Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India FDI Slowdown: एफडीआयची दिशा बदलतेय? भारतात निव्वळ परकीय गुंतवणूक ४४ अब्जांवरून थेट १ अब्जांवर

२०२० ते २०२५ या आर्थिक वर्षांमध्ये, भारतात एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ ७० ते ८५ अब्ज डॉलर्सच्या श्रेणीत राहिला, परंतु वाढ स्थिर राहिली. केअर एज रेटिंग्जच्या आकडेवारीनुसार, या काळात एकूण थेट परकीय गुंतवणूक २ टक्के होती.

  • By Priti Hingane
Updated On: Jan 18, 2026 | 11:59 AM
India FDI Slowdown: एफडीआयची दिशा बदलतेय? भारतात निव्वळ परकीय गुंतवणूक ४४ अब्जांवरून थेट १ अब्जांवर

India FDI Slowdown: एफडीआयची दिशा बदलतेय? भारतात निव्वळ परकीय गुंतवणूक ४४ अब्जांवरून थेट १ अब्जांवर

Follow Us
Close
Follow Us:
  • केअरएजच्या अहवालात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित
  • एफडीआय स्थिर, पण निव्वळ प्रवाहात मोठी घसरण
  • सेवा क्षेत्र आघाडीवर, औषधनिर्माणात घसरण
 

India FDI Slowdown: २०२० ते २०२५ या आर्थिक वर्षांमध्ये, भारतात एकूण थेट परकीय गुंतवणुकीचा ओघ ७० ते ८५ अब्ज डॉलर्सच्या श्रेणीत राहिला, परंतु या काळात वाढ जवळजवळ स्थिर राहिली. केअर एज रेटिंग्जच्या आकडेवारीनुसार, या काळात एकूण थेट परकीय गुंतवणूकीचा सरासरी वार्षिक विकास दर सुमारे २ टक्के होता. तथापि, अधिक चिंताजनक बाब म्हणजे याच काळात भारतात निव्वळ थेट परकीय गुंतवणूकीत मोठी घट झाली आहे. केअरएजच्या मते, २०२० या आर्थिक वर्षात निव्वळ एफडीआयचा प्रवाह ४४ अब्ज डॉलर्स होता, जो २०२५ या आर्थिक वर्षांत फक्त १ अब्ज डॉलर्सवर घसरला. रेटिंग एजन्सीने म्हटले आहे की, सकल एफडीआयमध्ये सुधारणा दिसून आली असली तरी, परदेशी गुंतवणूकदारांकडून नफा वसुली झाल्यामुळे आणि भारतातून बाहेर पडणाऱ्या FDI च्या प्रवाहात वाढ झाल्यामुळे निव्वळ FDI वर मोठा दबाव आला आहे.

अहवालानुसार, २०२३ आणि २०२४ या आर्थिक वर्षात सकल एफडीआय सुमारे ७१ अब्ज डॉलर्सवर स्थिर राहिला, जो २०२५ या आर्थिक वर्षात १३ टक्क्यांनी वाडून ८१ अब्ज डॉलर्स झाला. तरीही, नफा परत पाठवल्यामुळे आणि बाह्य एफडीआयमध्ये तीव्र वाढ झाल्यामुळे २०२४ या आर्थिक वर्षात निव्वळ एफडीआय १० अब्ज डॉलर्सवर घसरला आणि २०२५ या आर्थिक वर्षांत फक्त १ अब्ज डॉलर्सवर आला. तथापि, केअरएजने असेही अधोरेखित केले की भारतातील आवक एफडीआयवरील सरासरी परतावा ७.३ टक्के आहे, जो अनेक उदयोन्मुख आणि विकसित अर्थव्यवस्थांपेक्षा चांगला आहे. अहवालानुसार,  परदेशी कंपनीचे पुनर्गुतवणूक किंवा नफ्याचे परतावा हे त्याच्या धोरणात्मक प्राधान्यक्रम आणि भांडवली वाटप धोरणाचे प्रतिबिंब आहे.

