता आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Dec 03, 2024 | 05:13 PM
सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! सिगारेट, तंबाखूपासून शीतपेये महागणार; GST मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव (फोटो सौजन्य-X)

सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बातमी! सिगारेट, तंबाखूपासून शीतपेये महागणार; GST मध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव (फोटो सौजन्य-X)

Follow Us
Close
Follow Us:

GST Rate News In Marathi :सर्वसामान्यांच्या खिशाला येत्या काही दिवसात महागाईची झळ बसण्याची शक्यता आहे. कारण खाद्यपदार्थ्यांच्या किंमतीसह पिण्याचे पाणी आणि थंड पेये पूर्वीपेक्षा महाग होऊ शकता. तसेच कोल्ड्रिंक्स, सिगारेट आणि तंबाखू आगामी काळात महाग होण्याची शक्यता आहे. जीएसटी कौन्सिलच्या बैठकीपूर्वी दर तर्कसंगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने (जीओएम) तंबाखू उत्पादनांवरील जीएसटी 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याची शिफारस केली आहे. मात्र या महिन्यात २१ डिसेंबर रोजी होणाऱ्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे.

तंबाखूजन्य पदार्थ महाग होतील

मिळालेल्या माहितीनुसार, जीएसटी दर तर्कसंगत करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्र्यांच्या गटाने सोमवारी सिगारेट आणि तंबाखू तसेच कोल्ड ड्रिंक्स सारख्या हानिकारक उत्पादनांवरील जीएसटी दर सध्याच्या 28 टक्क्यांवरून 35 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यामध्ये सरकारने हा निर्णय घेतल्यास या उत्पादनांच्या किमतीत मोठी उसळी येऊ शकते.

वर्षभरात 10 हजाराचे झाले 1 कोटी रुपये; 3 रुपयांवरून 2 लाख 36 हजारांपर्यंत पोहचली शेअरची किंमत!

रेडिमेड कपड्यांचे दरही बदलतील

यासंदर्भात अधिकाऱ्याने सांगितले की, बिहारचे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली जीओएमने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. 35 टक्के जीएसटी दर 5%, 12%, 18% आणि 28% च्या विद्यमान चार स्लॅब व्यतिरिक्त असेल. तर GOM ने रेडीमेड आणि महागड्या कपड्यांवरील कर दर तर्कसंगत करण्याची शिफारस केली आहे आणि 148 वस्तूंच्या दरांमध्ये बदल करण्याची शिफारस देखील केली आहे.

मंत्र्यांच्या गटाने 1,500 रुपयांपर्यंतच्या रेडिमेड कपड्यांवर 5 टक्के जीएसटीची शिफारस केली आहे. तर 1,500 ते 10,000 रुपयांपर्यंतच्या कपड्यांवर 18 टक्के जीएसटी आणि रुपये पेक्षा जास्त किमतीच्या कपड्यांवर 28 टक्के जीएसटीची शिफारस केली आहे.

21 डिसेंबर रोजी जीएसटी परिषदेची बैठक

जीएसटी दरांमध्ये बदल करण्याची शिफारस करणाऱ्या मंत्र्यांच्या गटाचा अहवाल जीएसटी कौन्सिलला सादर केला जाईल आणि 21 डिसेंबर रोजी होणाऱ्या प्रस्तावित बैठकीत त्यावर अंतिम निर्णय घेतला जाईल. GST कौन्सिलची 55 वी बैठक राजस्थानच्या जैसलमेरमध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

2017 मध्ये GST लागू करण्यात आला

जुन्या अप्रत्यक्ष कर प्रणालीच्या जागी वस्तू आणि सेवा कर (GST) 2017 मध्ये देशभर लागू करण्यात आला. स्वातंत्र्यानंतर देशातील ही सर्वात मोठी कर सुधारणा मानली जात आहे. सरकारने 29 मार्च 2017 रोजी जीएसटी पास केला होता आणि त्यानंतर ही नवीन कर प्रणाली 1 जुलै 2017 रोजी लागू करण्यात आली. यासह व्हॅट, उत्पादन शुल्क (अनेक गोष्टींवरील) आणि सेवा कर असे 17 कर रद्द करण्यात आले. केंद्र सरकारच्या म्हणण्यानुसार, 7 वर्षांपूर्वी लागू करण्यात आलेल्या जीएसटीमुळे देशातील जनतेवरील कराचा बोजा कमी होण्यास मदत झाली आहे.

अनिल अंबानींसाठी आणखी एक संकट; सेबीने ‘या’ कंपनीवर केली मोठी कारवाई!

Web Title: Gst on cigarettes tobacco aerated beverages may be hiked to 35 pc gst council decision on dec 21

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 03, 2024 | 11:35 AM

Topics:  

  • GST
  • Nirmala Sitharaman

संबंधित बातम्या

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी
1

दिवाळीपूर्वी पंतप्रधान मोदींची भेट! छोट्या गाड्या आणि विमा प्रीमियमवरील GST होऊ शकतो कमी

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर
2

मोदी सरकारचा GST मास्टरस्ट्रोक! ‘या’ क्षेत्रांना होईल मोठा नफा, वाचा एका क्लिकवर

Market Outlook: या आठवड्यात शेअर बाजारातील हालचालींवर जीएसटी सुधारणा आणि पुतिन-ट्रम्प चर्चेचा होईल परिणाम
3

Market Outlook: या आठवड्यात शेअर बाजारातील हालचालींवर जीएसटी सुधारणा आणि पुतिन-ट्रम्प चर्चेचा होईल परिणाम

GST Reform: जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे ‘या’ वस्तु होतील स्वस्त, पहा संपूर्ण यादी
4

GST Reform: जीएसटी दरांमध्ये बदल झाल्यामुळे ‘या’ वस्तु होतील स्वस्त, पहा संपूर्ण यादी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.