Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

ICICI Bank Result: पहिल्या तिमाहीत ICICI Bank ने कमावले 13,558 कोटी, नेट प्रॉफिटमध्ये 15.9% ची उसळी

देशातील आघाडीच्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या ICICI Bank ने चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत सकारात्मक आकडेवारी सादर केली असून एकत्रित निव्वळ नफा १५.९ टक्क्यांनी वाढून १३,५५८ कोटी रुपये झाला

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jul 19, 2025 | 06:38 PM
ICICI Bank चा चालू वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल (फोटो सौजन्य - iStock)

ICICI Bank चा चालू वर्षातील पहिल्या तिमाहीचा निकाल (फोटो सौजन्य - iStock)

Follow Us
Close
Follow Us:

देशातील आघाडीच्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या आयसीआयसीआय बँकेने चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ च्या पहिल्या तिमाहीत उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे. एप्रिल ते जून या तिमाहीत बँकेचा निव्वळ नफा १५.९ टक्क्यांनी वाढून १३,५५८ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वेळी याच कालावधीत हा नफा ११,६९६ कोटी रुपये होता.

बँकेच्या मते, स्वतंत्र आधारावरही निव्वळ नफ्यात १५.५ टक्क्यांची वाढ झाली आहे, जी १२,७६८ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या आकडेवारीमुळे वित्तीय तज्ञांना सकारात्मक संकेत मिळाले आहेत की बँकेने कर्ज वसुली आणि कार्यक्षमतेच्या आघाडीवर मोठी प्रगती केली आहे (फोटो सौजन्य – iStock) 

निव्वळ व्याज उत्पन्नातही वाढ 

बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न (NII) म्हणजेच व्याजातून मिळणारे उत्पन्न देखील १०.६% ने वाढून २१,६३५ कोटी रुपये झाले आहे. त्याच वेळी, बँकेचे इतर उत्पन्न, ज्यामध्ये शुल्क, सेवा शुल्क आणि व्यवहारांमधून मिळणारे पैसे समाविष्ट आहेत, ते १३.७% ने वाढून ७,२६४ कोटी रुपये झाले आहे. तथापि, निव्वळ व्याज मार्जिन (NIM) मध्ये थोडीशी घट झाली आहे. जानेवारी-मार्च तिमाहीत ते ४.४१% होते, जे आता ४.३४% पर्यंत खाली आले आहे.

आयसीआयसीआय बँकेने तिच्या बुडीत कर्जांवर म्हणजेच अनुत्पादक मालमत्तांवर (Gross NPA) देखील नियंत्रण ठेवले आहे. ३० जून २०२५ पर्यंत बँकेचे एकूण NPA प्रमाण १.६७% होता, तर गेल्या वर्षी तो २.१५% होता. हे बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत सुधारणा दर्शवते. बँकेने या तिमाहीत १,८१५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे, म्हणजेच जोखीम लक्षात घेऊन राखीव निधीमध्ये पैसे ठेवले आहेत.

HDFC Bank Q1 Result: एचडीएफसी बँकेला तगडा नफा, पहिल्यांदाच देणार बोनस शेअर आणि रू. 5 चे लाभांश

एनपीएमध्ये स्थिरता, परंतु तरतूदीत दुप्पट वाढ

बँकेच्या मालमत्तेच्या गुणवत्तेत कोणताही मोठा बदल दिसून आला नाही. मार्च तिमाहीप्रमाणे, एकूण एनपीए १.६७% वर स्थिर राहिला. तथापि, निव्वळ एनपीए मागील तिमाहीतील ०.३९ टक्क्यांवरून किंचित वाढून ०.४१ टक्क्यांपर्यंत पोहोचला. दुसरीकडे, जोखीम लक्षात घेऊन, बँकेने प्रोव्हिजनिंगमध्ये मोठी वाढ केली. मार्च तिमाहीतील ८९० कोटी रुपयांवरून जून तिमाहीत १,८१४ कोटी रुपयांपर्यंत वाढ झाली.

३ महिन्यांत शेअर्सच्या किमतीत ८५ टक्क्यांनी वाढ

ICICI Bank चा शेअर शेवटच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजेच १८ जुलै २०२५ रोजी ०.५३ टक्क्यांनी वाढून १,४२६.५० रुपयांवर बंद झाला. बँकेच्या शेअर्सच्या किमतीच्या इतिहासावर नजर टाकल्यास, गेल्या एका आठवड्यात ०.३० टक्क्यांनी किरकोळ वाढ झाली आहे. गेल्या एका महिन्यात त्यात १.०१ टक्के वाढ झाली आहे. गेल्या ३ महिन्यांत कंपनीच्या शेअर्सने १.४१ टक्के परतावा दिला आहे. या वर्षी शेअर्सने ११.२७ टक्के वाढ केली आहे. गेल्या एका वर्षात शेअर्सने १४.१४ टक्के परतावा दिला आहे. गेल्या ३ वर्षांत शेअर्सच्या किमतीत ८४.७९ टक्के वाढ झाली आहे.

920000000 रुपयांच्या घोटाळ्यात Anil Ambani ना मोठा दिलासा, NCLT ने उचलले ‘हे’ पाऊल; गुंतवणूकदारांमध्ये जल्लोष

टीपः गुंतवणूक बाजारातील जोखमींच्या अधीन असते. जर तुम्हाला यामध्ये पैसे गुंतवायचे असतील तर प्रथम प्रमाणित गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घ्या. तुमच्या कोणत्याही प्रकारच्या नफ्यासाठी किंवा तोट्यासाठी Navarashtra.com जबाबदार राहणार नाही.

Web Title: Icici bank q1 results earned 13 558 crore rupees with 15 9 percent net profit

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2025 | 06:38 PM

Topics:  

  • Business News
  • ICICI bank
  • share market

संबंधित बातम्या

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप
1

Online Gaming Bill: ऑनलाइन सट्टेबाजीवर केंद्र सरकारचा मोठा प्रहार! ‘या’ नवीन कायद्यामुळे खेळाडू आणि सेलिब्रेटींनाही बसेल चाप

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
2

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश
3

नफ्यात तुफान वाढ, शेअरहोल्डर्सना मोठी भेट! रू. 24 चा शेअर मिळणार रू50 चा लाभांश

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट
4

अनिल अंबानीच्या ‘या’ कंपनीमध्ये 5% तेजी, सरकारी कंपनी ज्यांना मिळाले प्रोजेक्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.