हेही वाचा: India 5G Network: डिजिटल भारताची झेप! 5G वापरात भारत जगात ‘या’ क्रमांकावर

जागतिक थेट गुंतवणुकीच्या परिदृश्याकडे पाहता, अहवालात असे नमूद केले आहे की अलिकडच्या वर्षांत जागतिक थेट गुंतवणुकीचा प्रवाह कमकुवत आहे आणि जीडीपी वाढीपेक्षा मागे आहे. जागतिक थेट परकीय गुंतवणूक आणि जीडीपी प्रमाण २०२१ मध्ये २.४ टक्क्यांच्या शिखरावरून २०२४ मध्ये १.३ टक्क्यापर्यंत घसरण्याचा अंदाज आहे. २००८ च्या जागतिक आर्थिक संकटापासून ही घसरण सुरूच आहे, जेव्हा ती २००७ मध्ये ५.३ टक्क्यांवर पोहोचली होती. अहवालात युरोपमधून थेट परकीय गुंतवणूकीत घट आणि अमेरिकेतून येणाऱ्या प्रवाहात स्थिरता दर्शविली आहे.

याउलट, जागतिक थेट परकीय गुंतवणूकीत चीनचा वाटा लक्षणीयरीत्या वाढला आहे, २००० च्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात तो कमी होता, जो महामारीनंतरच्या काळात सरासरी ११ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. व्हिएतनाम, मेक्सिको आणि संसाधनांनी समृद्ध आफ्रिकन देशांसारख्या चीन धोरणाचा फायदा घेणाऱ्या देशांमध्ये थेट परकीय गुंतवणूकीत मोठी वाढ झाली आहे. त्याच वेळी, जागतिक बेट परकीय गुंतवणूकीत भारताचा वाटा २.९ टक्क्यांवरून २.४ टक्क्यांपर्यंत घसरला आहे, ज्याचे मुख्य कारण नफ्याचे वाढलेले परतावा असल्याचे म्हटले जाते.

हेही वाचा: Todays Gold-Silver Price: सोन्या – चांदीचे दर पुन्हा वाढले, खरेदीपूर्वी जाणून घ्या सविस्तर

आर्थिक वर्ष २०२५ मध्ये, सेवा क्षेत्र हे सर्वात मोठे घेट गुंतवणुकीचे क्षेत्र होते, जे एकूण गुंतवणूकीच्या १९ टक्के होते. त्यानंतर संगणक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर क्षेत्र होते. ज्याला १६ टक्के थेट गुंतवणुकीचे क्षेत्र मिळाले. व्यापार आणि अपारंपारिक ऊर्जा क्षेत्रांना प्रत्येकी ८ टक्के मिळाले. या काळात, व्यापार, अपारंपारिक ऊर्जा, ऑटोमोबाईल्स आणि रसायनामध्ये (खते वगळून) एफडीआय वाढला, तर औषधनिर्माण आणि बांधकाम क्षेत्रातील गुंतवणूक कमी झाली. अहवालात असेही म्हटले आहे की, सेमीकंडक्टर, इलेट्रिक वाहने, बॅटरी स्टोरेज आणि डेटा सेंटर्स यांसारखे उदयोन्मुख क्षेत्र परदेशी गुतवणूकदारांसाठी अधिकाधिक आकर्षक होत आहेत.

Web Title: Indias net fdi falls sharply despite stable inflows careedge report reveals

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 11:15 AM

Topics:  

  • FDI
  • share market

संबंधित बातम्या

Stock Market : मुकेश अंबानींचा ‘हा’ शेअर खरेदी करणं ठरेल शहाणपणाचं, अचानक होऊ शकते तेजी, तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?
1

Stock Market : मुकेश अंबानींचा ‘हा’ शेअर खरेदी करणं ठरेल शहाणपणाचं, अचानक होऊ शकते तेजी, तज्ज्ञांचा अंदाज काय सांगतो?

Reliance Industries Stock Fall: रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण, तब्बल इतक्या लाख कोटींचा बसला फटका
2

Reliance Industries Stock Fall: रिलायन्सच्या शेअर्समध्ये घसरण, तब्बल इतक्या लाख कोटींचा बसला फटका

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 
3

Indian stock market closed: महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकांचा परिणाम! १५ जानेवारीला शेअर बाजार सुरु राहणार की बंद? 

Mutual Funds Update: गुंतवणूकदारांच्या ‘या’ कारणाने बंद होतायत एसआयपी? जाणून घ्या सविस्तर 
4

Mutual Funds Update: गुंतवणूकदारांच्या ‘या’ कारणाने बंद होतायत एसआयपी? जाणून घ्या सविस्तर 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.