
IPO Market 2025: आयपीओ फंडरेझिंगमध्ये हाँगकाँग दुसऱ्या क्रमांकावर, भारताची देखील विक्रमी कामगिरी
IPO Market 2025: काही दिवसांपर्यंत हाँगकाँगच्या शेअर मार्केटची वाईट परिस्थिति होती. मात्र, २०२५ मध्ये हाँगकाँगमध्ये शेअर विक्री जवळजवळ चार पटीने वाढून ७३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाली. यामध्ये आयपीओ, प्लेसमेंट आणि ब्लॉक ट्रेडद्वारे त्यांनी त्यांच्या शेअर्सची विक्री वाढवली. यामुळे हाँगकाँग हा आशियातील अव्वल स्थानावर असलेला देश असून भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे. भारताने २०२५ मध्ये आयपीओ लाँच करून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी उभारला. जागतिक स्तरावर हाँगकाँग सध्या अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चिनी कंपन्यांनी हाँगकाँगच्या जागतिक विस्ताराला चालना देण्यासाठी मोठे करार करून आर्थिक बळकटी दिली. मे महिन्यात बॅटरी उत्पादक कंटेम्पररी अँपेरेक्स टेक्नॉलॉजी कंपनीने जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या लिस्टिंगमध्ये अंदाजे ५.३ अब्ज अमेरिकन डॉलर्स जमा केले. तसेच, BYD कंपनी आणि Xiaomi कॉर्पोरेशनने शेअर प्लेसमेंटमध्ये देखील ५ अब्ज पेक्षा जास्त निधी जमा केला. अगदी अमेरिकेने टॅरिफ लादल्या वरही त्यांच्या डील सुरूच राहिल्या होत्या.
हेही वाचा : Todays Gold-Silver Price: तुमच्या शहरात काय आहेत आजचे सोन्या – चांदीचे दर? एका क्लिकवर जाणून घ्या सविस्तर
ही वाढ हाँगकाँगपुरती मर्यादित न राहता संपूर्ण आशियामध्ये पसरली. ज्यामुळे जगातील पाच सर्वात मोठ्या शेअर विक्री स्थानांपैकी चार या आशिया खंडात आहेत. हाँगकाँग हा पहिल्या क्रमांकावर असून त्यानंतर भारत, चीन आणि जपानचा क्रमांक लागतो. २०२२ मधील विक्रीच्या उलट या वर्षी हाँगकाँगला चीनच्या AI विकास, जैवतंत्रज्ञानातील प्रगती, चीनचे देशांतर्गत मागणी वाढवण्यासाठीचे प्रयत्न आणि सोने आणि ॲल्युमिनियमच्या वाढत्या किमतींचा फायदा झाला. या दरम्यान, शेअर विक्रीच्या तुलनेने चीनची विक्री मंद राहिली.
हाँगकाँगमधील सुमारे 300 कंपन्या त्यांचे शेअर्स लिस्टिंग करण्याची वाट असल्याचे दिसून येत आहे. तज्ञांचे असे मत आहे की, सर्वात मोठ्या संभाव्य आयपीओमध्ये सिंजेंटा ग्रुप आणि ए.एस. वॉटसन ग्रुप यांचा समावेश असून चिनी एआय कंपन्यांचे शेअर्स देखील सूचीबद्ध होण्याची अपेक्षा आहे. हाँगकाँगमधील कंपन्यांनी या वर्षी त्यांच्या सुरुवातीच्या किमतींपेक्षा अंदाजे ५०% सरासरी परतावा दिला. पुढील वर्षातील ३०० कंपन्यांचे यश आणि कामगिरी शेअर बाजाराच्या कामगिरीवर अवलंबून असून हँग सेंग निर्देशांक या वर्षी २९.५% वाढला आहे. आणि ही कामगिरी २०१७ पासून सर्वोत्तम मार्गावर आहे.
हेही वाचा : फक्त 7 हजार रुपयांच्या SIP वर 1.30 कोटींचा पोर्टफोलिओ कसा करता येईल? समजून घ्या ‘हा’ सोपा हिशोब
देशांतर्गत वाढत्या गुंतवणुकीमुळे म्युच्युअल फंड आणि किरकोळ गुंतवणूकदारांमुळे भारताने २०२५ मध्ये सलग दुसऱ्या वर्षी आयपीओसाठी विक्रम प्रस्थापित केला. यावर्षी भारताने आयपीओ लाँच करून २० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त गुंतवणूक केली. सध्याचे शेअर्स धारक ब्लॉक ट्रेडद्वारे त्यांचे होल्डिंग विकण्यासाठी घाई करत असून जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड पुढील वर्षी भारतात सूचीबद्ध होणाऱ्या प्रमुख कंपन्यांपैकी एक आहे. त्यांचा आयपीओ देशातील आतापर्यंतचा सर्वात मोठा असू शकतो. चीनमध्ये देखील, किरकोळ गुंतवणूकदार चिनी चिपमेकर्सच्या आयपीओसाठी मागणी करत आहेत. उद्योगातील आघाडीची असलेली कंपनी मूर थ्रेड्स टेक्नॉलॉजी कंपनीच्या शांघायमध्ये अलिकडेच झालेल्या पदार्पणात तिच्या शेअर्समध्ये ४००% पेक्षा जास्त वाढ झाली.