उद्योगपती मुकेश अंबानींनी केले मतदान, कुंटूंबियांसोबत दिसले मतदान केंद्रावर; पाहा... व्हिडिओ!
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत नवे सरकार निवडण्यासाठी आज मतदान होत असून, देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांनी देखील आपल्या कुटुंबासह मतदान केले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी आज महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. त्यांची दोन मुले आकाश आणि अनंत अंबानी यांच्यासोबत मोठी सून श्लोका अंबानी देखील मतदानासाठी उपस्थित होते. मात्र, यावेळी मुकेश अंबानी यांच्या पत्नी आणि रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा नीता अंबानी उपस्थित नसल्याचे दिसून आले.
शाईने माखलेले फोटो काढत दाखवला उत्साह
उद्योगपती मुकेश अंबानी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर येताच, त्यांनी आपला धाकटा मुलगा अनंत अंबानी यांच्यासोबत मतदानाच्या शाईने बोटाने माखलेले फोटो काढले. त्यांच्या थोडे मागे मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी पत्नी श्लोका अंबानीसह बाहेर आला. त्या दोघांनी देखील मतदान केंद्राबाहेर आपले फोटो काढले. अंबानी कुटुंबातील चार सदस्यांच्या एकत्र फोटोची मागणी मतदानानंतर पूर्ण होऊ शकली नसली तरी आधी मतदानासाठी आल्यावर त्यांनी एकत्र फोटो काढला आहे.
VIDEO | Reliance Industries Chairman Mukesh Ambani, along with his family, casts vote at a polling booth in Mumbai. #MaharashtraElection2024 pic.twitter.com/cRytP0RHi4
— Press Trust of India (@PTI_News) November 20, 2024
मुकेश अंबानी लोकसभा निवडणुकीच्या मतदानासाठी होते उपलब्ध
गेल्या मे महिन्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीतही मुकेश अंबानी मुंबईतील मतदान केंद्रावर पोहोचले होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी नीता अंबानी आणि मोठा मुलगा मुकेश अंबानी यांनीही मतदान केले. त्यावेळी देखील त्यांचे फोटोही सोशल मीडियावर पाहायला मिळाले होते.
दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यात मतदान पार पडले. राज्यातील 288 मतदारसंघांसाठी एकाच टप्प्यात मतदान झाले. या निवडणुकीत 4,136 उमेदवार आपले नशीब आजमावले. 158 राजकीय पक्ष निवडणूक रिंगणात उतरले होते. या उमेदवारांच्या यादीत 2,086 अपक्ष उमेदवारांचा समावेश होता. यंदाच्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. निवडणुकीची मतमोजणी ही शनिवार 23 नोव्हेंबर रोजी होणार असून, त्या दिवशी राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होणार की महाविकास आघाडी सत्तेत येणार? हे स्पष्ट होणार आहे. दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने ही निवडणूक अधिकच महत्त्वाची ठरली आहे.