Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

“शिक्षण सोडलं अन् रस्त्यावर विकले….” आज करतोय कोटींची उलाढाल

शिक्षण सोडले अन् रस्त्यावर सिम कार्ड तसेच डिक्शनरी विकून केलेली सुरुवात आज कोटींच्या घरात येऊन पोहचली आहे. हिमांशू लोहिया यांचे संघर्ष नक्की वाचाच.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 28, 2025 | 06:23 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

हिमांशू लोहिया आर्डेंट एडवर्ल्ड प्राइवेट लिमिटेड या कंपनीचे मालक तसेच संस्थापक आहेत. सध्या त्यांच्या या कंपनीमध्ये ४० लोकं कामं करतात तर कंपनीचा टर्न ओव्हर आता साडे ६ कोटींवर पोहचला आहे. पण सगळ्यात विशेष बाब म्हणजे त्यासाठी हिमांशू यांनी केलेले अपार कष्ट! महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना घरातील आर्थिक परिस्थितीला कंटाळून हिमांशूला शिक्षण त्यागावे लागले होते. शिक्षण अर्ध्यात सोडण्याचे कारण त्यांच्या आईला असणारा कर्करोग आणि घरातील आर्थिक अडचणी!

पोलादपूर तालुक्यात शालेय साहित्य वाटप; कृष्णा कदम यांचे हॉस्पिटल स्थापनेचे स्वप्न

या अडचणींना दूर करण्यासाठी हिमांशू यांनी शिक्षण सोडून रस्त्यावर सिम कार्ड विकणे सुरु केले. विविध मोबाईलच्या दुकानांमध्ये जाऊन तसेच रस्त्यावर स्टॉल मांडून त्यांनी सिम कार्ड विकले. यातून कसा बसा घरातील खर्च निघत होता. म्हणून पुढे त्यांनी शाळेत, शाळांच्या बाहेर तसेच महाविद्यालयाच्या ठिकाणी डिक्शनरी विकण्यास सुरुवात केली.

परिस्थिती आवाक्यात आल्यावर हिमांशू यांनी पुन्हा शिक्षण सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी बॅचलर ऑफ Mass Communication अँड Journalism या विषयात पदवी मिळवली. त्यानंतर त्यांना एका बीटीएल (Below The Line) या कंपनीत काम मिळाले. या कामात तगडा अनुभव घेऊन त्यांनी चांगलीच सेविंग केली होती, पण कोविड काळात त्यांना प्रचन्ड नुकसान झाला. या काळात कंपनीकडून अर्धा पगार मिळत असल्याने त्यांनी नोकरीच सोडून टाकली आणि त्यांची दहा लाखांची आयुष्यभराची सेव्हिंग पणाला लावली. त्यांनी त्यांच्या पत्नी सुप्रियाच्या विश्वासावर ही जोखीम उचलली. सुप्रिया एका कोळशाच्या कंपनीत असिस्टंट मॅनेजर होत्या.

क्रेडिट स्कोअर कमी आहे, तरी बँकेचं कर्ज मिळेल का? मग फॉलो करा ‘या’ गोष्टी

हिमांशू यांनी आर्डेंट एडवर्ल्ड प्राइवेट लिमिटेड या जाहिरात करणाऱ्या कंपनीची सुरुवात केली. फक्त तीन महिन्यात त्यांच्या कंपनीचा टर्न ओव्हर ७० लाखांवर येऊन पोहचला. आज त्यांच्या याच कंपनीचा टर्न ओव्हर साडे ६ कोटींच्या घरात पोहचलेला आहे. रस्त्याच्या कडेला सिम कार्ड विकणारा मुलगा आज साडे ६ कोटींचा टर्न ओव्हर असणाऱ्या कंपनीचा मालक आहे, हे तरुणांनी शिकण्यासारखे आहे.

Web Title: Himanshu lohia success story marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 28, 2025 | 06:23 PM

Topics:  

  • Farmers Success Story

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.