Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infosys Share Price: नव्या बॉसच्या एन्ट्रीने इन्फोसिसला धक्का! शेअर्समध्ये मोठी पडझड, गुंतवणूकदारांचं नुकसान; काय आहे कारण?

भारतातील प्रमुख IT कंपनी 'इन्फोसिस'ने आपल्या वरिष्ठ नेतृत्वात बदल करत नवीन बॉसच्या नावाची घोषणा केली आहे. मात्र या घोषणेनंतर शेअर बाजारात नकारात्मक प्रतिक्रिया पाहायला मिळाली असून कंपनीचा शेअर ३ टक्क्यांहून अधिक घसरला आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jul 24, 2026 | 05:38 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • नव्या बॉसच्या इन्फोसिसमध्ये एन्ट्री
  • शेअर्समध्ये मोठी पडझड!
  • गुंतवणूकदारांचं नुकसान
Infosys Share Price: देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी असलेल्या इन्फोसिस कंपनीच्या CEO पदी आशिष कुमार दास यांची नियुक्ती झाली आहे. १ एप्रिल २०२७ पासून ते पदभार स्वीकारतील आणि कंपनीचे MD आणि CEO सलील पारेख यांची जागा घेतील. पारेख यांचा 9 वर्षांहून अधिक काळ या पदावर असलेला कार्यकाळ ३१ मार्च २०२७ रोजी संपेल. ५४ वर्षीय दास सध्या इन्फोसिसचे एक्झिक्युटिव्ह व्हाईस प्रेसिडेंट आणि सर्व्हिसेस, युटिलिटीज, रिसोर्सेस, एनर्जी आणि एंटरप्राइज सस्टेनेबिलिटीचे ग्लोबल हेड आहेत. ते सध्या अमेरिकेत राहतात आणि पुढील काही महिन्यांत भारतात परतणार आहेत. पण त्यांच्या नावाच्या घोषणेनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी पडझड झाली आहे.

LPG Price News: गॅस सिलिंडरवर 700 रुपयांपर्यंत सबसिडी? संसदेत सरकारचा मोठा खुलासा; पाहा नेमके काय आहेत दर?

इन्फोसिसच्या दीर्घकाळ चालत आलेल्या परंपरेनुसार, कंपनीचे संस्थापक पुढील CEO ची घोषणा करतात. यावेळी, चेअरमन नंदन नीलेकणी यांनी गुरुवारी बंगळूरु येथे ५४ वर्षीय आशिष दास यांच्या नावाची घोषणा केली. ज्यामुळे कंपनीच्या उत्तराधिकार योजनेबाबत महिन्यांपासून सुरू असलेल्या अटकळांना आता पूर्णविराम मिळाला आहे. यातून हे देखील स्पष्ट होते की, नेतृत्वातील हा बदल इन्फोसिसच्या AI ट्रान्सफॉर्मेशन रोडमॅपच्या अंमलबजावणीत कोणताही अडथळा आणणार नाही.

कोण आहेत आशिष दास?

IIT खरगपूरचे माजी विद्यार्थी असलेले आशिष दास तीन दशकांहून अधिक काळ इन्फोसिसमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी कंपनीमध्ये विविध वरिष्ठ पदांवर काम केले आहे, ज्यामध्ये जगभरातील विविध देशांमध्ये ग्राहकांसोबतचे व्यावसायिक व्यवहार, सेवा वितरण आणि कामकाजाचे व्यवस्थापन यांचा समावेश आहे. दास यांची नियुक्ती संचालक मंडळाच्या शिफारशीनुसार करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पाच वर्षांचा असणार आहे.
“संचालक मंडळाने आमच्या पुढील मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. आशिष हे एक खरे ‘इन्फोसायन’ असून त्यांनी कंपनीत ३१ वर्षे घालवली आहेत. त्यांनी डिलिव्हरी, सेल्स आणि अकाउंट मॅनेजमेंटमध्ये काम केले आहे, तसेच भुवनेश्वरमधील आमचे डेव्हलपमेंट सेंटर उभारण्यास मदत केली आहे. ते स्पष्टवक्ते, एकाग्र आणि कामे पूर्ण करण्यासाठी पूर्णपणे वचनबद्ध आहेत,” असे नीलेकनी यांनी स्पष्ट केलं. त्यांनी पुढे सांगितले की, संचालक मंडळाला असा नेता हवा होता जो महत्त्वपूर्ण बदल घडवून आणू शकेल आणि त्याच वेळी इन्फोसिसला दीर्घकाळापासून वेगळे ठरवणारी मूल्ये व ग्राहकांचा विश्वासही जपेल.

