Sharad Pawar Wealth: Baramati to Delhi... 85 years old Pawar... and 'so much' crores of property.; You will be shocked after hearing the data! (photo-social media)
आज 12 डिसेंबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा आणि माजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद पवार यांचा 85 वा वाढदिवस आहे. 1940 साली शरद पवारांचा जन्म पुण्यातील बारामती तालुक्यात झाला होता. महाराष्ट्रातील सर्वात ज्येष्ठ आणि राजकारणाचा अधिक अनुभव असलेले नेते म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. त्यांच्या राजकीय प्रवास अतिशय प्रेरणादायी असून त्यांचे अभ्यासू व्यक्तिमत्व आणि त्यांची स्पष्ट भूमिका कायमच राजकीय घटनांना कलाटणी देणारी ठरली. त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी मुख्यमंत्री, केंद्रीय कृषीमंत्रीपद आणि संरक्षणमंत्री पदही भूषवले आहे.
हेही वाचा : Sharad Pawar Birthday : राजकारण ते क्रिकेटमधील किंगमेकर! शरद पवारांचे हे नऊ निर्णय राहिले नेहमीच चर्चेत
निवडणूक आयोगाकडून शरद पवारांची संपत्ती संबधित अधिकृत माहिती मिळली आहे. जी त्यांनी शपथपत्रांमध्ये नमूद केली आहे. 2020 च्या राज्यसभा निवडणुकीत त्यांनी त्यांची संपत्ती शपथपत्राद्वारे जाहीर केली. त्यामध्ये त्यांच्या संपत्ती संबधित सविस्तर तपशील देण्यात आला आहे. या शपथपत्रात त्यांनी जवळपास 25 कोटींची जंगम मालमत्ता असल्याचे नमूद केले आहे. यामध्ये बँक खाती, दागिन्यांचा देखील समावेश आहे. 2020 च्या सालानुसार त्या सोन्या-चांदीचे दर 88 लाखांपर्यंत असल्याचे त्यांनी सांगितले. जे आताच्या दरानुसार कोट्यवधींच्या घरात असतील.
विशेष असे की, शरद पवारांनी त्यांची जंगम मालमत्तेत सर्वाधिक गुंतवणूक ही शेअर्स मध्ये केली आहे. पवारांनी ही गुंतवणूक शेअर्स, काही बॉण्ड्स आणि काही डिबेंचर्सच्या माध्यमातून केली आहे. पवारांच्या नावावर अंदाजे 8 कोटींच्या आसपास शेअर्स आहेत. त्याचप्रमाणे, त्यांच्या मुळगावी म्हणजेच, बारामतीला देखील बरीच संपत्ती आहे. त्यांच्या नावावर अनेक जमिनी व व्यावसायिक इमारती नोंदवल्या आहेत. पुण्यात देखील शरद पवारांच्या नावावर तब्बल 3.12 कोटींची एक व्यवसायिक इमारत देखील आहे. म्हणजेच, पुणे जिल्ह्यात त्यांची तब्बल 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये इतकी संपत्ती आहे.
हेही वाचा : Happy Birthday Sharad Pawar: राष्ट्रवादी राजकारणाचा शिल्पकार! अशी आहे त्यांच्या नेतृत्वाची यशस्वी कहाणी
विशेष बाब म्हणजे, शरद पवारांनी या प्रतिज्ञापत्रात कर्ज घेतल्याचा उल्लेख देखील केला होता. एक कोटी रुपयांचे कर्ज त्यांनी अजित पवारांची पत्नी सुनेत्रा आणि मुलगा पार्थ पवारांकडून घेतले आहे. शेअर ट्रान्सफरसाठी ही रक्कम अग्रिम रक्कम म्हणून घेतली होती. या सगळ्या माहितीवरून, शरद पवारांची आतापर्यंत एकूण संपत्ती तब्बल 32 कोटी 73 लाख रुपये इतकी असून ही संपत्ती त्यांच्या आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्यामध्ये विभागली आहे. 2025 वर्षापर्यंतची नवीन अधिकृत माहिती उपलब्ध नाही, परंतु यावरून आपण अंदाज लावू शकतो. उपलब्ध स्रोतांनुसार हीच आकडेवारी आधारभूत आहे.






