Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल ‘इतक्या’ कोटींनी वाढली संपत्ती 

भारतातील संपत्ती निर्मितीने २०२०-२०२५ दरम्यान ३० वर्षांचा विक्रम मोडला असून टॉप १०० कंपन्यांचे मार्केट कॅप १४८ लाख कोटींनी वाढले आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा चौथा शेअर बाजार बनला.

  • By Priti Hingane
Updated On: Dec 12, 2025 | 03:20 PM
Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल 'इतक्या' कोटींनी वाढली संपत्ती 

Indian Wealth Creation: भारतीय शेअर बाजारात लक्षणीय वाढ! ५ वर्षांत तब्बल 'इतक्या' कोटींनी वाढली संपत्ती 

Follow Us
Close
Follow Us:
  • भारतातील संपत्ती निर्मितीने मोडला ३० वर्षांचा विक्रम
  • टॉप १०० कंपन्यांचे वाढले मार्केट कॅप १४८ लाख कोटींनी
  • भारताचा GDP पुढील १७ वर्षांत चौपट होण्याची अपेक्षा
 

India Wealth Creation: गेल्या पाच वर्षांत म्हणजेच २०२०-२०२५ पर्यंत भारतीय शेअर बाजारसह अर्थव्यवस्थेत देखील अभूतपूर्व वाढ झाली आहे. कोविड-१९ नंतर झालेल्या या वाढीने गेल्या ३० वर्षात संपत्ती निर्मितीचे सर्व विक्रम मोडले आहेत. MOFSL ने दिलेल्या  अहवालानुसार, या ५ वर्षाच्या काळात देशातील टॉप १०० कंपन्यांचे मार्केट कॅप १४८ लाख कोटींनी वाढले असून ही वाढ भारतीय बाजारपेठेची ताकद आणि वाढत्या गुंतवणूकदारांच्या विश्वासाचे प्रतिबिंब करत आहे. यामध्ये सर्वाधिक संपत्ती निर्माण करणारे क्षेत्रांमध्ये वित्तीय क्षेत्र अर्थात  बँका आणि विमा कंपन्याचा समावेश आहे. त्याचबरोबर, विक्रमी वाढीमध्ये अनेक क्षेत्रांनी सर्वाधिक योगदान दिले असून औद्योगिक, तंत्रज्ञान आणि सार्वजनिक सेवा क्षेत्रांनी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.

हेही वाचा : Sharad Pawar Wealth: बारामती ते दिल्ली.. 85 वर्षांचे पवार… आणि ‘इतक्या’ कोटींची संपत्ती.; आकडा ऐकून तुम्ही व्हाल थक्क!

या अहवालात सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रममध्ये विशेषतः संरक्षण आणि ऊर्जा यासारख्या धोरणात्मक क्षेत्र वेगाने वाढत असल्याचे नमूद केले आहे.  तसेच, वैयक्तिक कंपन्यांमध्ये देखील बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) यांनी या काळात सर्वाधिक संपत्ती निर्माण केल्याची माहिती समोर आली आहे. या कामगिरीमुळे भारत देश हा जगातील चौथा सर्वात मोठा शेअर बाजार म्हणून ओळखला जात आहे. यावर बोलताना मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​अध्यक्ष रामदेव अग्रवाल म्हणाले की, भारत आता सर्वात वेगाने संपत्ती निर्मिती अनुभवत आहे. आणि ही अभिमानाची बाब आहे.

या विकासाचा वेग बघता त्यांनी असेही भाकीत केले आहे की, पुढच्या काही वर्षात भारतीय अर्थव्यवस्था ४  ट्रिलियन वरून १६ ट्रिलियन पर्यंत वाढत असून नवीन आणि महत्त्वपूर्ण गुंतवणूक संधी उदयास येण्याची शक्यता आहे. त्यांनी गुंतवणूकदारांना दीर्घकालीन चांगल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करण्याचा देखील सल्ला दिला.

हेही वाचा : RBI Currency Printing: भारतीय चलनातील सर्वात अनोखी गोष्ट तुम्हाला माहितीये का? आरबीआय नव्हे तर, ‘हे ‘ जारी करतात ही नोट

या गतीने भारताचा GDP देखील वाढण्याची शक्यता आहे. गेल्या १७ वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन म्हणजेच GDP १ ट्रिलियन डॉलर्सवरून ४ ट्रिलियन डॉलर्स झाला असून येत्या १७ वर्षांत हा आकडा चौपट होण्याची देखील शक्यता आहे.

अहवालानुसार, या “मल्टी-ट्रिलियन डॉलर्स (MTD) युगात”, वित्तीय क्षेत्र आणि ग्राहकोपयोगी वस्तू कंपन्या जसे की कार, स्मार्टफोन आणि दैनंदिन वस्तू वेगाने वाढतील. याव्यतिरिक्त, भविष्यात अनेक सातत्याने वाढणारे स्टॉक देखील दिसतील आणि मोठ्या-कॅप कंपन्या भविष्यात आणखी चांगली कामगिरी करतील.

Web Title: Indian wealth creation significant growth in the indian stock market wealth increased by so much crores in last 5 years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 12, 2025 | 03:20 PM

Topics:  

  • GDP
  • india
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांची वाढली आशा, मार्केटमध्ये भरघोस तेजीची शक्यता
1

Stock Market Today: शेअर बाजारात आज सकारात्मक वातावरण! गुंतवणूकदारांची वाढली आशा, मार्केटमध्ये भरघोस तेजीची शक्यता

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद; कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या!
2

पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात फोनवरून संवाद; कोणत्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा, जाणून घ्या!

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!
3

ICC T20 World Cup 2026 च्या मॅच तिकिटांची विक्री सुरू; फक्त ‘इतक्या’ रुपयांत चाहत्यांना मिळणार सामन्याचा आनंद!

Share Market Update: अखेर चार दिवसांची घसरण संपली! सेन्सेक्स ४२६ अंकांनी उसळी घेऊन ८४,८०० पार
4

Share Market Update: अखेर चार दिवसांची घसरण संपली! सेन्सेक्स ४२६ अंकांनी उसळी घेऊन ८४,८०० पार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.