Paytm च्या स्टॉकला उतरती कळा, 9 टक्क्याने घसरला शेअर, कंपनीने दिले स्पष्टीकरण
24 जानेवारी 2025 च्या ट्रेडिंग सत्रात पेटीएमची मूळ कंपनी असलेल्या वन97 कम्युनिकेशन्सच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आहे. क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात सहभागी असल्याच्या आरोपावरून पेटीएमसह इतर सात पेमेंट गेटवे कंपन्या ईडीच्या चौकशीत आल्या आहेत. या बातमीमुळे आठवड्याच्या शेवटच्या सत्रात पेटीएमचा स्टॉक घसरला आहे.
टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, ईडी ज्या आठ पेमेंट गेटवे कंपन्यांची चौकशी करत आहे, त्यामध्ये पेटीएमची मूळ कंपनी वन97 कम्युनिकेशन्सचा समावेश आहे. या कंपन्यांच्या व्हर्च्युअल खात्यांमध्ये असलेले 500 कोटी रुपये गेल्या दोन वर्षांपासून ईडीने गोठवले आहेत.
‘या’ Business मध्ये आहेत अफाट पैसे? गुंतवणुकीपासून ते व्यवसाय उभारणीपर्यंत जाणून घ्या संपूर्ण माहिती
HPZ टोकन अॅपद्वारे 10 चिनी नागरिकांनी रचलेल्या क्रिप्टोकरन्सी घोटाळ्यात त्यांचा सहभाग असण्याची शक्यता असल्याने ईडीने ही कारवाई केली आहे. चीनमधील रहिवासी असलेल्या या आरोपींनी क्रिप्टोकरन्सी मायनिंगमध्ये गुंतवणूक वाढवून २० राज्यांमधील लोकांना फसवून २२०० कोटींहून अधिक रुपये उभारले होते.
ED ची ही बातमी समोर आल्यानंतर, शुक्रवारी सकाळी 849.95 रुपयांवर उघडलेला पेटीएमचा शेअर अचानक जवळपास 9 टक्क्यांनी घसरून 773.05 रुपयांवर आला. या घसरणीनंतर, स्टॉकमध्ये खरेदीचा जोर वाढला ज्यामुळे शेअर्स थोडे वधारले. हा शेअर खालच्या पातळीपासून सुमारे ७ टक्क्यांनी वधारला आहे आणि आता 2.54 टक्क्यांनी घसरून 805 रुपयांवर व्यवहार करत आहे.
गेल्या एका वर्षात पेटीएमला अनेक वेळा मोठ्या आव्हानांचा सामना करावा लागला आहे. गेल्या वर्षी ३१ जानेवारी २०२४ रोजी, बँकिंग क्षेत्र नियामक रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडविरुद्ध कठोर कारवाई केली आणि नवीन ग्राहक जोडण्यास बंदी घातली. पेटीएमवर बँकिंग नियमांबाबत अनियमिततेचा आरोप होता, त्यानंतर आरबीआयने ही मोठी कारवाई केली. आरबीआयच्या कारवाईनंतर पेटीएमच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली.
Breaking: अमूलने देशभरात दुधाच्या किमतीत केली कपात, प्रति लीटर 1 रूपया होणार कमी
१० मे २०२४ रोजी, शेअरची किंमत ३१० रुपयांपर्यंत घसरली होती. परंतु कंपनीने या संकटातून स्वतःला सावरले आणि त्यानंतर शेअरमध्ये जोरदार उडी आली. पेटीएमच्या स्टॉकने एका वर्षात मल्टीबॅगर रिटर्न दिले आणि १०६२ रुपयांपर्यंत मजल मारली. बाजारात अलिकडेच झालेल्या घसरणीचा परिणाम पेटीएमच्या शेअरवरही झाला आहे.
या प्रकरणात स्पष्टता देताना पेटीएमने म्हटले आहे की त्यांना ईडीकडून कोणतीही नवीन सूचना मिळालेली नाही. कंपनीने स्टॉक एक्स्चेंजला सांगितले की, माध्यमांमधील अहवाल जुन्या तपासाशी संबंधित आहेत, जे काही थर्ड पार्टी व्यापाऱ्यांवर केंद्रित होते.
पेटीएमने पुढे म्हटले आहे की, “ही माहिती चुकीची आणि दिशाभूल करणारी आहे. बातमी प्रकाशित करण्यापूर्वी माध्यमांनी आमच्याशी संपर्क साधला नाही. आम्ही हे स्पष्ट करू इच्छितो की या व्यापाऱ्यांचा आमच्या कंपनीशी कोणताही संबंध नाही आणि आम्ही सर्व सूचनांचे पालन केले आहे. तसेच तपास संस्थांना पूर्ण सहकार्य केले आहे.






