Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारत ऊर्जा सप्ताह 2025 सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांचे प्रतिपादन

भारत ऊर्जा सप्ताह 2025 हा जागतिक स्तरावरील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम ठरेल असे केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज प्रतिपादन केले आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jan 24, 2025 | 11:32 PM
जागतिक स्तरावर रंगणार भारत उर्जा सप्ताह

जागतिक स्तरावर रंगणार भारत उर्जा सप्ताह

Follow Us
Close
Follow Us:

भारत ऊर्जा सप्ताह 2025 (आयईडब्ल्यू) हा 1 लाख चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्रफळावर आयोजित कार्यक्रम, सहभाग, प्रदर्शन स्थळाची भव्यता आणि त्यातील सत्रांमुळे जागतिक स्तरावर दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा ऊर्जा कार्यक्रम ठरेल असे प्रतिपादन केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आज मुंबईत पत्रकार परिषदेत केले.

नवी दिल्लीतील द्वारका येथील यशोभूमीवर 11 ते 14 फेब्रुवारी 2025 दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आयईडब्ल्यू 2025 मध्ये मंत्री, सीईओ आणि उद्योग धुरीण यांच्याकडून अतुलनीय जागतिक सहभागाचे आश्वासन देण्यात आले आहे, ज्यामुळे ऊर्जा क्षेत्रात नवीन मापदंड  निर्माण होईल.

जागतिक स्तराचा कार्यक्रम 

माध्यमांशी संवाद साधताना, मंत्र्यांनी आयईडब्ल्यू 2025 च्या निमित्ताने आयोजित करण्यात येणाऱ्या क्लीन कुकिंग मिनिस्टरियल  कार्यक्रमावर प्रकाश टाकला. हा कार्यक्रम स्वच्छ स्वयंपाक उपायांचा जागतिक स्तरावर स्वीकार वाढवण्यासाठी सहयोगी प्रयत्नांना बळकटी देणारा एक महत्त्वाचा मंच म्हणून काम करेल. भारताची अत्यंत यशस्वी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (पीएमयूवाय) कार्यक्रमाचा गाभा असून ती ऊर्जा उपलब्धता आव्हानांना तोंड देण्यासाठी जागतिक नमुना म्हणून मौल्यवान दृष्टिकोन आणि सर्वोत्तम पद्धती प्रदर्शित करेल.

Paytm च्या स्टॉकला उतरती कळा, 9 टक्क्याने घसरला शेअर, कंपनीने दिले स्पष्टीकरण

कसा असेल कार्यक्रम

आयईडब्ल्यू 2025 मध्ये मागील कार्यक्रमांच्या तुलनेत व्याप्ती आणि सहभागात उल्लेखनीय वाढ होईल. प्रदर्शनाची जागा 65% ने अधिक म्हणजे 28,000 चौरस मीटर असेल, तर परिषदेच्या सत्रांची संख्या 105 पर्यंत वाढेल आणि जागतिक प्रतिनिधींची संख्या 70,000 पेक्षा जास्त होईल. प्रमुख आंतरराष्ट्रीय वक्त्यांसह 500 हून अधिक वक्ते यात सहभागी होतील जे कार्यक्रमाच्या वाढत्या जागतिक महत्वाचे द्योतक आहे. या परिषदेत अमेरिका, ब्रिटन, रशिया, जपान, जर्मनी आणि नेदरलँड्स सारख्या आघाडीच्या 10 देशांची हायड्रोजन, अक्षय ऊर्जा, जैवइंधन आणि पेट्रोकेमिकल्सवर लक्ष केंद्रित करणाऱ्या आठ संकल्पनात्मक क्षेत्रातील दालने असतील.

कोण होतील सहभागी 

या कार्यक्रमात 20 हून अधिक परराष्ट्र ऊर्जा मंत्री किंवा उपमंत्री, आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुख आणि फॉर्च्यून 500 ऊर्जा कंपन्यांचे 90 सीईओ सहभागी होतील. हे जागतिक ऊर्जा संक्रमण विचारमंथनाला आकार देण्यात भारताच्या वाढत्या प्रभावाचे प्रतिबिंब आहे. आघाडीच्या आयआयटी, अविन्या आणि वसुधा सारख्या स्टार्टअप प्लॅटफॉर्मसह तरुणांना आणि नवोन्मेषकांना सहभागी करण्याच्या उपक्रमांवर पुरी यांनी प्रकाश टाकला; आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञान-चालित उपाय प्रदर्शित करण्यासाठी दिल्ली/एनसीआर मधील 500 विद्यार्थी सहभागी होतील असे सांगितले.

Budget 2025: 9 वर्षांपूर्वी वाढली होते इन्शुरन्स प्रिमियमवरील टॅक्स सवलतीची मर्यादा, यावर्षी पूर्ण होणारा का मागणी?

काय आहे उद्दिष्ट

ऊर्जा सुरक्षा, न्याय्य आणि सुव्यवस्थित संक्रमणे, सहकार्य, लवचिकता, क्षमता बांधणी आणि डिजिटल प्रगती यासारख्या आकर्षक विषयांवर लक्ष केंद्रित करणे हे आयईडब्ल्यू 2025 चे एक प्रमुख आकर्षण आहे. या सोहोळ्यातील स्वच्छ स्वयंपाक विषयक कार्यक्रम शाश्वत आणि परवडणाऱ्या ऊर्जा उपायांपर्यंत पोहोच सुनिश्चित करण्यात भारताच्या नेतृत्व भूमिकेला आणखी बळकटी देईल, ऊर्जा समतेसाठी जागतिक वचनबद्धतेची पुष्टी करेल.

अतुलनीय व्याप्ती आणि नवोन्मेषावर लक्ष केंद्रित करून, भारत ऊर्जा सप्ताह 2025 हा जागतिक ऊर्जा संक्रमणांमध्ये भारताला आघाडीवर ठेवण्यासाठी आणि ऊर्जा क्षेत्रातील बदलासाठी उत्प्रेरक म्हणून त्याची भूमिका मजबूत करण्यास सज्ज आहे.

Web Title: India energy week 2025 is the biggest energy event asserts union minister of petroleum and natural gas hardeep singh puri

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 24, 2025 | 11:32 PM

Topics:  

  • Business News
  • energy minister

संबंधित बातम्या

भारतीय रिअल इस्टेटचा ‘सुवर्णकाळ’! २०२५ मध्ये विक्रमी वाढ; आता २०२६ मध्ये ‘स्मार्ट’ आणि ‘शाश्वत’ घरांचे पर्व
1

भारतीय रिअल इस्टेटचा ‘सुवर्णकाळ’! २०२५ मध्ये विक्रमी वाढ; आता २०२६ मध्ये ‘स्मार्ट’ आणि ‘शाश्वत’ घरांचे पर्व

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
2

Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल
3

India Green Development: हरित बंदरांकडे भारताची वाटचाल; ७,५०० किमी किनारपट्टीवर होणार बदल

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन
4

Mumbai Redevelopment 2026: आता मुंबई वाढणार नाही, तर सुधारणार! २०२६ मध्ये पुनर्विकास ठरणार शहराच्या प्रगतीचे इंजिन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.