
फोटो सौजन्य - Social Media
ही एआय-आधारित फिल्म होम क्रेडिट इंडियाच्या फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब आणि लिंक्डइन या सर्व प्रमुख डिजिटल आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केली जात आहे. #ZindagiHit या ब्रँड विचारधारेचा विस्तार करत, #SapnoKaNayaSaal मोहीम मागील वर्षातील लहान-मोठ्या यशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासोबतच नववर्षातील संकल्प प्रत्यक्षात आणण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यावर भर देते.
या फिल्मची कथा नववर्षाच्या शेवटच्या काही क्षणांत उलगडते. दैनंदिन जीवनातील वास्तव मांडत, स्वप्ने आणि जबाबदाऱ्या यांमधील संघर्ष प्रभावीपणे दाखवण्यात आला आहे. रवी हा एक तरुण डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह बंद पडलेल्या स्कूटरमुळे अडचणीत सापडलेला आहे. गौरव हा एक महत्त्वाकांक्षी उद्योजक निधीअभावी आपल्या व्यवसायाची सुरुवात करू शकत नाही. फुटलेल्या फोनमुळे आरवचे दैनंदिन आयुष्य विस्कळीत झाले आहे, तर प्रीती ही कॅफे मालक तिच्या जुन्या झालेल्या कॅफेचे नूतनीकरण करण्याचे स्वप्न पाहत आहे.
घड्याळात बारा वाजताच, होम क्रेडिट इंडियाकडून मिळणारी वेळेवर मंजुरी या सर्व कथांमध्ये निर्णायक वळण आणते. रवीला नवीन दुचाकी मिळते, गौरव आपल्या व्यवसायाला सुरुवात करतो, आरव नवीन फोन खरेदी करतो आणि प्रीती आपल्या कॅफेचे नूतनीकरण करते. योग्य वेळी मिळालेल्या आर्थिक पाठबळामुळे स्वप्ने कशी प्रत्यक्षात उतरू शकतात, हे या कथांमधून प्रभावीपणे अधोरेखित करण्यात आले आहे.
या कॅम्पेनबाबत बोलताना होम क्रेडिट इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर आशिष तिवारी म्हणाले की, “#SapnoKaNayaSaal द्वारे आम्ही होम क्रेडिट इंडियाला एक विश्वासार्ह आर्थिक भागीदार आणि उत्प्रेरक म्हणून सादर करू इच्छितो. एआयच्या माध्यमातून सांगितलेल्या या कथा आमच्या ग्राहकांच्या डिजिटल-प्रथम प्रवासाचे प्रतिबिंब आहेत. आमचे सोपे, ग्राहकस्नेही वित्तपुरवठा पर्याय लोकांना त्यांचे संकल्प पूर्ण करण्यास सक्षम करतात.”
या मोहिमेच्या माध्यमातून होम क्रेडिट इंडिया ईएमआय कार्ड, पर्सनल लोन, टू-व्हीलर लोन आणि मालमत्तेवरील कर्ज यांसारख्या विविध आर्थिक उपायांद्वारे सर्व स्तरांतील ग्राहकांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी मदत करत असल्याचे अधोरेखित करते. आर्थिक सुलभता, सोय आणि विश्वास यांचा समतोल साधत, पूर्ण झालेले संकल्पच खरी #ZindagiHit असल्याचा संदेश ही मोहीम देते. एकूणच, एआय तंत्रज्ञानाच्या नाविन्यपूर्ण वापरातून साकारलेली #SapnoKaNayaSaal मोहीम नववर्षात स्वप्नांना दिशा देणारी आणि आर्थिक आत्मविश्वास वाढवणारी ठरत आहे.