Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हेन्केलची भारतात मोठी गुंतवणूक; चेन्नईत इंजिनिअरिंग सेंटर, कुरकुंभमध्ये नवीन उत्पादन प्रकल्प

हेन्केलने चेन्नईत अॅप्लिकेशन इंजिनिअरिंग सेंटर आणि पुण्याजवळील कुरकुंभ येथे इलेक्ट्रॉनिक्स अॅडहेसिव्ह मटेरियल उत्पादन प्लांट उभारण्याची घोषणा केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Feb 27, 2025 | 06:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हेन्केलने आज चेन्‍नई, तामिळनाडू येथे अत्‍याधुनिक अॅप्‍लीकेशन इंजीनिअरिंग सेंटरच्‍या लाँचची घोषणा केली. हे केंद्र इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातील त्याच्या अॅडहेसिव्ह टेक्‍नॉलॉजीज व्यवसायाच्या नेतृत्वाला अधिक बळकटी देईल. तसेच,कंपनी पुण्‍याजवळील कुरकुंभ येथे आपल्‍या मल्‍टी-टेक्‍नॉलॉजी उत्‍पादन साइटमध्‍ये इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्रासाठी अॅडहेसिव्ह मटेरिअल्‍स उत्‍पादन प्‍लांट देखील उभारणार आहे. या गुंतवणुकीद्वारे हेन्केलने स्थानिकीकरण, नाविन्‍यता आणि वेगवान उत्पादन विकासाला चालना देण्याची आपली वचनबद्धता अधोरेखित केली आहे, जे या प्रांतातील इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या झपाट्याने वाढणाऱ्या मागणीला पूरक ठरेल. मेक इन इंडिया आणि पीएलआय (प्रॉडक्‍शन-लिंक्‍ड इन्‍सेंटिव्‍ह) योजना अशा सरकारच्‍या उपक्रमांच्‍या पाठिंब्‍यामुळे भारतातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स उद्योग पुढील काही वर्षामध्‍ये अपवादात्‍मकरित्‍याविकसित होण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यामुळे हेन्केलची विस्‍तारित फूटप्रिंट कंपनीला या झपाट्याने होणाऱ्या विकासाला पाठिंबा देण्‍यास सुसज्‍ज करते.

मोठी बातमी! ‘या’ १६ स्टॉकमध्ये आता कोणतेही F&O ट्रेडिंग होणार नाही

“देश जागतिक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादन हब म्‍हणून आपली पोझीशन दृढ करत असताना हेन्केलला आपली ‘मेक इन इंडिया’ कटिबद्धता दृढ करण्‍याचा आणि या प्रवासामध्‍ये प्रमुख सहयोगी असण्‍याचा अभिमान वाटतो,” असे भारतातील हेन्केलचे कंट्री प्रेसिडण्‍ट एस. सुनिल कुमार म्‍हणाले. “चेन्‍नई आणि कुरकुंभमधील ह्या नवीन सुविधा या विकासाशी संलग्‍न आहेत, ज्‍यामुळे प्रादेशिक आत्‍मनिर्भरता आणि पुरवठा साखळी स्थिरता प्रबळ होत आहे. जगभरातील ग्राहकांना उत्तम सेवा देण्‍याच्‍या, तसेच प्रांतामधील आमचे फूटप्रिंट वाढवण्‍याच्‍या आमच्‍या प्रवासामधील हा उत्‍साहवर्धक टप्‍पा आहे. यामधून दीर्घकालीन सहयोगांना चालना देण्‍याप्रती, नाविन्‍यतेला गती देण्‍याप्रती आणि ग्राहकांसाठी मूल्‍य निर्माण करण्‍याप्रती आमची कटिबद्धता दिसून येते.”

