Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार; AI युगात देशाला होणार ‘बंपर’ फायदा

भारताने अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 'पॅक्स सिलिका' उपक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे. या करारामुळे AI, सुरक्षित सप्लाय चेन, आणि आर्थिक सुरक्षा यावर भारत-अमेरिका सहकार्य आणखी मजबूत होणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 03:39 PM
Donald Trump

Donald Trump

Follow Us
Close
Follow Us:
  • ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी अमेरिकेसोबत ऐतिहासिक करार,
  • ‘Pax Silica’ करार नेमका काय आहे?
  • ‘Pax Silica’ कराराचा भारताला काय होणार फायदा?
India-US Pax Silica Deal: जागतिक तंत्रज्ञान आणि सुरक्षा क्षेत्रात भारताने एक मोठे पाऊल उचललं आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘पॅक्स सिलिका’ (Pax Silica) या महत्त्वाकांक्षी उपक्रमात भारत अधिकृतपणे सामील झाला आहे. नवी दिल्लीत आयोजित ‘पॅक्स सिलिका’ स्वाक्षरी सोहळ्यावेळी भारतातील अमेरिकन राजदूत सर्गिओ गोर यांनी या करारावर सही केली.

अवाढव्य युद्धनौका, १०० हून अधिक जेट्स, इराणची खैर नाही! 23 वर्षानंतर सर्वात मोठ्या ताकदीने अमेरिका मोठ्या हल्ल्याच्या तयारीत

भारतासाठी मोठा धोरणात्मक टप्पा

राजदूत सर्गिओ गोर यांनी या निर्णयाचे वर्णन एक ‘मोठा धोरणात्मक टप्पा’ म्हणून केलं आहे. त्यांच्या मते, या भागीदारीमुळे आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजेच AI आणि सुरक्षित सप्लाय चेन (Secure Supply Chain) यांसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध आणि सहकार्य अधिक दृढ होणार आहे.

ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वीची मोठी घडामोड

महत्त्वाचं म्हणजे, ‘पॅक्स सिलिका’ हा करार अशा वेळी झाला जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याबाबत उच्चस्तरीय चर्चा सुरू आहे. ट्रम्प यांच्या दौऱ्यापूर्वी झालेला हा करार दोन्ही देशांमधील वाढत्या विश्वासार्हता दर्शवतं.

भारत – अमेरिका यांच्यातील ‘पॅक्स सिलिका करार’ नेमका काय आहे?

या करारात भारताचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. कारण Pax Silica ही विश्वासार्ह तांत्रिक भागीदारी आणि आर्थिक सुरक्षा मजबूत करण्यासाठी तयार केलेली फ्रेमवर्क आहे. त्यांच म्हणणं आहे की, अमेरिका सुरक्षित AI तंत्रज्ञान भारतासारख्या विश्वासू भागीदारांसोबत शेअर करू शकतं. Pax Silica पॅक्स सिलिका हा यूएस स्टेट डिपार्टमेंटचा एक प्रमुख उपक्रम आहे. ज्याचा मुख्य उद्देश AI आणि पुरवठा क्षेत्रात सुरक्षा आणि सहकार्य वाढवणं हे आहे. त्याचा उद्देश मित्र राष्ट्रांमध्ये नवीन आर्थिक सुरक्षा व्यवस्था निर्माण करणं हा असून या उपक्रमात कच्च्या मालापासून ते सेमीकंडक्टर आणि AI पायाभूत सुविधांपर्यंत मजबूत आणि सुरक्षित सप्लाय चेनवर भर देण्यात आला आहे.

कोण कोणत्या देशांचा सहभाग?

Pax Silica घोषणापत्रावर ऑस्ट्रेलिया, ग्रीस, इस्रायल, जपान, कतार, दक्षिण कोरिया, सिंगापूर, संयुक्त अरब अमिराती आणि युनायटेड किंगडम या देशांनी स्वाक्षरी केली आहे. इतर काही देश आणि संस्थाचाही यात सहभागी होत आहेत. भारताचा सहभाग हा महत्त्वपूर्ण खनिजांच्या सप्लाई चेनला सुरक्षित करण्यासाठी आणि उदयाला येणाऱ्या तंत्रज्ञानाला आंतरराष्ट्रीय सहयोग मिळवून देण्याच्या प्रयत्नांत एक महत्त्वाचा भाग आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी देखील अलीकडेच म्हटले होते की सप्लाई चेनमधील जास्त अवलंबित्व धोके निर्माण करत आहे. त्यात जागतिक सहकार्य आवश्यक आहे. Pax Silicaमध्ये सहभागी होणं ही भारत-अमेरिका संबंधांमधील एका नवीन टप्प्याची सुरुवात मानली जात आहे. ज्यामध्ये AI प्रणाली, मजबूत सप्लाई चेन आणि सामायिक आर्थिक सुरक्षा यावर भर दिला जाणार आहे.

पुन्हा युद्धाचं सावट?, इराणमध्ये लढाऊ विमान कोसळून वैमानिकाचा मृत्यू; ट्रम्प यांनी दिलेली हल्ल्याची धमकी…

Web Title: America india joins us led pax silica just before trump visit india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 03:39 PM

Topics:  

  • ai
  • America
  • Artificial intelligence
  • Donald Trump

संबंधित बातम्या

नवी दिल्लीत ‘QUAD’ परराष्ट्र मंत्र्यांची महाबैठक; पण नेमकी क्वाड संकल्पना काय आहे? जाणून घ्या क्लिकवर..
1

नवी दिल्लीत ‘QUAD’ परराष्ट्र मंत्र्यांची महाबैठक; पण नेमकी क्वाड संकल्पना काय आहे? जाणून घ्या क्लिकवर..

Quad Summit : ‘हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर… ‘ ; Quad बैठकीत काय म्हणाले मार्को रुबियो? जाणून घ्या
2

Quad Summit : ‘हे केवळ संवादाचे माध्यम नाही, तर… ‘ ; Quad बैठकीत काय म्हणाले मार्को रुबियो? जाणून घ्या

Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा
3

Quad Summit : क्वाड परिषदेत नेमकं काय घडलं? परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितला मुख्य अजेंडा

US Vs Iran: हॉर्मुझमध्ये अमेरिकेचा इराणवर अटॅक… कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!
4

US Vs Iran: हॉर्मुझमध्ये अमेरिकेचा इराणवर अटॅक… कच्च्या तेलाच्या किमतीत अचानक खळबळ, आता पुन्हा महागाईची भडका!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.