Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Railway New Rules : फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही! 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक; सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे

Railway New Rules : भारतीय रेल्वेने १ ऑक्टोबरपासून देशभरात विशेष चेकिंग मोहीम राबवण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. आता प्रवाशांकडे फक्त कन्फर्म तिकीट किंवा वैध रेल्वे पास असून चालणार नाही, तर त्यासोबत महत्त्वाचं कागदपत्र सोबत बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Sep 29, 2026 | 03:08 PM
1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक ( सौजन्य - सोशल मीडिया )

1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • फक्त तिकीट किंवा पास असून चालणार नाही!
  • 1 ऑक्टोबरपासून रेल्वे नियम कडक
  • सोबत ठेवा ‘हे’ कागदपत्रे
Railway New Rules : जर तुम्ही नेहमी ट्रेन प्रवास करत असाल किंवा ऑक्टोबरमध्ये रेल्वे प्रवासाला जाणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. कारण या पुढे प्रवास करताना तुमच्याकडे फक्त तिकीट असणं पुरेसं असणार नाही तर त्यासोबत महत्त्वाचं कागदपत्र असणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. १ ऑक्टोबरपासून रेल्वे एक मोठी तिकीट तपासणी मोहीम सुरू करणार आहे. त्यामुळे तुमच्यासोबत हे कागदपत्र असण फार महत्त्वाचं आहे. ( Railway New Rules )

Advertisement Expenses : स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? RTI द्वारे खर्चाचा खुलासा

प्रवाशांच्या तिकिटांसोबत त्यांची ओळख आणि पात्रतेची कागदपत्रे तपासली जातील. विशेषतः जर तुम्ही सवलत, विशेष आरक्षण कोटा, ई-पास किंवा प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर PTO अशी तिकीट बुक करत असाल. तर त्यासोबत तुमच्याकडे आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगणे अत्यंत महत्त्वाचे ठरेल.

PTO म्हणजे नेमकं काय?

भारतीय रेल्वेमध्ये, ‘प्रिव्हिलेज तिकीट ऑर्डर’ PTO हे पात्र रेल्वे कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना जारी केलेले सवलतीचे प्रवासी व्हाउचर आहे. याद्वारे, ते सामान्य प्रवासी भाड्याच्या एक तृतीयांश म्हणजेच 33% दराने रेल्वे तिकीट खरेदी करू शकतात.

1ऑक्टोबरपासून ही मोहीम

मध्य रेल्वे १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत एक विशेष तिकीट तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेदरम्यान, रेल्वे कर्मचारी प्रवाशाचे तिकीट वैध आहे की नाही आणि त्या तिकिटावर प्रवास करणारी व्यक्ती पात्र आहे की नाही, याची चोख पडताळणी करतील. याचा अर्थ, यापुढे केवळ तुमच्याकडे तिकीट आहे की नाही हे फक्त तपासलं जाणार नाही तर तिकीट मिळवण्यासाठी आधार आणि आवश्यक पात्रता पूर्ण केली आहे की नाही, हे देखील तपासलं जाण्याची शक्यता असते.

कोणत्या प्रवाशांनी कागदपत्रे बाळगणे आवश्यक?

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी CPRO डॉ. स्वप्निल नीला यांच्या मते, सवलत किंवा विशेष आरक्षण कोट्याअंतर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आवश्यक ओळखपत्र सोबत बाळगणे आवश्यक आहे. जर एकाच तिकिटावर अनेक प्रवासी प्रवास करत असतील, तर रेल्वेच्या नियमांनुसार किमान एका प्रवाशाकडे आवश्यक ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तिकीट योग्य प्रवाशालाच दिले आहे की नाही हे तपासण्यासाठी रेल्वे कर्मचारी तपासणीदरम्यान या कागदपत्रांची पडताळणी केली जाईल.

कागदपत्र नसल्यास काय?

