स्वतःच्याच प्रसिद्धीसाठी Government ने उधळले कोट्यवधी रुपये? ( सौजन्य - सोशल मीडिया )
समोर आलेल्या माहितीनुसार, 2023-24 आणि 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये 10 प्रमुख योजना आणि उपक्रम मोठ्या प्रमाणात राबवण्यात आले. या उपक्रमांच्या जाहिराती देखील मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्या. त्यावर एकूण 54.5 कोटी रुपये इतका खर्च करण्यात आला. त्यामुळे सरकारने प्रत्येक योजनेवर किती पैसे खर्च केलेत आणि कोणत्या योजनेला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली याबाबत जाणून घेऊयात.
सरकारने PM Vishwakarma Scheme आणि PM Internship Scheme या दोन प्रमुख योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. त्यांच्या प्रसिद्धीवर खर्च झालेली रक्कमेचा आकडा पुढिलप्रमाणे
PM Vishwakarma Scheme वर ७.४ कोटी रुपये खर्च झाले.
PM Internship Scheme वर १२.६ कोटी रुपये खर्च झाले.
सर्वाधिक रक्कम GST Bachat Utsav वर खर्च झाली. खर्चाच्या बाबतीत, या योजनेवर अंदाजे २७.१ कोटी रुपये खर्च झाले.
सरकारी योजनांच्या जाहिरातींवरील सरकारचा खर्च RTI ला मिळालेल्या प्रतिसादांमधून आणि राज्यसभेत दिलेल्या माहितीमधून उघड झाला आहे.
सरकार आपल्या योजनांची जाहिरात करण्यासाठी टीव्ही, रेडिओ, चित्रपटगृहे, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, होर्डिंग्ज आणि पोस्टर्स यांसारख्या विविध माध्यमांचा वापर करते. सरकारने आपल्या योजनांची जाहिरात अनेक वेगवेगळ्या ठिकाणी केली, परंतु एका माध्यमावर सर्वाधिक खर्च झाला.