जागतिक इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादनासाठी प्रमुख हब तामिळनाडू येथे स्थित १७,००० चौरस फूट जागेवर विस्‍तृत चेन्‍नई प्‍लांट न्‍यू प्रॉडक्‍ट इंट्रोडक्शन्स ना (एनपीआय) गती देण्‍यासाठी आणि ग्राहकांकरिता टाइम-टू-मार्केट कमी करण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आले आहे. या केंद्रामध्‍ये पाच विशेषीकृत लॅब्‍स आहेत, ज्‍या स्‍मार्टफोन्‍स, वीअरेबल्‍स व इतर ग्राहक इलेक्‍ट्रॉनिक्‍सची विश्‍वसनीयता, टिकाऊपणा आणि स्‍लीक डिझाइन्‍स वाढवण्‍यासाठी आवश्‍यक असललेल्‍या प्रगत अॅडहेसिव्ह सोल्‍यूशन्‍स आणि थर्मल मॅनेजमेंट मटेरिअल्‍सप्रती समर्पित आहेत. अत्‍याधुनिक डिस्‍पेन्सिंग सिस्‍टम्‍स, डिवाईस वॉटरप्रूफिंगसाठी व्‍हॅक्‍यूम इम्‍प्रीगिनेशन तंत्रज्ञान आणि अत्‍यंत अचूक मटेरिअल विश्‍लेषण टूल्‍ससह सुसज्‍ज असलेले हे केंद्र त्‍वरित प्रोटोटाइपिंग, प्रूफ-ऑफ-कन्‍सेप्‍ट चाचणी आणि उत्‍पादन सत्‍यापनाची सुविधा देते. हे केंद्र जर्मनी, यूएस, चीन, सिंगापूर, जपान, कोरिया आणि व्हिएतनाममधील कंपनीच्‍या विद्यमान साइट्सशी पूरक राहत हेन्केलच्‍या जागतिक इनोव्‍हेशन फूटप्रिंटमध्‍ये वाढ करेल. या गुंतवणूकींसह हेन्केल जगभरातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स उत्‍पादकांसाठी प्रमुख इनोव्‍हेशन सहयोगी म्‍हणून आपली भूमिका अधिक पक्की करत आहे.

हेन्केल अॅडहेसिव्ह टेक्‍नॉलॉजीजच्‍या इलेक्‍ट्रॉनिक्‍सचे कॉर्पोरेट उपाध्‍यक्ष वेन झोऊ म्‍हणाले की, या गुंतवणूका भारतातील कंपनीच्‍या विकासाला गती देतील आणि इलेक्‍ट्रॉनिक बाजारपेठेच्‍या पुरवठा साखळीमध्‍ये विविधता आणतील. वेन पुढे म्‍हणाले, “हेन्केलग्राहक जेथे असतील तेथे त्‍यांच्‍या गरजांची पूर्तता करते. आमचे दीर्घकाळापासून भारतात स्‍थापित कार्यसंचालने आहेत आणि ग्राहक प्रांतामधील त्‍यांच्‍या कार्यसंचालनांना गती देत असताना आम्हीही त्‍वरित सहयोगात्‍मक एनपीआय आणि उत्‍पादन सत्‍यापन कौशल्‍य देण्‍यासाठी अतिरिक्‍त स्‍थानिक क्षमतांमध्‍ये गुंतवणूक करत आहोत.”

‘या’ एरोस्पेस स्टॉकमधून ९५ टक्के रॉकेट रिटर्न मिळण्याची शक्यता, काही वर्षांत महसूल २० पट वाढणार

कुरकुंभमधील नवीन प्‍लांट उच्‍च-कार्यक्षम अॅडहेसिव्ह व कोटिंग सोल्‍यूशन्‍समधील हेन्केलच्‍या क्षमतांमध्‍ये वाढ करेल, ज्‍यामुळे स्‍थानिकीकरण आणि भारतातील इलेक्‍ट्रॉनिक्‍स क्षेत्राच्‍या सर्वसमावेशक मागण्‍यांची पूर्तता करण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ होईल. या प्‍लांटला कुरकुंभ उत्पादन साइटमध्‍ये तैनात करण्‍यात आलेल्‍या इंडस्ट्री ४.० आधारित स्मार्ट फॅक्टरी सिस्टमचा लाभ मिळेल, ज्यामुळे उत्पादन कार्यक्षमता सुधारेल, गुणवत्तेत वृद्धी होईल आणि उत्पादन प्रक्रिया अधिक सुरळीत व वेगवान होईल.

Web Title: Henkel makes major investment in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 27, 2025 | 06:46 PM

Topics:  

  • Business News
  • chennai

संबंधित बातम्या

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर
1

PIB Fact Check: सरकार खरंच 1 किलो सोनं मोफत देतंय का? दाव्याचे सत्य सर्वांसमोर

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY
2

भारतीय शेअर बाजार नव्या उंचीवर, गाठला कळस; रेकॉर्डब्रेक आकड्यांवर उघडले NIFTY

Budget 2026: क्रेडिट कार्ड, जास्त कर्ज आणि विमा…बजेटमध्ये महिलांना मिळू शकतो जबरदस्त फायदा
3

Budget 2026: क्रेडिट कार्ड, जास्त कर्ज आणि विमा…बजेटमध्ये महिलांना मिळू शकतो जबरदस्त फायदा

प्रजासत्ताक दिनी Dubai सफारी! IRCTC कडून स्वस्त आंतरराष्ट्रीय पॅकेजची घोषणा; पाहा किंमत आणि सोयीसुविधा
4

प्रजासत्ताक दिनी Dubai सफारी! IRCTC कडून स्वस्त आंतरराष्ट्रीय पॅकेजची घोषणा; पाहा किंमत आणि सोयीसुविधा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.