
India Post Office: आता, फक्त पत्रेच नाही तर झाली डिजिटल क्रांती, डिजिटल योद्धा बनला 'पोस्टमन'
India Post Office: २०२५ हे वर्ष भारतीय टपाल विभागासाठी परिवर्तनकारी वर्ष ठरले, दळणवळण मंत्रालयाच्या अंतर्गत असलेल्या या विभागाने आपली भूमिका केवळ पत्रांपुरती मर्यादित ठेवली नाही, तर सामान्य माणसावर लक्ष केंद्रित करणाऱ्या डिजिटल, आर्थिक आणि प्रशासकीय सेवांचा कणा म्हणून स्वतःला स्थापित केले आहे. मंत्रालयाने जारी केलेल्या वर्षअखेरीसच्या पुनरावलोकनानुसार, भारतीय टपालाने विशेषतः ग्रामीण आणि दुर्गम भागात सेवांमध्ये असलेली कमतरता दूर करण्यासाठी त्याच्या विशाल नेटवर्कचा वापर केला आहे.
सामान्य नागरिकांना सुविधा प्रदान करण्यात विभागाची सर्वांत मोठी कामगिरी म्हणजे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रांचा विस्तार, परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने, ३० नोव्हेंबर २०२५ पर्यंत देशभरात ४५२ पीओपीएसके कार्यरत होते, ज्यामुळे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात पासपोर्ट सेवा पोहोचल्या. जानेवारी ते नोव्हेंबर दरम्यान, विभागाने २.९ दशलक्षाहून अधिक पासपोर्टशी संबंधित अर्जावर प्रक्रिया केल्याने अर्जदारांना सुविधा मिळाली आणि यातून विभागाला ११४.८८ कोटींचा महसूल मिळाला.
हेही वाचा: New Zealand Visa: न्यूझीलंडचा मोठा निर्णय, भारतीय व्यावसायिकांना मिळणार ४ वर्षांचा वर्क व्हिसा
२०२५ मध्ये वित्तीय समावेशन विभागासाठी आर्थिक समावेशन आणि कनेक्टिकिटी ही प्राथमिकता राहिली. इंडिया पोस्टने म्युच्युअल फंड गुंतवणूकदारासाठी जवळपास ५ लाख डोअर-स्टेप केवायसी पडताळणी पूर्ण केली. एएमएफआय, यूटीआय आणि एसबीआय म्युच्युअल फंड सारख्या प्रमुख कंपन्यांशी केलेल्या करारामुळे गुंतवणूक वितरणासाठी पोस्ट ऑफिस एक विश्वासार्ह माध्यम बनले. विभागाने बीएसएनएलशी करार करून दूरसंचार क्षेत्रात आपली पोहोच वाढवली.
सिम कार्ड विक्री आणि रिचार्ज आता १.६४ लाखांहुन अधिक पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहेत. ज्यामुळे डिजिटल कनेक्टिव्हिटी सुधारत आहे, विशेषतः मर्यादित नेटवर्क प्रवेश असलेल्या भागात, इंडिया पोस्टने इसी आणि आयआयटी हैदराबाद यांच्या सहकार्याने ‘डिजीपिन लाँच केले, ही १०-वर्णाची जिओ-कोडेड डिजिटल अॅड्रेस सिस्टम आहे जी भारतातील प्रत्येक ४४४ मीटर ग्रिडला विशिष्टपणे ओळखते.
त्याचप्रमाणे, आधार सेवा मजबूत करण्यात टपाल विभागाने महत्त्वाची भूमिका बजावली. देशभरातील पोस्ट ऑफिसमधून १३,००० हुन अधिक आधार केंद्रे चालवली जात होती. राष्ट्रीय टपाल सप्ताहादरम्यान शाळांमध्ये १,५०० हुन अधिक विशेष शिबिरे आयोजित करण्यात आली. २०२५ मध्ये एकूण २३.५ दशलक्षाहून अधिक आधार नोंदणी आणि अपडेट्स करण्यात आले, ज्यामुळे १२९.१३ कोटींचा महसूल मिळाला.
हेही वाचा: Todays Gold-Silver Price: चांदीने घेतली उसळी, सोन्याचे दर काय सांगतात? जाणून घ्या सविस्तर
लघु उद्योग आणि कारागिरांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी पोस्ट ऑफिस अंऑफिस एक्सपोर्ट सेंटर उपक्रमाचा विस्तार १,००० हून अधिक केंद्रापर्यंत करण्यात आला. यामुळे सुमारे २८० कोटीची निर्यात शक्य झाली, ज्याचा थेट फायदा महिला उद्योजक आणि एमएसएमईना झाला, रोजगार निर्मितीमध्ये योगदान देत, विभागाने पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रमातगत १.६९ लाख युनिट्सची प्रत्यक्ष पडताळणी केली. हर घर तिरंगा’ मोहीम ४.० अंतर्गत टपाल विभागाने २.८ दशलक्षाहून अधिक राष्ट्रध्वजाचे वाटप केले.