शेअर्स बरेच घसरले

इन्फोसिसमधील आपल्या तीन दशकांच्या कार्यकाळात, आशिष दास यांनी कस्टमर एंगेजमेंट, डिलिव्हरी आणि ग्लोबल ऑपरेशन्समध्ये नेतृत्वाची पदे भूषवली आहेत. त्यांनी स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून ग्लोबल लीडरशिप प्रोग्रामही पूर्ण केला आहे. गेल्या आर्थिक वर्षात, त्यांना १७५ दशलक्ष रुपयांचे पगार पॅकेज मिळाले. बीपी, अरामको आणि शेल यांसारख्या अनेक मोठ्या ग्राहकांसोबतचे करार पूर्ण करण्यात दास यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अगदी अलीकडे, त्यांनी सुमारे ३०० दशलक्ष डॉलर्स किमतीचा लुफ्थान्साचा करार मिळवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

कंपनीचा स्टॉक सुमारे ३.५ टक्क्यांनी घसरला

दरम्यान, आज इन्फोसिसच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बीएसईवर कंपनीचा स्टॉक सुमारे ३.५ टक्क्यांनी घसरून १,०१४.१५ रुपयांवर आला. जेपी मॉर्गनने इन्फोसिसचे रेटिंग ‘न्यूट्रल’वर आणले आणि १,०५० रुपयांचे लक्ष्य ठेवले. जेफरीजने ‘होल्ड’ रेटिंग कायम ठेवले, परंतु लक्ष्य किंमत १,२३५ रुपयांवरून १,०२० रुपयांपर्यंत कमी केली. मॉर्गन स्टॅनलेने इन्फोसिसवरील आपले ‘इक्वल वेट’ रेटिंग कायम ठेवले, परंतु लक्ष्य किंमत १,११२ रुपयांवरून १,०७५ रुपयांपर्यंत कमी केली.

New Tariff Rules: अमेरिकेचा पुन्हा मोठा झटका! भारत – चीनसह 60 देशांवर 10% नवीन टॅरिफ; भारतीय उद्योगांवर होणार कोणता परिणाम?

Web Title: Infosys share price falls after new leadership announcement brokerage reduces target

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 05:38 PM

Topics:  

  • Business News
  • Infosys Company
  • Marathi News
  • share market news
  • share price

संबंधित बातम्या

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव
1

Radha Patil on Pune Dahi Handi Program: दहीहंडीचा डान्स ठरला वादाचा विषय! राधा पाटील संतापली, म्हणाली… गौतमीचंही घेतलं नाव

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?
2

SPJIMR FT MiM Ranking : जगभरातील टॉप 50 बिझनेस स्कूल्समध्ये भारतीय संस्थांचा डंका! SPJIMR ने मिळवले 26 वे स्थान; पाहा काय आहे खास?

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!
3

Dhiraj Deshmukh Latur : “शासनाची भूमिका दुटप्पी अन् शेतकरीविरोधी!” धीरज देशमुखांचा आक्रमक पवित्रा!

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?
4

Chandrapur News: ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी चिमूरमध्ये मोठी घडामोड! सरपंचपदाचे आरक्षण जाहीर, कुणाला धक्का तर कुणाला संधी?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.