Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Petrol-Diesel Price Hike: महागाईचा ट्रिपल अटॅक, कमर्शियल सिलेंडर, ATF नंतर आता पेट्रोल डिझेलदेखील महागलं

नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी, ग्राहकांना महागाईच्या ट्रिपल अटॅक सहन करावा लागत आहे. सुरुवातीला व्यावसायिक LPG आणि नंतर ATF च्या किमतींमध्ये वाढ झाली आणि आता त्यानंतर पेट्रोल डिझेलच्या जोरदार दणका बसणार आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 01, 2026 | 01:35 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Petrol-Diesel Price Hike: महागाईचा दणका सामान्यांना बसतो आणि तोही जोरदार. आताही नवीन आर्थिक वर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी, ग्राहकांना महागाईच्या ट्रिपल अटॅक सहन करावा लागत आहे. सुरुवातीला व्यावसायिक LPG आणि नंतर ATF च्या किमतींमध्ये वाढ झाली आणि आता त्यानंतर आता पेट्रोल डिझेलच्या जोरदार दणका बसणार आहे. प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत. त्याचा परिणाम ग्राहकांच्या रोजच्या जीवनावर होणार आहे आणि परिणामी सामान्यांच्या खिशावर ताण पडणार आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या

सरकारी मालकीच्या ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ या तेल कंपनीने दिल्लीमध्ये ‘XP100’ पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹११ ने वाढवली आहे. या वाढीमुळे, पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹१६० पर्यंत पोहोचली आहे. XP100 हा IOC चा १००-ऑक्टेन पेट्रोल प्रकार आहे, जो प्रामुख्याने उच्च श्रेणीतील आलिशान गाड्या आणि सुपरबाईक्समध्ये वापरला जातो. याव्यतिरिक्त, ‘Extra Green’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रीमियम डिझेलची किंमत प्रति लिटर ₹९१.४९ वरून आता ₹९२.९९ पर्यंत वाढवण्यात आली आहे.

LPG Price Hike: प्रत्येक सिलेंडरवर 380 रुपयांचा तोटा, तरीही सरकारने वाढवल्या नाहीत किमती; पण का? ‘हे’ आहे कारण…

नियमित पेट्रोल डिझेलवर काय परिणाम?

मध्यपूर्वेत (Middle East) सुरू असलेल्या संघर्षा गेल्या महिनाभरापासून सुरुच आहे. ज्याचा परिणाम कच्च्या तेलाचा पुरवठा मर्यादित झाला आहे. यामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. किमती प्रति बॅरल $१२० च्या पातळीच्या जवळ पोहोचल्या होत्या आणि सध्या त्या प्रति बॅरल $१०४ च्या आसपास व्यवहार करत आहेत. तरीही नियमित पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नाही.

महागाईचा तिहेरी दणका

गेल्या आठवड्यात, केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर ₹१० ची कपात केली होती. परिणामी, पेट्रोलवरील कर कमी होऊन प्रति लिटर ₹३ झाला, तर डिझेलवरील कर पूर्णपणे रद्द करण्यात आला होता. त्यामुळे या निर्णयाचा ग्राहकांना त्वरित कोणता दिलासा मिळेल असं वाटत असेल तर अशी अपेक्षा ठेवणं चुकीचं आहे; कारण हा निर्णय मुख्य म्हणजे तेल कंपन्यांसाठी घेण्यात आला आहे. याचा मुख्य उद्देश या कंपन्यांचं आर्थिक नुकसान भरून काढण्यास मदत करणे हा आहे. त्यामुळे दरांमध्ये कोणताही फरक पडणार नाही.

नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा तिहेरी हल्ला

* व्यावसायिक एलपीजीच्या किमती ₹१९५.५ ने वाढल्या.
* एटीएफच्या किमतींनी पहिल्यांदाच प्रति किलोलिटर ₹२ लाखांचा टप्पा ओलांडला.
* प्रीमियम पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीही वाढवण्यात आल्या आहेत.
* दिल्लीमध्ये XP100 पेट्रोल प्रति लिटर ₹११ ने महाग झाले आहे.

यापूर्वी, तेल विपणन कंपन्यांनी व्यावसायिक एलपीजी सिलिंडर्सच्या किमती वाढवल्या होत्या. दिल्लीमध्ये, १९-किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत ₹१९५.५ ने वाढली आहे. एका महिन्यापेक्षा कमी कालावधीतच, या सिलिंडरच्या किमतीत एकूण ₹३०० पेक्षा जास्त वाढ नोंदवली गेली आहे. त्याचप्रमाणे, देशात ATF ची किंमत प्रथमच ₹२ लाख प्रति किलोलिटरचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे या सगळ्याचा फटका सामन्यांना बसणार आहे एवढं मात्र नक्की!

Stock Market Today: कोणते शेअर्स गुंतवणूकदारांना करणार मालामाल? व्यवहार करण्यापूर्वी वाचा तज्ज्ञांचा सल्ला

Web Title: Indian oil hikes premium petrol and diesel prices see latest rate marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 01, 2026 | 01:35 PM

Topics:  

  • Diesel Petrol Price
  • Government
  • Petrol Prices

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.