Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 30 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

e-Passport Online : आता पासपोर्ट बनणार झटपट? ई-पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रोसेस

e-Passport Online : भारतीय नागरिकांसाठी परदेश प्रवास अधिक सुरक्षित आणि सोपा करण्यासाठी केंद्र सरकारकडून e-Passport जारी केले जात आहेत. पारंपरिक पासपोर्टपेक्षा अधिक सुरक्षित असलेल्या या नवीन इलेक्ट्रॉनिक पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज असा करा.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Oct 30, 2026 | 04:21 PM
ई-पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अर्ज ( सौजन्य - सोशल मीडिया )

ई-पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अर्ज ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • आता पासपोर्ट बनणार झटपट?
  • ई-पासपोर्टसाठी करा ऑनलाईन अर्ज
  • जाणून घ्या आवश्यक कागदपत्रे आणि संपूर्ण प्रोसेस
e-Passport Online : जेव्हा तु्म्ही परदेशात प्रवास करता, तेव्हा सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे पासपोस्ट. पण जर तुमचं हे महत्त्वाचं पासपोर्ट कुठे हरवलं तर सगळाच गोंधळ होईल. पण तुम्हाला माहिती आहे का ? यावर पण खूप चांगला पर्याय म्हणजे ई पासपोर्ट तुम्ही वापरु शकता. महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा आता भारतात सुरु करण्यात आली आहे. ई पासपोर्ट दिसायला सामान्य पासपोर्टसारखंच असतं. फक्त त्याच्या मुखपृष्ठावर एक चिप बसवलेली असते. नेमकी काय आहे ही चिप आणि कसं असतं ई पासपोर्ट? जाणून घेऊयात. ( e-Passport Online ) 

Milk Price Hike : मोठा फटका…1 नोव्हेंबरपासून दूध महागणार! ग्राहकांना प्रति लिटर मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

दिसायला जरी साधं आणि सामान्य पासपोर्टसारखचं दिसत असलं तरीही त्याच्या मुखपृष्ठावर एक चिप बसवलेली असते. या चिपमध्ये व्यक्तीची सर्व माहिती असते. अर्ज कसा करायचा आणि कोणती कागदपत्रे लागतात याबाबत माहिती घेऊयात.

e-Passport म्हणजे काय?

e-Passport च्या मुखपृष्ठावर एक चिप बसवलेली असते. या चिपमध्ये व्यक्तीची वैयक्तिक माहिती असते. ही चिप बायोमेट्रिक डेटा, बोटांचे ठसे आणि इतर वैयक्तिक माहिती डिजिटल स्वरूपात साठवते. हा सामान्य पासपोर्टसारखाच असतो, फक्त त्याच्या मुखपृष्ठाच्या तळाशी एक छोटी सोनेरी चिप असते. यामुळे हा ई-पासपोर्ट असल्याचे सूचित होते. खरी चिप पासपोर्टच्या आतच राहते. कोणीही ई-पासपोर्टसाठी अर्ज करू शकतो, मग ते नवीन पासपोर्ट बनवत असोत किंवा त्याचे नूतनीकरण करत असोत. पण जर तो अद्याप तुमच्या शहरात आला नसेल, तर तुम्हाला तो मिळू शकणार नाही.

कसा करायचा अर्ज?

सर्वप्रथम, तुम्हाला अधिकृत पासपोर्ट वेबसाइटला भेट द्या.
जर तुम्ही अद्याप नोंदणी केली नसेल, तर तुम्हाला ती आधी करावी लागेल. विद्यमान वापरकर्ते थेट लॉग इन करू शकतात.
पुढे, फॉर्ममध्ये आवश्यक माहिती आणि कागदपत्रे सादर करा. त्यानंतर तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिसमध्ये अपॉइंटमेंट घ्यावी लागेल.
मग, पासपोर्ट सेवा केंद्रावर जा आणि तुमच्या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. शेवटी, तुमचा पासपोर्ट तुमच्या घरी पोहोचवला जाईल.

कोणती कागदपत्रे आवश्यक?

ई-पासपोर्ट मिळवण्यासाठी, तुम्हाला खालील कागदपत्रे सादर करावी लागतील:

ओळखपत्र
आधार कार्ड
पॅन कार्ड
मतदार ओळखपत्र
पत्त्याचा पुरावा
वीज बिल
जन्मतारखेचा पुरावा
जन्म दाखला

किती लागेल फी?

ई-पासपोर्ट शुल्कामध्ये कोणताही बदल नाही. ते पूर्वीप्रमाणेच आहे. ई-पासपोर्टसाठी शुल्क खालीलप्रमाणे आहे:

३६ पानांच्या पुस्तकासाठी ₹१,५०० लागतील.
६० पानांच्या पुस्तकासाठी ₹२,००० लागतील.
तुम्ही त्वरित सेवा निवडल्यास, शुल्क ₹३,५०० ते ₹४,००० पर्यंत वाढू शकते.

त्यामुळे तुम्हाला लगेच पासपोर्टची आवश्यकता असेल तर आताच ई पास्टपोर्टसाठी अप्लाय करु शकता. त्यामुळे तुमचा परदेशी प्रवास सोपा आणि सहज होईल.

India Mexico Trade Deal : US Trade च्या चर्चांमध्ये भारताची मेक्सिकोसोबत मोठी डील! ‘या’ क्षेत्रांमध्ये होणार बंपर व्यापार

💡

Frequently Asked Questions

  • Que: ई-पासपोर्ट म्हणजे काय आणि तो सामान्य पासपोर्टपेक्षा कसा वेगळा आहे?

    Ans: ई-पासपोर्टमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चिप असते, ज्यामध्ये धारकाची बायोमेट्रिक माहिती आणि वैयक्तिक तपशील सुरक्षितपणे साठवलेले असतात, ज्यामुळे त्याची सुरक्षा वाढते.

  • Que: ई-पासपोर्टसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

    Ans: तुम्हाला पासपोर्ट सेवा केंद्राच्या अधिकृत अधिकृत वेबसाइटवर जाऊन नोंदणी करावी लागेल, फॉर्म भरावा लागेल आणि फी भरून अपॉइंटमेंट बुक करावी लागेल.

  • Que: ई-पासपोर्ट अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात?

    Ans: ओळखीचा पुरावा, पत्त्याचा पुरावा आणि वयाचा दाखला इत्यादी कागदपत्रे आवश्यक असतात.

Web Title: How to apply for e passport online documents required marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 30, 2026 | 04:21 PM

Topics:  

  • online

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.