
Indus Towersचा मोठा सामाजिक उपक्रम! ( सौजन्य - सोशल मीडिया )
‘इंडस टॉवर्स लिमिटेड’ आपल्या ‘सक्षम’ आणि ‘प्रगती’ या प्रमुख सीएसआर (CSR – कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व) कार्यक्रमांद्वारे या ध्येयासाठी योगदान देत आहे. परिणामी आर्थिक वर्ष २०२६ मध्ये कंपनीने तब्बल ३ कोटी ३८ लक्ष ८० हजार लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडला असून, त्यामुळे देशभरातील एकूण लाभार्थ्यांची संख्या एकूण ९ कोटींपर्यंत पोहोचली आहे.
‘इंडस टॉवर्स’च्या सामाजिक प्रभाव निर्माण करण्याच्या दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी समुदायांना डिजिटल कौशल्ये, शिक्षण, आरोग्यसेवा, उपजीविकेच्या संधी आणि शाश्वत पायाभूत सुविधांनी सक्षम करण्याची वचनबद्धता आहे. कंपनीचे उपक्रम अशा प्रकारे आखले गेले आहेत की, ज्यामुळे सर्व भारतीयांच्या प्रत्यक्ष व सक्रीय सहभाग असलेल्या संकल्पनेला बळ मिळेल; जिथे विकास केवळ समुदायांसाठी नाही, तर समुदायांच्या प्रत्यक्ष व सक्रिय सहभागातून साधला जातो. स्थानिक भागधारक, सरकारी संस्था, अंमलबजावणी करणारे भागीदार आणि लाभार्थी गट यांच्या सोबत काम करून त्यांच्या गरजा ओळखणे, त्यानुसार उपाययोजना करणे आणि समुदायामध्ये दीर्घकालीन आपलेपणाची – मालकीची भावना निर्माण करणे हे याचे उद्दिष्ट आहे.
कंपनीच्या सीएसआर उपक्रमांबद्दल बोलताना ‘इंडस टॉवर्स लिमिटेड’चे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी (एमडी आणि सीईओ) श्री. प्राचुर साह म्हणाले, “भारताचा विकासाचा प्रवास तेव्हाच खऱ्या अर्थाने परिवर्तनकारी ठरेल, जेव्हा विकास सर्वसमावेशक आणि सर्वांच्या प्रत्यक्ष व सक्रिय सहभागातून झालेला असेल. ‘इंडस टॉवर्स’मध्ये आमचा असा विश्वास आहे की शाश्वत प्रगतीची सुरुवात ‘क्षमता समानते’तून होते; म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपली क्षमता पूर्णपणे विकसित करण्यासाठी समान आवश्यक संधी, संसाधने आणि पाठिंबा मिळणे सुनिश्चित करणे होय.
आमच्या कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (सीएसआर) कार्यक्रमांद्वारे, आम्ही समुदायांना ज्ञान, कौशल्ये आणि संधींनी सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत, ज्यामुळे त्यांना भारताच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीत अर्थपूर्ण व महत्वपूर्ण सहभाग नोंदवता येईल.
समुदाय, अंमलबजावणी करणारे भागीदार आणि सरकारी संस्था यांच्या सोबत काम करून, आम्ही असा चिरस्थायी प्रभाव निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे, जो लवचिकता वाढवेल, सर्वसमावेशकतेला चालना देईल आणि राष्ट्राच्या प्रगतीत योगदान देईल. भावी दृष्टीने पाहता – अधिक सर्वसमावेशक, सक्षम आणि भविष्यासाठी सज्ज अशा भारताच्या निर्मितीसाठी आमची व्याप्ती वाढवण्यास आणि आमचे योगदान अधिक दृढ करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.”
हे कार्यक्रम ‘डिजिटल इंडिया’, ‘स्किल इंडिया मिशन’, ‘बेटी बचाओ – बेटी पढ़ाओ’, ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०’, ‘पीएम ई-विद्या’ आणि ‘आकांक्षी जिल्हा कार्यक्रम’ (ॲस्पायरेशनल डिस्ट्रिक्ट प्रोग्राम) यांसारख्या अनेक राष्ट्रीय विकास प्राधान्यक्रमांशी आणि सरकारच्या प्रमुख उपक्रमांशी सुसंगत आहेत; तसेच ते संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकास उद्दिष्टांमध्येही (एसडीजी – सस्टेनेबल डेव्ह्लेपमेंट गोल्स) योगदान देतात. या सुसंगतीमुळे, ‘इंडस टॉवर्स’ राष्ट्रीय आकांक्षांचे रूपांतर तळागाळातील अर्थपूर्ण परिणामांमध्ये करण्यास मदत करते.
गेल्या काही वर्षांत, कंपनीने देशातील सुविधांपासून वंचित असलेल्या क्षेत्रांमधील विकासाची महत्त्वाची आव्हाने सोडवण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांची मालिका विकसित केली आहे. त्यानुसार २०३० पर्यंत साधारण १५ कोटी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडण्याच्या दीर्घकालीन उद्दिष्टासह, ‘इंडस टॉवर्स’ मोजता येण्याजोगे आणि शाश्वत परिणाम साधणाऱ्या, तसेच मोठ्या प्रमाणावर राबवता येण्याजोग्या प्रभावी उपक्रमांद्वारे वंचित समुदायांसोबतचा आपला सहभाग अधिक दृढ करत राहील.
देशभरातील आपले व्यापक सक्षम जाळे, तंत्रज्ञानावर आधारित कार्यपद्धती आणि स्थानिक परिस्थितीची सखोल समज यांचा उपयोग करून, ‘इंडस टॉवर्स’ डिजिटल समावेशकता, मनुष्य भांडवली विकास, पर्यावरणीय शाश्वतता, महिला सक्षमीकरण आणि समन्यायी आर्थिक विकास यांसारख्या भारताच्या प्राधान्यक्रमांमध्ये अर्थपूर्ण योगदान देणे सुरू ठेवण्याचे उद्दिष्ट बाळगून आहे.