RBI ने घेतला महत्त्वाचा निर्णय, कर्ज घेणं आता सोपं होणार (फोटो सौजन्य-X)
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज (6 डिसेंबर) शेवटच्या पतधोरणात शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वाढत्या महागाईपासून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने आता हमीशिवाय 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज देण्याची घोषणा केली आहे. सध्या ही मर्यादा 1.6 लाख रुपये असणार आहे.
यासोबतच आरबीआयने रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे रेपो रेट 6.5 टक्के राहील. दरम्यान, केंद्र सरकारने रोख राखीव प्रमाण (CRR) देखील कमी केले आहे, ज्यामुळे बँकांना 1.15 लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड उपलब्ध होईल. दुसरीकडे, सरकारने रोख राखीव प्रमाण 4 टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे देशातील बँकांना 1.15 लाख कोटी रुपयांचा फायदा होणार आहे.
पतधोरण आढाव्याची माहिती देताना आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी सांगितले की, महागाई आणि शेतीमध्ये वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ लक्षात घेता हमीमुक्त कृषी कर्जाची मर्यादा 1.6 लाख रुपयांवरून आता 2 लाखापर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना वित्तीय संस्थांकडून कर्ज घेण्याची व्याप्ती वाढेल, असे ते म्हणाले. उल्लेखनीय आहे की, 2010 मध्ये आरबीआयने कृषी क्षेत्राला कोणतीही हमी न देता 1 लाख रुपये देण्याची मर्यादा निश्चित केली होती. नंतर 2019 मध्ये ते 1.6 लाख रुपये करण्यात आले. याबाबतचे परिपत्रक लवकरच जारी करण्यात येणार असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) शुक्रवारी चालू आर्थिक वर्षाच्या पाचव्या पतधोरण बैठकीत सलग 11व्यांदा पतधोरणात कोणताही बदल केला नाही आणि तो 6.5 टक्क्यांवर ठेवला. मात्र, अर्थव्यवस्थेत रोख वाढवण्याच्या उद्देशाने मध्यवर्ती बँकेने सीआरआर (कॅश रिझर्व्ह रेशो) ४.५ टक्क्यांवरून चार टक्क्यांवर आणला. या पावलामुळे बँकांमध्ये १.१६ लाख कोटी रुपयांची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे.
CRR अंतर्गत, व्यावसायिक बँकांना त्यांच्या ठेवींचा एक विशिष्ट भाग केंद्रीय बँकेकडे रोख राखीव म्हणून ठेवावा लागतो. यासोबतच सध्याची परिस्थिती पाहता आरबीआयने चालू आर्थिक वर्षासाठी आर्थिक विकास दराचा अंदाज ७.२ टक्क्यांवरून ६.६ टक्क्यांवर आणला आहे. आरबीआयने चालू आर्थिक वर्षातील किरकोळ महागाईचा अंदाज 4.5 टक्क्यांवरून 4.8 टक्के केला आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे (RBI) गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी यावेळीही रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. रेपो दर अजूनही 6.50 टक्क्यांवर स्थिर आहे. रेपो दरात कोणताही बदल न करण्याची ही 11वी वेळ आहे.