Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Indian Airlines : भारतात विमान प्रवासाचा वेग वाढणार! एअरलाईन्स आणखी 1,000 विमाने खरेदी करणार; पीयूष गोयल यांची मोठी माहिती

Indian Airlines : भारतात हवाई प्रवासाची मागणी वाढत असल्याने भारतीय विमान कंपन्या आणखी १ हजार विमानांची खरेदी करू शकतात, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. सध्या एअरलाईन्सनी १२०० हून अधिक विमानांची ऑर्डर दिली आहे.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 17, 2026 | 09:24 PM
Indian Airlines : भारतात विमान प्रवासाचा वेग वाढणार! एअरलाईन्स आणखी 1,000 विमाने खरेदी करणार; पीयूष गोयल यांची मोठी माहिती

Indian Airlines : भारतात विमान प्रवासाचा वेग वाढणार! एअरलाईन्स आणखी 1,000 विमाने खरेदी करणार; पीयूष गोयल यांची मोठी माहिती

Follow Us
Follow Us:
  • व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार
  • विमान लीजिंग क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्याचा विचार
  • गुजरातमधील गिफ्ट सिटीला विकसित करणार
 

Indian Airlines : भारतात हवाई प्रवासाची मागणी वेगाने वाढत असल्याने आगामी काळात भारतीय विमान कंपन्या आणखी सुमारे 1 हजार विमानांची खरेदी करू शकतात, अशी माहिती केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी दिली. भारतीय विमान वाहतूक क्षेत्राचा वेगाने विस्तार होत असून सध्या विमान कंपन्यांनी दिलेल्या ऑर्डरही भविष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशा ठरणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

इजिप्त दौऱ्यादरम्यान पत्रकारांशी बोलताना पीयूष गोयल यांनी सांगितले की, इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा एअर यांसारख्या भारतीय विमान कंपन्यांनी यापूर्वीच बोईंग आणि एअरबसकडे 1 हजार 200 हून अधिक विमानांची ऑर्डर दिली आहे. मात्र, देशातील विमान वाहतूक उद्योगाची एकूण गरज 2 हजारांहून अधिक विमानांची असल्याचा अंदाज आहे.

व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळणार

वाढती प्रवासी संख्या आणि नव्या मार्गांवरील उड्डाणांची गरज लक्षात घेता विमान कंपन्या विमान उत्पादकांकडे लवकर डिलिव्हरी देण्याची मागणी करत आहेत. विमानांचा ताफा वाढल्यास भारत आणि इजिप्त यांच्यातील हवाई संपर्कही अधिक मजबूत होईल. त्यामुळे दोन्ही देशांमधील व्यापार आणि पर्यटनाला चालना मिळण्याची शक्यता आहे.
विमान वाहतूक क्षेत्रात वेगाने विस्तार

विमान वाहतूक क्षेत्रातील सल्लागार संस्था ऑलिव्हर वायमनच्या 2026 च्या अहवालानुसार, भारतातील व्यावसायिक विमानांचा ताफा 2026 ते 2036 या काळात सरासरी वार्षिक 7.1 टक्के दराने वाढू शकतो. जागतिक विमान वाहतूक बाजारपेठेतील ही सर्वाधिक वेगवान संभाव्य वाढींपैकी एक आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारतीय विमान कंपन्यांनी दिलेल्या अनेक मोठ्या ऑर्डरमधील विमानांची डिलिव्हरी अद्याप बाकी आहे. काही विमानांचा पुरवठा 2034 पर्यंत टप्प्याटप्प्याने होण्याची शक्यता आहे. जगभरातील विमान कंपन्यांकडून मोठ्या प्रमाणात ऑर्डर दिल्या जात असल्याने विमान उत्पादक कंपन्यांकडे मोठी प्रलंबित मागणी आहे. त्यात इंजिन आणि अन्य महत्त्वाच्या सुट्या भागांच्या कमतरतेमुळेही विमानांच्या उत्पादन आणि वितरणावर परिणाम होत आहे.

India National Animal : कधीकाळी सिंह होता भारताचा राष्ट्रीय प्राणी! 1972 मध्ये वाघाला का मिळाला हा मान? जाणून घ्या रंजक इतिहास

विमान लीजिंग क्षेत्राला आर्थिक पाठबळ देण्याचा विचार

या आव्हानांवर मात करण्यासाठी केंद्र सरकार विमान लीजिंग क्षेत्राला अधिक आर्थिक पाठबळ देण्याचा विचार करत आहे. यामध्ये बँकांकडून अधिक कर्ज उपलब्ध करून देणे, रुपयातील वित्तपुरवठ्याला प्रोत्साहन देणे आणि विमान लीजिंगसाठी नियामक प्रक्रिया सुलभ करणे यांचा समावेश आहे.

नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या माहितीनुसार, सध्या भारतीय विमान कंपन्यांच्या ताफ्यातील 85 टक्क्यांहून अधिक विमाने भाडेतत्त्वावर घेतलेली आहेत. त्यामुळे देशांतर्गत विमान लीजिंग व्यवस्था मजबूत करणे आणि आर्थिक स्रोत सहज उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Sahayata Setu : भीषण चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारताची मोठी तयारी; 24 मित्रदेशांसोबत ‘सहायता सेतू-2026’ सराव सुरू!

गुजरातमधील गिफ्ट सिटीला विकसित करणार

सध्या बहुतांश विमान लीजिंग करार आयर्लंड आणि सिंगापूरसारख्या आंतरराष्ट्रीय केंद्रांमधून केले जातात. त्यामुळे भारताला दरवर्षी विमान भाड्यापोटी मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सरकार गुजरातमधील गिफ्ट सिटीला देशांतर्गत विमान लीजिंग आणि वित्तीय केंद्र म्हणून विकसित करण्यावर भर देत आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारतीय विमान कंपन्या आणखी किती विमाने खरेदी करू शकतात?

    Ans: हवाई प्रवासाची वाढती मागणी लक्षात घेता भारतीय विमान कंपन्या आगामी काळात आणखी सुमारे 1 हजार विमानांची ऑर्डर देऊ शकतात, असे पीयूष गोयल यांनी सांगितले.

  • Que: भारतीय विमान कंपन्यांनी आतापर्यंत किती विमानांची ऑर्डर दिली आहे?

    Ans: इंडिगो, एअर इंडिया आणि अकासा एअर यांसारख्या कंपन्यांनी बोईंग आणि एअरबसकडे 1 हजार 200 हून अधिक विमानांची ऑर्डर दिली आहे.

  • Que: सरकार विमान लीजिंग क्षेत्रासाठी काय उपाययोजना करत आहे?

    Ans: बँकांकडून अधिक कर्ज उपलब्ध करून देणे, रुपयातील वित्तपुरवठ्याला प्रोत्साहन देणे आणि नियामक प्रक्रिया सुलभ करणे यांसारख्या उपायांवर सरकार विचार करत आहे.

Web Title: Indian airlines may order 1000 more aircraft piyush goyal rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 09:24 PM

Topics:  

  • air india
  • IndiGo
  • Piyush Goyal

संबंधित बातम्या

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती
1

India US Trade Deal: भारत-अमेरिका ट्रेड डील कधी होणार अंतिम? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी दिली महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.