Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!

इंडिगो ही भारतातील कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. मात्र, आज (ता.५) शनिवारी इंडिगो एअरलाईन्सची यंत्रणा अचानक ठप्प झाली आहे. त्यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले असून, प्रवाशांची गैरसोय झालेली पाहायला मिळत आहे.

  • By गोरक्षनाथ ठाकरे
Updated On: Oct 05, 2024 | 03:19 PM
इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!

इंडिगोची यंत्रणा ठप्प; देशभरात अडकले प्रवासी, एअरलाइन्सने मागितली माफी!

Follow Us
Close
Follow Us:

इंडिगो ही भारतातील कमी दराने विमानसेवा पुरवणारी एक विमान वाहतूक कंपनी आहे. इंडिगोचे मुख्यालय गुरगांव येथे असून, मे २०१४ रोजी भारतामधील एकूण हवाई प्रवासी वाहतूकीचा ३२.३ टक्के इतका वाटा इंडिगोचा होता. ही कंपनी कमी दरात सेवा देणाऱ्या जगातील कंपन्यांमध्ये सर्वात वेगाने प्रगती करणाऱ्यांपैकी एक आहे. मात्र, आज (ता.५) शनिवारी इंडिगो एअरलाईन्सची यंत्रणा अचानक ठप्प झाली आहे. त्यामुळे देशभरातील विविध विमानतळांवर प्रवासी अडकून पडले आहेत.

प्रवाशांचे नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे मदतीचे साकडे

दरम्यान, आता अडकलेल्या प्रवाशांनी केंद्र सरकारच्या नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडे (डीजीसीए) मदतीचे आवाहन केले आहे. मध्यरात्री 12.30 वाजता हे संकट सुरू झाले होते. त्यामुळे केवळ विमाने उडू शकलेली नाहीत तर ग्राउंड सेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या त्रासाबद्दल इंडिगो एअरलाइन्सने प्रवाशांची माफी मागितली आहे.
(फोटो सौजन्य – istock)

हे देखील वाचा – 32,000 कोटी घेऊन चीनमध्ये पळाले; विदेशी गुंतवणुकदारांचा भारतीय बाजारातून काढता पाय!

वेबसाइट, बुकिंग यंत्रणा ठप्प

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक प्रवाशांनी त्यांच्या समस्यांबद्दल लिहिले आहे. या तांत्रिक समस्येमुळे प्रवाशांना ना फ्लाईटमध्ये चढता येत आहे. ना तिकीट काढता येत आहे. प्रवाशांना आपल्या प्रवासाला होणाऱ्या विलंबामुळे विमानतळावर प्रवाशांची घोर निराशा झाली आहे. इंडिगोने लिहिले आहे की, आमच्या नेटवर्कवर एक छोटीशी समस्या आली आहे. त्यामुळे इंडिगोची वेबसाइट आणि बुकिंग यंत्रणा काम करत नाहीये. यामुळे ग्राहकाला चेक इन करण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागू शकते. आमची टीम त्याचे निराकरण करत आहे. गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. आम्ही शक्य तितक्या लवकर परिस्थिती सुधारू. असे इंडिगो एअरलाईन्सकडून सांगण्यात आले आहे.

#6ETravelAdvisory : We are currently experiencing a temporary system slowdown across our network, affecting our website and booking system. As a result, customers may face increased wait times, including slower check-ins and longer queues at the airport. (1/3) — IndiGo (@IndiGo6E) October 5, 2024

विमानतळावर रेल्वे स्टेशनसारखे दृश्य

देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगो दररोज सुमारे 2000 उड्डाणे चालवते. यामध्ये देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानांचा समावेश आहे. त्यामुळे हे संकट मोठे झाले आहे. एका युजरने सोशल मीडियावर लिहिले की, इंडिगो नवीन विमाने खरेदी करत आहे. पण ग्राउंड सर्व्हिस वाढवण्यासाठी काहीही करू इच्छित नाही. आम्ही तासनतास अडकून आहोत आणि काहीही होत नाही. वृद्ध लोकही चिंतेत आहेत. डीजीसीएने यावर तातडीने कारवाई करावी. एका वापरकर्त्याने विमानतळाचे वर्णन रेल्वे स्थानकासारखे झाले असल्याचे म्हणत परिस्थितीचा फोटो शेअर केला आहे.

Technical Glitch at @IndiGo6E
Airport looks like Railway Station #indigo #monopoly #delays pic.twitter.com/fFfMf64G5o
— Professor (@Masterji_UPWale) October 5, 2024

Web Title: Indigo airlines system down passengers stuck across the country the airline apologized

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 05, 2024 | 03:10 PM

Topics:  

  • IndiGo

संबंधित बातम्या

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी
1

Mumbai-Delhi Flight Bomb Threat: मुंबईहून दिल्लीला जाणाऱ्या इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; IndiGo आणि Air India Express च्या नव्या विमानसेवा सुरू
2

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; IndiGo आणि Air India Express च्या नव्या विमानसेवा सुरू

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या
3

Indigo Flight: नेपाळमध्ये झालेल्या मोठ्या हिंसाचारामुळे काठमांडूला जाणारी आणि येणारी इंडिगोची सर्व उड्डाणे रद्द, जाणून घ्या

प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?
4

प्रवासी थोडक्यात बचावले! Indigo ची ‘ही’ फ्लाईट चक्क 2 तास…; मध्यरात्री नेमके घडले तरी काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.