रेल्वेच्या मते, तपासणीदरम्यान आवश्यक मूळ कागदपत्र न सापडल्यास, लागू नियमांनुसार त्या तिकिटावर प्रवास करणारे प्रवासी वैध तिकिटाशिवाय प्रवास करत आहेत असे मानले जाऊ शकते. याचा अर्थ असा की, तुमच्याकडे तिकीट असले तरी, कागदपत्रे नसल्यास समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामुळे, जर तिकीट सवलत किंवा विशेष कोट्याअंतर्गत खरेदी केले असेल, तर प्रवास करण्यापूर्वी कागदपत्रे नक्की तपासा.

अनारक्षित तिकिटांची तपासणी

या विशेष मोहिमेत अनारक्षित तिकिटांचीही तपासणी केली जाणार आहे. रेल्वे तिकीट परीक्षक आवश्यक असल्यास टीटीई ॲपच्या मदतीने तिकीट सत्यापित आणि तपासू शकतात. याचा अर्थ असा की तुमच्याकडे आरक्षित सीट नसली आणि तुम्ही अनारक्षित तिकिटावर प्रवास करत असाल तरीही तिकीटाची वैधता तपासली जाऊ शकते.

कोणते आयडी वैध असतील?

रेल्वेच्या मते, प्रवासादरम्यान ओळखीसाठी अनेक कागदपत्रे वैध असतात. यामध्ये…
1. आधार कार्ड
2. मतदार छायाचित्र ओळखपत्र
3. पासपोर्ट
4. पॅन कार्ड
5. ड्रायव्हिंग लायसन्स
६. केंद्र किंवा राज्य सरकारचा क्रमांक असलेले फोटो ओळखपत्र
७. विद्यार्थ्याचे फोटो ओळखपत्र
८. फोटो असलेले राष्ट्रीयीकृत बँकेचे पासबुक
९. लॅमिनेटेड फोटो असलेले क्रेडिट कार्ड
लक्षात ठेवा की, ज्या प्रवाशांच्या तिकिटांसाठी पात्रतेचे निकष आहेत, त्यांच्यासाठी केवळ कोणतेही ओळखपत्र असणे पुरेसे ठरणार नाही. आवश्यकतेनुसार तुम्हाला पात्रतेची कागदपत्रे दाखवावी लागतील.

रेल्वे ही मोहीम का राबवत आहे?

मध्य रेल्वेच्या मते, या तपासणी मोहिमेचा उद्देश तिकीट आणि आरक्षणाशी संबंधित अनियमिततांना आळा घालणे हा आहे. रेल्वे विशेषतः महसुलाचे नुकसान टाळणे, आरक्षणाचा गैरवापर रोखणे आणि सवलती, पास किंवा इतर लाभांचा फसवणुकीने होणारा वापर रोखण्यावर लक्ष केंद्रित करेल.

करदात्यांना मोठा दिलासा! Income Tax Audit ची मुदत वाढवली; पाहा ITR भरण्याची नवीन तारीख

Web Title: Indian railway special checking drive from 1st october valid id proof

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 29, 2026 | 03:08 PM

Topics:  

  • Indian Railway
  • new rules

संबंधित बातम्या

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय
1

Rule Changes : सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा कात्री? 1 ऑक्टोबरपासून बदलणार नियम! Bank, LPG, ट्रॅफिक चालानबाबत मोठा निर्णय

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन
2

Kanpur-Delhi Daily Train: रेल्वेचा मोठा निर्णय! कानपूर सेंट्रल ते आनंद विहार दरम्यान रोज धावणार रात्रीची ट्रेन

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून
3

सणासुदीच्या गर्दीचा ताण कमी होणार; मध्य रेल्वेच्या ४१८ विशेष गाड्यांची घोषणा, आरक्षण ‘या’ तारखेपासून

Bank FD Rules Change : 1 ऑक्टोबरपासून बँक FD चे बदलणार नियम! व्याजदरांवर काय होणार परिणाम?
4

Bank FD Rules Change : 1 ऑक्टोबरपासून बँक FD चे बदलणार नियम! व्याजदरांवर काय होणार परिणाम?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.